शतशब्द कथा… डायरी….. (२१/७/२५)
…… माझी सखी …….
माझी सखी हरवली होती. खूप वर्षात तिच्याशी संपर्क नव्हता.
माझ्या आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या गोष्टी तिला माहीत होत्या. माझ्या प्रत्येक सुख दुःखाची ती साक्षीदार होती. माझी कितीतरी गुपिते तिच्या पोटात होती. माझ्या यांच्या पहिल्या भेटि पासून ते लेकीच्या लग्ना पर्यंत ती माझ्या बरोबर होती. आणि अचानक गायब झाली. ती आज कपाटाची आवराआवर करताना सापडली. हो बरोबर ओळखले तूम्ही माझी सखी म्हणजे माझी डायरी. आज मिळाली. अक्षरशा मी तिला गळा मिठी मारली व साश्रुंनी तिचे स्वागत केले.
