#माझ्यातली मी…
#शतशब्द कथा लेखन दि-१४/७/२०२५
#चित्र शत शब्द कथा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹 विषय – मनातले सौदंर्य 🌹
अवंतिका चित्रकार होती; आयुष्यातील कटू अनुभवांमुळे तिला जगात सौंदर्य उरलेच नाही असे वाटायचे. तिची चित्रेही रंगहीन झाली होती.
तिचे गुरू नेहमी सांगायचे, “बघण्याची नजर प्रामाणिक असेल, तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.” पण तिला ते कधीच पटले नाही.
एकदा निराश होऊन ती नदीकिनारी सूर्यास्त बघत होती. तो तिला नेहमीसारखाच वाटला. तिने डोळे मिटले आणि गुरूंनी सांगितलेले वाक्य आठवले: “आज मी प्रामाणिकपणे पाहीन.” डोळे उघडताच, तिला एक नवीन जादू दिसली. नदीवर नाचणारी सोनेरी किरणे, पक्ष्यांचे मधुर किलबिलाट—सर्व काही तिला अद्भूत वाटले!
अवंतिकाला जाणवले, सौंदर्य बाहेर नाही, आपल्या दृष्टिकोनात आहे. तिने कॅनव्हासवर सुंदर, भावनांपूर्ण रंगचित्र रेखाटले. तिला पहिले बक्षीस मिळाले.
आनंदाश्रूंनी तिच्या डोळयांत खऱ्या सौंदर्याची जाणीव करून दिली. ~अलका शिंदे
शब्द संख्या १००
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
