दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (१४/७/२५)
जशी दृष्टी तशी सृष्टी….
अगं जयू, तूझा ड्रेस किती छान आहे. गोड दिसतेय तू आज. आजी तुझं आपलं काही तरीच. तूला सगळ्यांचे सगळंच छान दिसतं. तू कोणालाच कधीही वाईट म्हणत नाहीस. जयू, जशी दृष्टी तशी सृष्टी असते बघ. आपली बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते. गुलाबाच्या फूलाचे सौदर्य आधी नजरेत भरेल व काटे नंतर दिसतात. तसेच समोरच्या व्यक्तीचे गुण आधी जाणवतील व दोष नंतर समजतील. समोरचा जे बोलतो, वागतो ते त्याच्या दृष्टीकोनातून बघितले तर ते आपल्याला खटकत नाही. आज पर्यंत मी याच नजरेने बघते म्हणून मला सुंदर आयुष्य जगता आले. आजीचे म्हणणे मला पटले. जशी दृष्टी तशी सृष्टी.
