सुखी जीवनाचा मूलमंत्र
अमित नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीवरून सीमा वर चिडचीड करायचा. सीमा आज उशीराच उठली त्यामुळे त्याला कामावर जायला उशीर होत होता. त्याला प्रत्येक काम वेळेवर आणि नीटनेटकं व्हावं असं वाटायचं.
आतापर्यंत तो आईला सगळी काम कुशलतेने करताना बघत आला होता, तीच अपेक्षा त्याने बायकोकडूनही ठेवली होती. पण त्याची अपेक्षापूर्ती होत नसल्याने घरात नेहमी कलह व्हायचे.
आज तो मोहनच्या, लहान भावाच्या घरी आलेला. आपली भावसून देखिल सीमासारखीच वागते पण तरीही मोहन सुखी कसा? न राहवून त्याने मोहनला गुपित विचारलं, आणि त्याचे डोळे उघडले.
मोहनने त्याला मूलमंत्र दिलेला, “कुणीही परिपूर्ण नसतं. मनाजोगं घडत नसेल तर दुर्लक्ष करुन पुढे जावं, हाच सुखी जिवनाचा मूलमंत्र!”
मनिषा चंद्रिकापुरे
