#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(१५/०८२०२५)
#आऊटिंग_आणि_स्वातंत्र्यदिन
#स्वप्नीलकळ्या🥀
#शीर्षक —नवी वाटचाल
राजीवची महाविद्यालयात श्रीमंत व बिघडलेल्या मुलांशीच मैत्री होती .
स्वातंत्र्यदिनी सुट्टी म्हणजे आऊटिंग,एनजाॅयमेंट व एडव्हेंचर ही नवीन व्याख्या डोक्यात सर्वांच्या डोक्यात फिट बसली होती. मोटारसायकलवर भटकणे, नाॅनव्हेज डोळ्यासमोर घुमायला लागले. मोटारसायकलवरची आरडाओरड करत चार पाच जणांची टोळी आऊटिंगला जायला सज्ज झाली.
दिवसभर हुल्लडबाजी झाल्यावर परतीला सुरूवात करणार इतक्यात एका खेड्याच्या वेशीवर एक वळू उधळून वेगाने धावत आला.त्याच रस्यावर एक लहान मुलगी रस्ता क्रास करत जात होती.
तितक्यात राजीव व त्याच्या मित्रांना परिस्थिती लक्षांत आली व त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.वेगाने गाड्या आडव्या घालून त्या मुलीभोवती कोंडाळे केले व त्या मुलीवरचे वेगाने येणारे संकट टाळले.
गावकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले व कौतुक केले .आज खऱ्या अर्थाने ते गावकऱ्यांसाठी सुपुत्र ठरले होते. आउटिंगचा वेळ सत्कारणी लागून एका मुलीचा जीव वाचला होता.आनंदा बरोबरच एडव्हेंचर उपयुक्त ठरले होते.
परततांना मुले एकदम शांत झाली होती. आरडाओरडा नव्हता की हुर्रेबाजी नव्हती. प्रत्येकाच्या मनात जबाबदार नागरिकाची जाणीव झाली होती.खऱ्या अर्थाने वाईट प्रवृत्तीपासून मुक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली होती.
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
(१५०शब्द)

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!