#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२८/७/२५)
इरा आणि शिव दोघेही उत्कृष्ट गिर्यारोहक. महाविद्यालयात असल्यापासून वेगवेगळ्या मोहिमा सर करण्याचे जणू त्यांना व्यसनच लागले होते. आवडीनिवडी समान असल्याने कधी दोघांचे प्रेमाचे सूर जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले ते कळलेच नाही.
लग्नानंतरही दोघांनी त्यांची आवड तशीच जपली. पण हळूहळू कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे आणि वाढत्या खर्चामुळे ही आवड मागे पडत गेली. इराचे एक स्वप्न होते तिला आयुष्यात एकदा माउंट एवरेस्ट सर करायचा होता.
पण त्यासाठी खर्चही बराच येणार होता. दोघांनी पैशांची जमवाजमव केली खरी, पण सरावा दरम्यान इराचा छोटासा अपघात झाला. अपघात छोटा होता पण तिला आता गिर्यारोहण करणे शक्य नव्हते. तिचे हे स्वप्न पूर्ण करायचे आवाहन शिवने पेलले.
तिचे स्वप्न तो जगला आणि पूर्णही केले.
(शब्द – १०६)
