शतशब्दकथा

IMG_20250721_221052.jpg

#माझ्यातलीमी#शतशब्दकथा#डायरी
#सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

शतशब्दकथा..विचारवंतांची रोजनिशी

प्रलय झाला;सारंच संपलं.
शून्य साल चालू झालं.परत अस्तित्वासाठी संघर्ष..उत्क्रांतीचं चक्र चालू झालं..मानवजातच ती.
——————
नव्या साखळीत त्यानं अवतार घेतला..आणि आता गती वाढली प्रगतीची..भगवंतच तो.
—————

आधीची गाडलेली कालकुपी हाती लागली.

तो ब्रम्हांड जाणणारा विश्वनायक..बरोब्बर डिकोडिंग केलं..कालकुपीतील सांकेतिक लिपीचं.

अन् भांडारच ते.
——————-
सर्वच कला,विद्या,शास्त्रे..अद्भुत तर्कशुद्ध मांंडणी.

आता त्याचं अवतार कार्य संपलं.
त्यानं चालना दिली होती..कालकुपीतल्या डायरीत भर पडत राहणार होती.
अनंत पटींनी त्यात क्रांती उत्क्रांती होत प्रलयाची वेळ परत येणार होती.

तरीही प्रलयानंतर नवी डायरी नवी कालकुपीही शाबूत
राहणार होती..गाडली जाणार नव्हती.अवकाशात ढगांत साठवली जाणार होती.

पुढच्या साखळीत असणार होता का एवढा संघर्ष अस्तित्वासाठी आणि गरज पडणार होती का भगवंताच्या अवताराची..आत्मबोधाच्या चालनेसाठी??

परत शुन्य साल चालू होणार नव्हतं.डायरीतल्या पानांवर
त्या पुढची कालगणना आणि माणसाचं कर्तृत्व सारं काही नोंदवलं जाणार होतं.अवकाश असणार होता फक्त हाती कालकुपी रोजनिशी लागण्याचा..होय ना??

#सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!