शतशब्द कथा (२१/७/२५)
कथेचे शीर्षक:- ” डायरीतला बाबा ”
आई रोज सांगायची – ” बाबा आपल्याला सोडून गेले”. तेच मानलं. मनातला राग साठवत गेले. एक दिवस कपाट आवरताना बाबांची डायरी सापडली.मळकट कव्हर , पण आत काळजाला भिडणारे शब्द.
प्रत्येक पान माझ्यासाठी लिहिलं गेलं.
” माझ्या पिल्लाला मी स्वतः सारखं कलाकार बनवेन !”
” तिचं पहिलं पाऊल, पहिलं हसू – मी साठवेन!”
एक पान रडत होतं….
” तिच्यापासून दूर जाताना माझ्या श्वासांनीही पाठिंबा सोडला”. शेवटच्या पानावर लिहिलं होतं…
” जर तू ही डायरी वाचलीस, तर कळेल – मी गेलो नव्हतो, मला दूर पाठवलं गेलं”.
त्या क्षणी सत्याची उकल झाली.
आई नव्हती खोटी, पण तिनं सत्य लपवलं होतं. डायरीने माझ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तर दिली.
आणि डायरीतला बाबा पहिल्यांदाच माझा वाटला!.
१००- शब्द
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
