शतशब्द कथा (२१/७/२५)
शीर्षक:- ” डायरीतला बाबा “.
आई रोज सांगायची,” बाबा आपल्याला सोडून गेले”. पण एक दिवस कपाटात मला बाबांची डायरी सापडली. प्रत्येक पानावर माझ्यासाठी ओवलेली स्वप्न होती….
” माझ्या पिल्लाला मी स्वतः सारखं कलाकार बनवेन!”.
” तिचं पहिलं पाऊल, पहिलं हसू…. मी साठवेन”.
शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं….
” जर तू ही डायरी वाचलीस, तर कळेल… मी गेलो नव्हतो, मला दूर पाठवलं गेलं”.
त्या क्षणी मला खरं समजलं…..
आई नव्हती खोटी, पण पूर्ण सत्यही नव्हतं.
(१००-शब्द.)
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
