# माझ्यातली मी
# शतशब्द कथा

विठुची वारी

पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं!
टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष.
सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते.

विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते आणि मनोमन हसत होते.सगळे वारकरी विठू नामात दंग होते, परंतु हा मोह साक्षात विठुराया आणि रुक्मिणी मातेला आवरला नाही.

मग काय म्हणता,त्यांनीही मानवरूपात येऊनं भक्तांसोबत ताल धरला.
काय गोजिरं रूप हे पांडुरंगाचं!
ग्यानबा तुकारामाच्या गजरात भक्तांसमोर कधी प्रगट झाली हि माऊली डोईवर तुळस,लुगडं नेसलेली आणि विठुराया तर फेटा, पांढर शुभ्र धोतर.मन प्रफुल्लित करणारा तो क्षण!

साक्षात देव आपल्या समोर प्रगट झालेत ही पुसटशीही कल्पना वारकऱ्यांना नव्हती.
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल!

शब्द संख्या (100)
अपर्णा सातपुते -गोडसे
पुणे

20 Comments

  1. проект перепланировки квартиры для согласования [url=https://www.proekt-pereplanirovki-kvartiry11.ru]проект перепланировки квартиры для согласования[/url] .

  2. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!