व्हायरल व्हायचे म्हणून

“मी, माझा मोबाईल आणि बनावट जग”
कथा: व्हायरल व्हायचे म्हणून!
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कॉलनीत राहणारी, २२ वर्षांची सांजली कुलकर्णी तिच्या मोबाईल स्क्रीनकडे टक लावून बघत होती. तिच्या हातात अर्धवट प्यालेला कॉफीचा कप होता, आणि डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता
“व्हायरल व्हायचंय!”
सांजली एक BMM (Bachelor of Mass Media) ची पदवीधर. कॉलेजमध्ये असताना ती स्टोरीटेलिंग, फिल्म-मेकिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगमध्ये रमली होती. तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बनवलेले काही लघुपट यूट्यूबवर टाकले होते, पण फारसा रिस्पॉन्स आला नव्हता.
इंटरनेटवर मात्र एक वेगळीच स्पर्धा होती “फेमस व्हा नाहीतर विसरले जा!”
कॉलेज संपल्यावर तिला एक छोटासा कंटेंट रायटरचा जॉब मिळाला. पण लेखनाचा कंटाळा तिला येऊ लागला. तिचं मन सतत कॅमेऱ्यासमोर किंवा कॅमेऱ्याच्या मागे असायचं. सोशल मीडियावर तिची उपस्थिती ठिकठाक होती – इंस्टाग्रामवर 4,812 फॉलोअर्स, यूट्यूबवर 1.2k सब्स्क्रायबर्स, आणि ट्विटरवर 389 फॉलोअर्स. पण तिला हवं होतं ते काहीतरी “वेडसरं, झपाटून टाकणारं व्हायरल!”
एक दिवस तिने ठरवलं, “हे सगळं बदलायला हवं!”
ती स्वतःशीच म्हणाली – “लोक कंटेंटपेक्षा ड्रामाला क्लिक करतात. कंट्रोव्हर्सी आवडते त्यांना. जरा काही वेगळं, थोडं धाडसी आणि अतिरेकी करावं लागतं.”
आणि मग तिने बनवला एक “सोशल एक्सपेरिमेंट व्हिडीओ”
“एका गरिबाला मदत करताना लोक काय करतात?” तिने तिच्या मित्राला गरीब भिकाऱ्याचं सोंग करायला सांगितलं, त्याला गल्लीच्या कोपऱ्यावर बसवलं आणि गोप्रो लावून शूटिंग चालू केलं. काही लोकांनी दुर्लक्ष केलं, काहींनी पैसे दिले. पण ते व्हिडीओ तिला हव्या तशा डेंगनं व्हायरल झाले नाहीत.तिचं लक्ष रिल्सकडे वळलं. Trending Songs + Cute Expression + Outfit Change = Viral Reel!” ती डान्स करू लागली, लिप-सिंक व्हिडीओ करू लागली. हजारो लोकांनी बघितले, काहींनी “सुंदर आहेस, मस्त डान्स” म्हटलं, पण काहींनी “attention seeker, cringe” असंही म्हटलं.
काही वेळा तिच्या किचनमधून ती “कॉफी केसे बनाये की खुशबू फोन से बहार आये” अशा अंदाजात व्हिडीओ करत होती. पण आतून तिचा आत्मा ओरडत होता – “हे खरंच मी आहे का?” एके दिवशी, एका अत्यंत लोकप्रिय इंफ्लुएन्सरचा व्हिडीओ तिच्या फीडवर आला. तो एक मुलगी होती मी माझ्या बॉयफ्रेंडला पकडलं दुसऱ्या मुलीसोबत! कॅमेऱ्यासमोर ती रडत होती, थरथरत बोलत होती. व्हिडीओवर १.२ मिलियन व्ह्यूज, ७० हजार कमेंट्स, आणि ४२ हजार शेअर्स.सांजलीने डोक्याला हात लावला.
“हाच मार्ग आहे का आता? खोटं रडावं लागेल? नात्यांचं प्रदर्शन करावं लागेल?”तिचा नैतिकतेचा धागा थोडा सैल झाला.दुसऱ्या दिवशी, तिने तिच्या पूर्व-प्रेमीसोबत एक staged व्हिडीओ शूट केला.“जेव्हा माझा एक्स पुन्हा भेटतो आणि म्हणतो – अजूनही तुझ्यावर प्रेम आहे!”
व्हिडीओवर चक्क ८२.५k व्ह्यूज मिळाले! काही लोकांनी “real or fake?” विचारलं, काहींनी तिला support केलं, तर काहींनी ट्रोल केलं.ती हरखून गेली.तिच्या मनात एकच वाक्य सतत घोळत होतं —व्हायरल व्हायचे म्हणून…” काही आठवड्यांनी तिला एक स्पॉन्सर मिळाला — एक स्मॉल स्किनकेअर ब्रँड. त्यांनी ५ पोस्ट आणि ३ रील्ससाठी तिला ₹१५,००० ऑफर केलं. ती खूश झाली, आईला सांगितलं. आईच्या डोळ्यात अभिमानापेक्षा काळजी होती.
सांजु, तू खूप हुशार आहेस ग. पण हे रोजचं नाटक… तुला आतून समाधान आहे का?” सांजली काही बोलली नाही. फक्त हसून मोबाईलवर लक्ष केंद्रीत केलं. एक दिवस, एक धक्कादायक गोष्ट घडली.
तिच्या रील्समध्ये वापरलेल्या एका गाण्यावर कॉपीराइट स्ट्राईक आला, आणि तिचं यूट्यूब चॅनेल काही दिवसांसाठी demonetize झालं. त्याचवेळी एका अश्लील कमेंटचा स्क्रिनशॉट एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये फिरू लागला – “ही मुलगी स्वतःला का विकते? प्रसिद्धीसाठी काहीही करते!” तिच्या ऑफिसमध्येही चर्चा झाली. HR ने बोलावलं –
“तुझा कंटेंट आमच्या कंपनीच्या इमेजशी जमत नाही. तू कामात लक्ष देत नाहीस, आणि आता बाहेर काय चर्चेत आहे ते बघ.” ती जॉबवरून काढून टाकली गेली. त्या रात्री ती तिच्या खोलीत बसून, मोबाईलकडे पाहत राहिली. फॉलोअर्स वाढले होते, पण सन्मान गमावला होता. तिला कळलं, “व्हायरल व्हायचं म्हणून जे केलं, ते स्वतःसाठी नव्हतं… ते केवळ जगाच्या नजरेत यायला होतं.” ती हळूहळू मोबाईल बाजूला ठेवू लागली. काही आठवडे शांतता पाळली. सोशल मीडियावरून log out केलं.
एका दिवशी, तिने नवी डायरी उघडली. पहिला शब्द लिहिला –माझी खरी गोष्ट…”
आता ती स्वतःच्या अनुभवांवर आधारित लघुकथा लिहू लागली.एक पब्लिशिंग हाउसला तिची एक कथा आवडली, त्यांनी ब्लॉग सिरीजसाठी ऑफर दिली.
आज सांजलीचं नाव पुन्हा चर्चेत आहे पण यावेळी एका जबरदस्त कथा-कथनासाठी. तिचं नवीन लेखन “व्हायरल व्हायचं म्हणून!” – शेकडो तरुणांना विचार करायला लावतंय.कथा संपली.
पण प्रश्न उरतो तुम्ही व्हायरल व्हायचं का, की मूल्य टिकवायचं?”
@स्मिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!