# माझ्यातली मी #
*** लघुकथा लेखन टास्क ***
… सौंदर्य
सर्वांनाच आवडतं पण
काहींना चेहऱ्याचं तर
काहींना विचारांचं.. या ओळीवरून
…..व्याख्या खऱ्या सौंदर्याची….
डॉक्टर चेतना व तिचे डॉक्टर मित्र मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. हे सगळे उच्चशिक्षित होते. त्यांना त्यांच्या फॅकल्टीप्रमाणे नोकरी मिळाली. अचानक एक दिवस परिपत्रक आले. डॉक्टर चेतना व तिच्या डॉक्टर मित्रांचा नंबर बंगलोरच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलला कॉन्फरन्ससाठी लागला. चेतना ही दिसायला एकदमच सोसो. रंगाने तर तिच्यावर जुलूमच केला होता पण अतिशय नावाजलेली डॉक्टर होती ती. त्यामुळे काही मित्र तिच्यावर जळायचे.
दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघणार, पण काही मित्रांना तिच्यासोबत प्रवास करायचा नव्हता. त्यातलीच तिची मैत्रीण म्हणाली,
अरे, आपण सगळे एकाच ठिकाणावरून जाणार. तिला टाळून जायचं चांगलं दिसणार नाही.
अगं कल्पना,
तिला आपल्या सोबत न्यायचे ते आपल्या वर्तुळात बसत नाही. ना रंग, ना रूप. काय तिची साधी राहणी.
अरे, तिच्या सौंदर्याची डावी बाजू काय बघता. चेहऱ्याचं सौंदर्य कोणाला नको असतं. आज ती सुप्रतिष्ठित डॉक्टर आहे.
सरतेशेवटी सगळे सोबतच निघाले. फ्लाईट वेळेवर पोहोचली. टॅक्सी पकडता पकडता तिची नजर चार वर्षाच्या मुलावर गेली. तो आपल्या चिमुकल्या हाताने पोटाची खळगी भरण्यासाठी गाडी पुसत होता. तिला गलबलून आले. तिने हातातील सामान खाली ठेवून धावतच त्याच्याकडे गेली व त्याच्या हातातील खराब कापड फेकून दिलं. हातावर पाचशे रुपयाची नोट ठेवून, त्याचा गालगुच्चा घेऊन, त्याला टाटा करून घरी जायला सांगितले.
सगळी मंडळी कॉन्फरन्स हॉलला पोहोचली. कॉन्फरन्समध्ये तिच्या प्रेझेंटेशनला मेडल मिळाले. अभिनंदनाचा वर्षाव झाला पण तिच्या मित्रांनी साधे कौतुकही केले नाही. तिची मैत्रीण जवळ आली म्हणाली,
चेतना वाईट वाटून घेऊ नकोस. स्वतःच्या सौंदर्यामध्ये ही लोकं किती सूक्ष्म अडकली आहेत हे दिसून येतं. तुझ्यातले सौंदर्य तू प्रामाणिक विचारातून दाखवून दिलेस….
….. शब्द संख्या २३२…..
…… अंजली आमलेकर….. २७/१०/२५
