#माझ्यातली मी
#कथा#ब्लॉग लेखन
#दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… वाक्यावर
#दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हा अनुभव अनेकांच्या आयुष्यात येतो. पण हा केवळ विश्वासघात ‘माणसांकडून’ होतो असं नाही, तर तो आपल्या ‘आशां’कडून आणि आपण स्वीकारलेल्या ‘दिखाव्या’कडूनही होतो. शब्द तीन पण अर्थ गहण सांगतात.
#दिसतं -“चमकणारी वस्तू नेहमी सोने नसते.” एक महत्व पूर्ण म्हण आहे पण आपण तरीही वरवर दिसण्याच्याच आहारी जातो.आपल्याला सोशल मीडियावर, समारंभात किंवा अगदी ऑफिसमध्ये जे ‘दिसतं’, ते किती खरं असतं? एक हसणारा चेहरा, एक आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि यशस्वी आयुष्य… हे सर्व आपण डोळ्यांनी पाहतो आणि ते खरं मानतो.
#नसतं-लपलेला वेगळा रंग/ स्वभाव, विचार
‘नसतं’ म्हणजे केवळ वाईट गोष्ट लपलेली असते असं नाही, तर त्यामागे एक ‘हेतू’ लपलेला असतो.कधी चांगला कधी वाईट असतो.
#फसतं-केवळ जग नव्हे, तर आपला ‘निरागस विश्वास’ फसतो. मन तुटतं कधी कधी नैराश्य येते कोणी चुकीचं पाऊलही उचलतात.
यावर एक कथा पहा –
🌹शीर्षक – विश्वासाची किंमत 🌹
नवीन कॉलेज. प्रिया एकटी होती, खूप संवेदनशील. तेव्हा तिला भेटला रोहन, प्रत्येक वेळी हसणारा, प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहणारा. पहिल्याच आठवड्यात त्याने तिला विश्वासाने मैत्रीचा हात दिला. “तुझ्या भावना माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत,” त्याने दिलेले हे वचन प्रियाने हृदयाशी जपले.
प्रियाने आपला सगळा एकटेपणा त्याच्या मैत्रीत ओतला. त्याला तिने आपली सगळी दुःख सांगितली तिला वाटले, अखेर तिला एक असा माणूस मिळाला जो आपल्याला समजून घेईल.
पण, एका पार्टीत तिला सत्य कळले. रोहन त्याच्या मित्रांसोबत बोलत होता, “या पोरींना फक्त भावनात्मक आधार हवा असतो, तो दिला की त्या लगेच आपल्या होतात.”
प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने जी ‘मैत्री’ दिली होती, ती केवळ एक रणनीती होती. तिचे अश्रू तिच्याच डोळ्यांत गोठले. तो आधार नाही, तर केवळ सहानुभूतीचा व्यापार करत होता.
तोच क्षण… त्याने सहजपणे दुसऱ्या एका मुलीला मदत करण्यासाठी हात पुढे केला, आणि प्रियाच्या डोळ्यांतून अश्रू निखळले…
“दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं! पण फसतं ते जग नाही, तर माझा विश्वास ही फसला!”
तिने डोळे पुसले. तिची फसवणूक रोहनने नव्हे, तर तिच्याच निरागस विश्वासाने केली होती.
तिने धडा घेतला, ‘दिसणाऱ्या प्रत्येक चांगुलपणामागे खरा माणूस नसतोच’, आणि आयुष्याच्या पुस्तकातून असे पान वेळीच फाडून टाकावे.”
#तात्पर्य -प्रियाने धडा घेतला पण तिने ते पान ‘आयुष्याच्या पुस्तकातून वेळीच फाडून टाकले.’ जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा त्या दुःखात अडकून न राहता, त्या अनुभवाला आयुष्यातून कायमचा दूर करा आणि पुढे चला. कारण, जोपर्यंत तुम्ही त्या फसलेल्या पानाला धरून ठेवता, तोपर्यंत तुम्हाला नवीन, खरी आणि सुंदर गोष्ट अनुभवायला मिळत नाही!
~अलका शिंदे


सुंदर 👌🏻📖✍🏻
можно проверить ЗДЕСЬ [url=https://www.cocel.com.br/]kraken маркетплейс зеркало[/url]
खूप सुंदर सुरेख मांडणी
Alright guys, been playing around on jj77casino.net and I gotta say, the selection is pretty awesome. If you’re looking for some action, give it a go: jj77casino