माझ्यातलीमी#लग्न
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
रिपोस्ट
मॅड डायरीसाठी अजून एक फॅड
—————————————-
सगळं पैशाचं काम.. हौसेला मोल नसतं..
एका चेंगट माणसाला खूप आनंद..कोरोनात लग्न मोबाईल च्या फोटो शूट वर कमी पैशात भागलं.
पूर्वी राजेरजवाडे कहाण्या किस्से
ऐकण्यासारखेच. प्रतिष्ठेला साजेसे..
असायचे सगळेच समारंभ भरगच्च.
जवळचे कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र येण्याची आणि तुमच्या व्यस्ततेसाठी ग्लास वाढवण्याची संधी कोणाला आवडणार नाही? पंजाबी असतील तर पेग जितक्या वेळा मिळतील तितक्यांदा येऊ द्या..प्रीवेडिंगमधे भरपूर रेलचेल ठेवा म्हणणार.अगदी बॅचलर पार्टी पासून आफ्टर-पार्टी पर्यंत. हीसुद्धा वराच्या कुटुंबाला जाणून घेण्याची एक उत्तम संधी असते ज्यांच्यासोबत तुम्ही अजून जास्त वेळ घालवला नाही.
याउलट वेळ नाही म्हणून तर काही वर्कोहोलिक म्हणून तर काही मनुष्यबळ नाही म्हणून थोडक्यात सगळं उरकतात.
पण हल्ली प्रीवेडिंगचा अतिरेक एवढा की बजेट वाढलं..मेक अप..त्यातही फिल्मी कोरिओग्राफी ..ड्रेपरी .. की मेन कार्यक्रमाचं अप्रूप राहिले नाही..नमनालाच घडाभर तेल वाया..
इतक्यावरच थांबत नाही..इथं इतकं तर लग्नात काय..धूरच निघणार म्हणत लोकांच्या अपेक्षा वाढतात..
एवढं केलं आणि जेवण पहावं तर अगदीच न आवडलेलं आणि मानपान काहीच धड नाही म्हणत एवढा खर्च वायाच असं सर्टिफाय करतात.
खाजगी वैयक्तिक क्षण .. लाजणं.. हळूहळू ओळख वाढणं हे आजकाल सार्वजनिक होतात किंवा त्यात अजून फोटो शूट घेणारे त्या क्षणांनाही मेक अप चढवतात.. फिल्मी स्टाईलने.लग्नाआधी ते सार्वजनिक केल्याने विवाहाच्या प्रतिष्ठेचा भंग होतो. लग्नापूर्वी तुमचे वैयक्तिक फोटो समाजासमोर दाखवणे चुकीचे आहे. अशा कार्यक्रमांवर बंदी घातली पाहिजे.नवीन ट्रेंड जुना होऊन वैवाहिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवायच्या आत बंद व्हावा.
कधीकधी असंही घडू शकतं..आधीच अती परिचय ..दोष आधीच समजतात आणि लग्न मोडतात.
हे चांगलं म्हणायचं काही वेळा तर काही वेळा घातकच. कारण लग्नानंतर तडजोड होत मार्गी लागलंही असतं असं वाटून राहतं.
नव्या फॅशन येत राहतात.. पण हौस आणि आठवणी साठवणे याला अतिरेकी प्रदर्शन दिखावा एवढंच स्वरूप येऊ नये.
एकदा तर असंही झाले की
प्रीवेडिंगला सडपातळ दूल्हा ..गडंगनेर केळवणं खाऊन खाऊन.. लग्नात पाच महिन्यांनंतर इतका फुगलेला दिसू लागला की काही जण दूल्हा ऐनवेळेस बदलला की काय म्हणून हसत राहिले.
प्रीवेडिंग फिल्मी दिसावे हा उद्देश किंवा मिक्सिंग मधे एडिटिंगची चूक म्हणावे की काय पण एका प्रीवेडिंग शूट मधे दोन नवरे असणार का लग्नाच्या वेदीवर अशी शंका यावी..असंही एकदा घडलं.
हिमाचल प्रदेशात एका ठिकाणी पाच पांडवांना फाॅलो करत सर्व भावांशी एकाच मुलीचे लग्न करत बहुपतित्व मान्यताप्राप्त. यात प्री वेडिंग शूट कसं वाटेल..एक भाऊ नाचेल तर एक गाईल..एक आईस्क्रीम भरवेल तर एक सूप पाजेल..एक हत्तीवर तर एक घोड्यावर येईल .
एखादा श्रीमंत उंटही मागेल ट्रक मधून किंवा प्रीवेडिंगचं डेस्टिनेशन वेडिंगसारखं शूट होईल..
नशीब पोस्ट वेडिंग शूटची रीत आली नाही..
लग्नानंतर पहिला दिवस..दुसरा दिवस…सोळावा दिवस.. कुलदैवत दर्शन.. हनीमून…
नाहीतर पुढची पिढी म्हणायची .. आम्हाला दुनियेत आणायला बरीच मेहनत केली की हो..
आमच्यासाठी काय केलं हे विचारलं तर सांगता येईल..प्री बर्थ शूटिंग पहा .
एका शूटमधे ॲडव्हेंचरच्या नावाखाली नदीत शिरले आणि ते प्री डेथ शूटिंग ठरले.
तर काही वेळा मान खाली घालावी अशा शर्मसार करणाऱ्या हरकती स्क्रीन वर पहायला मिळतात..हीच का भारतीय संस्कृती प्रश्न पडतो.विवाह म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन आणि दोन आत्म्यांचे मिलन जे विश्व निर्माण करते. आपल्या ऋषीमुनींनी विवाहाला केवळ विश्वाच्या निर्मितीचे साधन मानले, चैनीचे नाही.
वेडिंग शूटला लोक स्टेटस सिम्बॉल मानू लागले आहेत. ही आपली संस्कृती नाही. या प्रवृत्तीमुळे खर्चाचा अतिरिक्त बोजा निर्माण होतो. पायावर कुऱ्हाड मारण्यासारख्या या प्री-वेडिंग शूटनंतर नाती तुटतात.
हा पसरत चाललेला ऋण काढत सणाचा घातक आजार ठरू नये..विरोध करावा..
बाहुलीचं लग्न .. रजा काढ तीन दिवस पपा ..म्हणताना तो विचारता झाला..का?
छोटी उत्तरली .. तुम्ही आम्ही काय काय तयारी कशी करणार .. बाहुला बाहुलीचंही प्री वेडिंग शूट शेजारचा दादा करून देणार आहे.. तो दादा असा नादी लावतोय पोरा सोरांना..जाब विचारला तर सांगितलं..हा प्रोजेक्टच समजायचा .. यातच करिअर करणार..तसं त्यानं केलं ही.
पण नियमित उत्पन्न नाही म्हणून बायको मिळणार का त्याला??
पाश्चिमात्य लोक तसंच रशियन लोक उदासीनता दाखवतात..ते म्हणणार..त्याचा पैसा त्याची मतं ..
त्याचे नियम .
कुणी काही का करेना ..आपण आपल्या पुरतं पहावं.
समाज देश सरकार अर्थ व्यवस्था यांची एकत्रित दृष्टी कशी राहते?
पहा..चायनीज लोकांना संशोधन नवनिर्माण पसंतीचं. अशी उधळमाधळ नापसंत.तिकडं तर सामूहिक विवाह नेहमीचे.उत्पन्नांची विषमता अधोरेखित होताना राग व्यक्त होतो.
हे खरे .पण मला वाटतं..श्रीमंतांनी मात्र खर्च अवश्य करावा.. सरकारला टॅक्स आणि कामगारांना उत्पन्न.
अरेंज्ड विवाहात एक नैराश्य असू शकते की नंतर असं मोकळं मजेचं काहीच नसतं म्हणून काहीजण हा एक मोठा सोहळा असल्यासारखे जगू पाहतात.
पण हे रीललाईफ नंतरच्या रिअल लाईफपेक्षा वेगळेच.
फोटो ग्राफर आणि कॅमेरा यांच्याशी सुसंवाद होतो
घनिष्ठता वाढते हे मात्र नक्कीच.
मार्केटमधे दाबून ठेवलेला काळा पैसा मोकळा तर होतो.
पण, अन्यथा खऱ्या प्रेमाची वाच्यता लोकांच्या उपस्थितीत का असावी?
आणि प्रेम हे गोपनीय राहण्यात महान पवित्र भारताचे सौंदर्य आहे.
७५० मिलियन लोकांनी पाहिलेले ३५०० लोकांनी उपस्थिती लावलेले प्रिन्स चार्ल्स डायनाचे लग्न नंतर कुठं टिकले? नजर लागली का हो?
लग्न लागण्यापेक्षा लावण्यापेक्षा ते टिकवणं ..
नंतरचं निभावणं ही खरं संस्कृतीचं टिकवून ठेवणे
असो..प्रीवेडिंग प्लॅनर कंपनीजना गुडलक..
👍🏿👍🏾👍🏽👍🏻👍🏼👍
यांचे शेअर घ्यायचे का नाही
हे तुमचं तुम्ही ठरवा.
पहायला विसरू नका..येत आहे..काॅमेडी सिनेमा
तिरूवीरचा द ग्रेट प्रिवेडिंग शो.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
टीप
—-
मला एक प्रश्न पडलाय
घुंघट काढत मुॅंह दिखाई
यातली कमाई या प्रीवेडिंगमुळे बुडत असणार
कारण आधीच( सगळं ?) दाखवून होतं.🥰😜🤪

