ब्लॉग लेखन (२४/११/२५)
खाली दिलेल्या वाक्यावरून ब्लॉग लेखन.
वाक्य :- आयुष्यामध्ये डिलीट बटन नक्की ठेवा,
कारण काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालंच पाहिजे.
शीर्षक :- मनातलं डिलीट बटन – सोडून देण्याची सुंदर कला….
(१) आयुष्यातलं डिलीट बटन :- नव्या श्वासाला वाट करून देणारी जादू!
आपल्या फोनमध्ये किंवा संगणकात” डिलीट” बटन नसतं तर? अवांतर फाइल्स, जुने फोटो, निरुपयोगी ॲप्स… सगळं एकत्र साठवून राहिलं असतं. जागा संपली असती, स्पीड कमी झाला असता आणि नवीन काहीही जतन करता आलं नसतं.
* अगदी तसंच आपल्या मनातचही!
आपण खूप काही आठवणी साठवत जातो जशा, नाती, आठवणी, काही शब्द किंवा प्रसंग, तक्रारी, जखमा म्हणजेच कटू आठवणी…
कधी गरज म्हणून, कधी सवयीमुळे तर कधी भावनांच्या दडपणामुळे. पण ज्या गोष्टी आयुष्याला पुढे जाऊ देत नाहीत…. त्या मागे सोडणं म्हणजेच” मनातलं डिलीट बटन” दाबणं.
(२) खोटी नाती – तुटलेल्या दोरीला धरून राहण्यात अर्थ नसतो.
काही नाती दिसायला अत्यंत सुंदर आणि गोड वाटतात. पण आतून रिकामीच असतात. आमचे किती चांगले संबंध आहेत हे फक्त दाखवण्यासाठीच हा खटाटोप. खायचे दात वेगळे मी दाखवायचे दात वेगळे तसंच काहीसं. ह्या आठवणी तुमचा वेळ, ऊर्जा आणि तुमचा विश्वास सगळं वापरून घेतात पण परत काही देत नाहीत.
अशी नाती टिकवण्यासाठी आयुष्य खर्च करण्यापेक्षा ती सोडून देणं अधिक शांततेच आणि शहाणपणाच होईल.” कधीतरी सुधारणा होईल “या आशेवर टिकणारी नाती जखमान पेक्षा खोल विष बनतात.
(३) चुकीची माणसं – जी मनावर ओरखडे सोडतात.
काही लोक तुमच्या चंगुलपणाचा फायदा घेतात. तुम्ही मोठे व्हावे, समाजात तुम्हाला मान मिळावा, तुमचं आयुष्य चांगलं व्हावं हे ज्यांना सहन होत नाही त्यांच्या नुसत्या उपस्थितीने ही वातावरण नकारात्मकच होतं.
ही माणसं सुख देत नाहीत
फक्त मानसिक भार वाढवतात. अशा लोकांना मनातून,” डिलीट” करणं म्हणजेच स्वतःच्या आयुष्याचं संरक्षण करणे असं मला वाटतं.
(४) चुकीच्या आठवणी – भूतकाळाला पकडून ठेवणारे काटे….
काही चुका, काही अपयश, काही विश्वासघात, काही अडचणीचे प्रसंग या सर्वांचे वजन किंवा ताण आल्यामुळे मन जड होतं.
आठवणी या सरपणाच्या निखाऱ्यासारख्या…..
घेतल्या तर हात भाजतो,
सोडल्या तर उडून जातात.
जे जाऊ दिलं ते, उडून गेले ते जाऊ द्या. त्याशिवाय नव्या आठवणींना जागा मिळत नाही.
(५) मनाची स्वच्छता ( इमोशनल डिटॉक्स )
कधी, कधी कोणतीच व्यक्ती आपल्याला त्रास देत नाही तर आपणच एखाद्या गोष्टीला किंवा घटनेला पकडून ठेवल्याने सतत आपल्याला त्रास होतो.
त्यासाठीच…..
मन साफ करणं म्हणजे,
स्वतःला दोष देणं थांबवणं.
भीतीला थाराच न देणे.
आणि मी पुरेशी किंवा पुरेसा नाही ही भावनाच जाळून टाकणं.
हे डिलीट बटन, ” असणाऱ्या ” गोष्टींवर नाही. तर “नसणाऱ्या, नसाव्यात ” अशा गोष्टींवर दाबायचं असतं.
(६) सीमा रेषा – जिथे स्वतःची जागा जपली जाते.
प्रत्येक नात्याला मर्यादा असतात.
जिथे तुमचं मन ओरडतं….
इथपर्यंत ठीक पण पुढे नको…
तिथे सीमारेषा अडवणं महत्त्वाचं नाही तर आवश्यकच.
सीमा म्हणजे भिंत नाही. ती स्वतःचा मान जपणारी चौकट आहे.
(७) नव्या गोष्टींसाठी जागा तयार करणे.
जुनं पुसलं की नवीन लिहिता येत. तेच जीवनालाही लागू पडतं.
खोट्या नात्यांनी जागा व्यापलेली असेल तर खरी माणसं तुमच्यापर्यंत पोहोचणार कशी?
दुखऱ्या आठवणींनी मन भरून ठेवलं तर, आनंदाला वावरायला जागा मिळणार कशी?
मोकळं मन म्हणजे सुपीक जमीन
ज्यावर आनंदाचे बी रुजतं!
(८) स्वतःवर प्रेम (सेल्फ केअर )
स्वतःला जपणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःला नको ते विसरण्याची परवानगी देणं, ही एक प्रकारची मुक्तीच!
डिलीट बटन म्हणजे सोडून देण्याचा निर्णय.
मनावरचं ओझं हलकं करण्याचा नियम.
संदेश :-
ज्यांना धरून ठेवणं तुम्हाला जखम देतं
त्यांना सोडून देणं तुम्हाला मुक्ती देत.
जीवनातलं, ” डिलीट बटन” हे विसरण्यासाठी नाही तर जपण्यासाठी आहे.
आपली शांती, आपला आनंद, आपलं आत्ममूल्य. जे नको आहे ते हटवा….
जे हवं आहे त्याला जागा द्या.
आणि आयुष्य नव्याने श्वास घ्यायला शिका.
शेवटी
रिकाम्या मनातच नव्या आनंदाची प्रकाश रेषा उजळते.
” जुनी जखम पुसली की, मन नव्याने फुलत,
डिलीटच्या एका स्पर्शाने आयुष्य उजळतं.”
सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Gave phoneclubapp a whirl. Seemed pretty straightforward, and easy to use! If you’re into phoneclubs like me, phoneclubapp might be just what you’re looking for.
Nhà cái ghi điểm ở việc ứng dụng AI và Big Data để phân tích hành vi người chơi, 188V từ đó tối ưu hóa giao diện và tính năng theo thói quen của từng thị trường. TONY01-26
ưu đãi 188v chính là bến đỗ an toàn nhất cho anh em cược thủ Việt. Uy tín – Bảo mật – Nhanh chóng là tôn chỉ hoạt động của chúng tôi. TONY01-30H