“वायरल व्हायचं म्हणून””
“फसव्या आभासी दुनियेची वावटळ”
आजचं जग – तंत्रज्ञानाच्या प्रकाशझोतात न्हालेलं, पण भावनिकदृष्ट्या थकलेलं. काही क्षणांसाठी मिळणारी व्हायरल प्रसिद्धी म्हणजे जणू तीन तास पाहिलेल्या एखाद्या चित्रपटासारखं. रंगतदार, मोहक, पण तात्पुरतं.
या झगमगाटामागे धावताना आपण नकळत कल्पनांच्या दुनियेत शिरतो. तिथं आपण ‘फेमस होण्याच्या’ नशेत इतके गुंततो की, आपण काय गमावतो आणि खरंच काय मिळवतोय – याचं भान सुटतं.
कधी कधी तर प्रसिद्धीच्या हौसेपोटी स्वतःलाच डावपणाला लावतो. एकदा व्हायरल झालं की त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो. पण काही क्षणांचं समाधान कायमस्वरूपी समाधान देत नाही. त्यातूनच निर्माण होतं एक भीषण नैराश्य – आणि सुरू होते एक वावटळ, जी माणसाला आतून पोखरत जाते.
मी म्हणत नाही की हे सगळं वाईटच आहे. कारण प्रत्येक अनुभव – चांगला असो वा वाईट – आपल्याला शिकवतो. पण या आभासी वावटळीच्या मोहात पडताना आपण जे हरवतो, ते म्हणजे “स्वतःचा ठाव”.
स्वतःसाठी थांब, विचार कर – जे तू करतोस ते तुला समाधान देतं का? की तूही एका बनावटी वावटळीचा भाग बनला आहेस?
एक मुलगी होती – साधी, गोड.
आपल्या डान्सच्या व्हिडिओमधून
एकदम रातोरात फेमस झाली
लोकांनी तिचं नाव , तिचे हावभाव कॉपी केले.
ती हसली, थरारली, ग्लॅमरच्या झगमगाटात शिरली. वाह वाह च्या भूल भुलैया ती अडकली भान विसरली मस्तीत, धुंदीत
पण एका क्षणी… तिच्या एका चुकीच्या वागण्यामुळे
तेच लोक तिच्यावर दगड फेकायला लागले.
कॉमेंट्समध्ये विष,
स्टोरीमध्ये उपहास,
आणि मनात… एक खोल जखम.
एक क्षणभरची प्रसिद्धी
मनात चटकन पेटते,
पण नंतर तिचं राख होऊन
ओळखीचं अस्तित्वही जळतं.
मी काय दाखवलं
आणि काय लपवलं –
यातलाच गोंधळ झाला.
लोकांना जे हवं ते दिलं,
पण स्वतःला जे हवं होतं –
ते मागेच राहिलं.
“मी” कुठे हरवली आहे
हे विचारायला वेळच नव्हता,
कारण हव्यास वायरल व्हायचं म्हणून तिचा
आत्मभानचं झिरपून गेलं होतं.
वायरल व्हायचं म्हणून
तिने जे केलं –
ते तिला मिळालंही,
पण ते तिला नीट जगता नाही आले आणि जपता नाही आलं मग हरवलं सार मिळवले सांभाळणं तेव्हा
ते खूपच मौल्यवान होतं. नाहीतर विष!!!वायरल व्हायचं म्हणून…”
“वायरल व्हायचं म्हणून”
तीन स्वतःला हरवलं,
कुठेतरी मनाचं आरसाच
पुसून टाकलं होता
फिल्टरमध्ये हसणं शिकले,
कॅमेऱ्यासाठी जिवंत झाले,
पण मनात मात्र
एक खोटं हास्य साचत गेलं.
लाइकसच्या मोजमापात
तीन स्वतःचं माणूसपण विसरले,
जगाने ‘वा’ म्हटल्यावर
आपण खरंच भारी आहोत –
असं मानायला लागले. स्वतःचे अस्तिव हरवले!!!

#माझ्यातली मी वीकेंडटास्क