वाट पंढरपुराची
उद्धट बायको आणि व्यसनी मुलगा यांना वैतागून जयवंतराव आत्महत्येचा विचार करून , घराबाहेर पडले .
जीव द्यायचा कसा? हा विचार करण्यासाठी त्यांनी आपली गाडी बाजूला थांबवली . आणि नेमकं त्याचवेळी विठ्ठल विठ्ठल म्हणत निघालेली दिंडी पाहता पाहता डोळ्यासमोर निघून गेली ….. एक वारकरी पायाला लागल्यामुळे सावकाश चालत होता . जयवंतराव : चल मी तुला गाडीतून सोडतो .
वारकरी : नाही साहेब मी चालतच जाणार… जर माझी सेवा करायची असेल तर ,फक्त माझ्याबरोबर चार पावले चला . मला बरे वाटेल .
चार पावले म्हणत म्हणत जयवंतराव पंढरपूरच गाठले. वाईट विचार तर केव्हाच
मनातून निघून गेले होते. …. आणि सोबत होता तो वारकरी पंढरपूर गाठताच गायब झाला होता .
शब्द संख्या १००
