स्त्री शक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही,
तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. या वाक्या वरून लघु कथा. (२९/९/२५)
तू फक्त चांगली स्त्री हो…..
विनीता एक हुशार वकील होती. तिला समाजात मान होता. एका मोठ्या नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमात तिला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. बक्षीस समारंभ झाला. नंतर विनीताचे भाषण सुरू झाले. ती म्हणाली, आपल्या समाजात देवांप्रमाणे देवींचेही तेवढेच महत्त्व आहे. देवी म्हणजेच स्त्री शक्ती, आपण नऊ दिवस वेगवेगळ्या शक्तींची पूजा करतो. प्रत्येक घरात आई, बहिण,बायको, मुलगी असतेच. फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रीने पण स्त्रीच्या वयाचा, नात्याचा व स्त्रीत्वाचा आदर केलाच पाहिजे. तोही फक्त नवरात्री पुरता नाही तर कायम. तिच्या भावनांची कदर करा. तिच्या अडीअडचणी समजावून घ्या. तुम्हाला होईल तितकी तिला मदत करा.
नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात, आणि घरातही काही ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रीच स्त्री वर अन्याय करते, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या स्त्रीला त्रास देते, स्पर्धा करा पण इर्षा, आकस ठेवू नका. मला माझ्या आया, बहिणींना एवढेच सांगायचे आहे की, तूम्ही कोणत्याही नात्यात असाल, त्या नात्याचा आदर करा. एक चांगली स्त्री व्हा. स्त्रीचे पावित्र्य जपा. आपल्या स्त्री शक्तीचा चांगल्या साठी उपयोग करा. आपल्या स्त्री जन्माचे सार्थक करा.
सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. मंडळाचे अध्यक्ष म्हणाले, मॅडम तूम्ही आज एक खरी स्त्री शक्ती आम्हाला दिलीत. धन्यवाद मॅडम.

खूप अप्रतिम लिहीलं
धन्यवाद सखी
खूप छान
बरोबर
खूप छान
अप्रतिम 👌
तूमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार🙏💕. यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळते. सख्यांनो मनापासून धन्यवाद.
तूम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार🙏💕. यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळते. सख्यांनो मनापासून धन्यवाद.
सुरेख कथा