#माझ्यातलीमी
#लघूकथा(७/१०/२५)
कथेचे शीर्षक :- नाव नसलेलं नातं
रात्रीचे साडे बारा वाजले होते. शहराच्या कडेला असलेल्या मीनाच्या छोट्या घरात गोंधळ माजला होता. वडिलांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. घाबरलेल्या छोट्या मीनाने एकामागून एक सर्व नातेवाईकांना फोन लावायला सुरुवात केली. कुणी फोन उचललाच नाही, तर कुणी आम्ही फार लांब राहतो यायला वेळ लागेल म्हणून टाळलं, तर काही जण येतो म्हणून आलेच नाही.
मीनाच्या डोळ्यात पाणी तरळले, एवढ्या मोठ्या कुटुंबात एकही माणूस संकटात उपयोगी नाही! हवालदील झाली. काय करावं ते सुचेना.
एवढ्यात सुनंदाताई सिनेमा पाहून परतल्या. मिनूचा दरवाजा उघडा कसा? म्हणून आत डोकावल्या. मीनू ने घाई घाईने त्यांना सर्व घडलेले सांगितलं. त्या क्षणी त्यांनी पुन्हा स्कूटर काढली. विनूच्या बाबांना मागे बसवलं आणि रुग्णालयात ताबडतोब पोहोचवलं. डॉक्टरांनी त्यांना वेळेवर उपचार करून वाचवलं.
दुसऱ्या दिवशी मिनू ने सुनंदाताईंना थँक्यू म्हणून कृतज्ञता व्यक्त केली म्हणाली,” ताई तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, आज बाबा जिवंत आहेत ते फक्त तुमच्यामुळेच. जवळ काकू राहते पण तिने फोन उचललाच नाही.
सुनंदाताई हसल्या,” मिनू! काही नात्यांना नाव नसतं- आणि काही नावापूर्तीच असतात ग!
मिनू च्या डोळ्यातून नकळत घळाघळा अश्रू वाहू लागले. सुनंदाताई मी तिला प्रेमाने जवळ घेतलं. आई विना पोरकी पोर.
मीनूला आता नात्याचं खरं मोल कळलं. रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जास्त उब देतात. त्या रात्री मनाशी पक्क ठरवलं
” नातं नसले तरी नात्यासारखे वागायचं, माणुसकी जपायची हाच खरा मानवधर्म! ”
शब्द संख्या:- १९१.
सौ स्मिता अनिल बोंद्रे.
©®

सुंदर कथा
वेळेला धावून येतात तीच नाती…. बिननावाची असली तरीही!