#माझ्यातलीमी
#अलक(१७/९/२०२५)
#वाक्य वापरून अल्क “मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही”
विसरलेली
आश्रमात आल्यावर निर्णय चूक की बरोबर, हा प्रश्न तिनं मनातून काढून टाकला होता.
ना आता ती कोणाकडून अपेक्षा करत होती की कोणी म्हणावे “मी तुझ्या बाजूने कधीच विचार केलाच नाही”
आणि…
गेट मधून तो येताना दिसला, क्षण भर डोळ्यात आशेचा झरा उगवला.
पण तो मुलाला सोबत घेऊन आला होता त्याच्या नव्या “आईला दाखवायला”
सौ सीमा अशोककुमार कुलकर्णी

