#माझ्यातलीमी
लघुकथा लेखन (१३/१०/२५)
“ज्या लोकांना तुमचं मोल कधी समजणार नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच हजर असता”या वाक्याला धरून लघुकथा लेखन.
कथेचे शीर्षक :- “लास्ट सीन”.
गावात आदित्य आणि त्याची आई दोघेच एकमेकांसाठी होते. पण आदित्य नोकरी निमित्ताने बंगलोरला शिफ्ट झाला आणि त्याची आई एकटीच मागे उरली. ती गावच्या बचत गटाच्या कामाचा डोलारा सांभाळायला मदत करू लागली. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागली.
तिकडे आदित्यनेही नव्या कामात स्वतःला बुडवून घेतले. आदित्य तरुण होता, रुबाबदार होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता.
सकाळपासून रात्रीपर्यंत कॉल्स, मीटिंग, मेसेजेस… त्याचे जीवन म्हणजे डिजिटल मॅरेथॉनच!. कामाच्या पसाऱ्यात आईकडे थोडं दुर्लक्ष व्हायचं खरं, पण आई मात्र न विसरता दररोज फोन करी.
अदू, बाळा जेवलास का रे? (आईची काळजी)
तो म्हणायचा,” आई, नंतर बोलतो ग!. मी ऑन कॉल आहे”.
आठवडाभर तिचे कॉल मिस मध्ये गेले.
एका संध्याकाळी आईचा मेसेज,” अदू, माझी आज तब्येत थोडी बरी नाही, बोलतोस का, थोड्यावेळ?
आई, माझी आत्ता लगेच मिटींग आहे ती संपली की कॉल करतो, असा रिप्लाय दिला.
त्याच रात्री रुग्णालयातून फोन आला,” तुमची आई आता नाही!”
आदित्यने फोन हातात धरला, पण नेटवर्क नव्हतं, जगाशी कनेक्ट असलेला आदित्य, आपल्या आईशी कायमचा डिस्कनेक्ट झाला होता.
दुसऱ्या दिवशी आईच्या मोबाईलला शेवटचा स्टेटस होता….” त्याच्यासाठी मी नेहमीच हजर असते.पण..पण आज तो दिसला नाही, बोललाही नाही”
आदित्यच्या डोळ्यातून फोनच्या स्क्रीनवर एक,एक ओघळू लागला
तो थेंब म्हणत होता…..
” त्या लोकांना तुमचं मूळं कधीच समजणार नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच हजर असता”.
शब्द संख्या :- २००
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

खूप सुंदर कथा
हृदयस्पर्शी कथा 👌👌
खूप सुंदर कथा
खूप छान कथा
So touchy
खूप छान