#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (१५/९/२५)
कथेचे शीर्षक :- रिकाम्या खुर्चीचा आधार.
वृद्धाश्रमात संध्याकाळच्या वेळी सर्वच आजी आजोबा गप्पा मारत बसायचे. एकमेकांची सुखदुःखे वाटून घ्यायचे. पण त्यांच्यातल्या सुरेखा काकू मात्र शांत बसून सतत खिडकीच्या बाहेर पहात राहायच्या. त्यांच्या शेजारची खुर्ची कायमच रिकामी असायची. ती जागा त्यांनी आपल्या लाडक्या नातीसाठी जणू राखून ठेवली होती.
नातीला दोन वर्षापासून भेटायला वेळच मिळाला नव्हता. आजूबाजूचे, आश्रमातील मंडळी सतत कुजबुजायचे….” तिचं खरं तर कुणीच नाही, ती फक्त वाट बघते”…
सुरेखा काकूंच्या डोळ्यातून वेदना आणि दुःख साफ झळकायचं.
एके दिवशी अचानकपणे आश्रमात पत्रकार आले. मुलाखती घेण्यासाठी. प्रश्न उत्तरांमध्ये कोणीतरी सुरेखा काकून बद्दल बोललं, म्हणाले,” त्या नशिबाने एकट्याच आहेत!”
त्याच क्षणी शेजारच्या खुर्चीवरचा रामू ,जो आश्रमातील लहान -सहान काम करणारा, झटकन उठला आणि म्हणाला,” कोण त्यांना एकट म्हणतय?”मी तर रोज त्यांच्यासोबत चहा घेतो, त्यांच्याकडून गोष्टी ऐकतो, त्यांच्या चेहऱ्यावरचे हसूही पाहतो. त्या माझ्या आजी आहेत. आणि मी त्यांचा लाडका नातू!”
सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. सुरेखा काकूंनी तर रामूला घट्ट मिठी मारली. (जणू जादू की झप्पी) त्यांना जाणवलं….. खरी साथ रक्ताच्या नात्याने ठरत नाही, तर मनाच्या नात्याने ठरते.
त्याच क्षणी प्रत्येकाला समजलं…..
“सोबत त्यांचीच घेऊन फिरा, जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमचीच बाजू मांडतील!”
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.©®
(शब्द संख्या :- १७३)

मस्त कथा.
खूप सुंदर
व्वा सुरेख कथा