लघुकथा…”वारी अंतरीची!”

कथा
शीर्षक :- ” वारी अंतरीची!”.

वारीला निघालेले ते वृद्ध जोडपं…

डोक्यावर तुळशी वृंदावन, हातामध्ये टाळ, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध.
विठ्ठल नामाचा गजर, पावलांनाही लय सापडली.
नाचता, नाचता ती थबकली. श्वास अडकलेला. रुग्णालयात दाखल. मनातच म्हणाली,” विठू, यंदा राहूनच गेलं!”. तिने डोळे मिटले.

पण कानामध्ये ओव्या दुमदुमल्या आणि समोर विठ्ठलच उभा!.
तो म्हणाला,” मीच आलो तुला भेटायला!”.
तुझी भक्तीपूर्वक हाक ऐकताच धावतच आलो. आता तुझी वारी पूर्ण झाली म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला.

त्याच क्षणी, विठ्ठल, विठ्ठल जय हरी!. असे पुटपुटत शुद्धीवर आली. डॉक्टर म्हणाले,” चमत्कारच आहे!”.

वारी ही शरीराची नव्हे तर ती मनाची अवस्था आहे. देवाशी एकरूप होण्याची ओढच. जणु भक्त आणि परमेश्वराचे अद्वैतच!.

शब्द संख्या (१००)
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!