” त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता “… या वाक्याचा उपयोग करून लघुकथा (१३/१०/२५)
हुकमी एक्का
रमा व सावनी लहानपणीच्या मैत्रीणी. रमा दिसायला चांगली व श्रीमंत घरात जन्मलेली तर सावनी दिसायला चारचौघीं सारखी व मध्यम वर्गातील, खाऊन पिऊन सुखी कुटुंबातील. सावनी दिवसभर रमाकडेच असायची. ती त्यांच्याच घरातली एक मेंबर होती. रमाची ती हुकमी एक्का होती. अति परिचयात अवज्ञा म्हणतात तशी अवस्था सावनीची झाली होती. रमा तिला सर्व बाबतीत गृहीत धरायला लागली.
रमा आपल्याला गृहीत धरते, आपण नेहमीच तिच्या गरजेला हजर असतो पण त्याची तिला किंमत नाही हे तिच्या व त्यांची जवळची मैत्रीण विभाच्या लक्षात आले. हे तिच्या तोंडून वदवून घेण्यासाठी त्यांनी एक प्लॅन केला. रमा एकटी असताना मुद्दाम रमाला विचारले, काय गं आज तूझा हुकमी एक्का नाहीये तर तूला करमत नसेल ना? अडून रहात असेल तुझे? रमा म्हणाली, छे गं, तिच्या मुळे माझे काही अडून रहात नाही व तूम्ही आहात ना माझ्या बरोबर. हे मागे उभ्या असलेल्या सावनीने ऐकले व पुढे येऊन म्हणाली, ओके….. माझेही तुझ्या वाचून काही अडणार नाही असे म्हणून निघून गेली. चार दिवस झाले सावनी काॅलेजला तिच्या बरोबर येत नाही. काहीतरी कारण सांगून तिला टाळते. काॅलेज मध्येही इतर मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रहायला लागली. हळूहळू रमाला अभ्यासात, खेळात, खरेदीसाठी तिची कमी जाणवायला लागली. सावनीमुळे तिचे अडून रहायला लागले. स्वतःची चुक लक्षात आली. रमाने शेवटी सावनीची माफी मागितली व परत मी असे कधीही बोलणार नाही, म्हणून वचन दिले. सावनीने पण फार ताणून न धरता तिला माफ केले व परत त्यांची मैत्री पहिल्या सारखी झाली.
शब्द संख्या : २४५

खूप छान कथा
मस्त
खूप छान कथा 👍👍
Khup chan
सुरेख
मतलबाची मैत्री