लघुकथा टास्क (२७/१०/२५)
खालील दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा.
“सौंदर्य सर्वांनाच आवडतं, काहींना चेहऱ्याचं काहींना मनाच “.
कथेचे शीर्षक:- ज्योती .
नेहा ही आंधळी होती, जन्मतःच तिने जगाचे रंग पाहिले नव्हते. पण तिच्या मनातले रंग मात्र इंद्रधनुष्यापेक्षाही सुंदर होते. ती नेहमी म्हणायची देवा,”मी स्वतःचा चेहरा पाहू शकत नाही पण कुणाचं मन ओळखायला मला नजरेची गरजच नाही!”
शाळेतील सर्वजण तिच्या मनमोकळ्या हास्यावर, तिच्या गोड अर्थपूर्ण बोलण्यावर, सकारात्मकतेवर फिदा होते. तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य नसलं तरी विचारातून सौंदर्य झळके. ती सतत कोणाचेही मन आपल्यामुळे दुखावू नये याची काळजी घ्यायची.
एके दिवशी तिच्या वर्गातील नव्याने ऍडमिशन घेतलेला यशस्वी हा विद्यार्थी तिच्याशी स्वतःहूनच ओळख करून घेतो. नेत्राच्या आंधळेपणाची यशस्वीला जाणीव होती तरीही तिच्या विचारांनी तो भारावून जायचा. एके दिवशी तो नेत्राला म्हणाला,” नेत्रा तू अजिबातच सुंदर दिसत नाही, असे सगळेजण नेहमीच म्हणतात, पण मला असं वाटतं तू सर्वात सुंदर आहेस “.
नेत्रा हसून म्हणाली,” मी डोळ्यांनी जग पाहू शकत नाही पण तू मात्र मनाने पाहिलंस! आणि खरंच सौंदर्य तिथेच असतं.”
त्याच क्षणी यशस्वी ला जाणवलं- सौंदर्य चेहऱ्यात नाही ते आत्म्यात असतं. वागण्यात, विचारात आणि हृदयाच्या निर्मळतेत असतं.
चेहऱ्याचा क्षणभर मोह पडतो पण स्वभाव मात्र आयुष्यभर जपला जातो आणि तेच खरं सौंदर्य आहे .
याची खूणगाठ मनाशी बांधली.
शब्द संख्या : १७२.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
