विक्रम ने तिचा हात हातात घेतला.मला तुझ्या कडून याच उत्तराची अपेक्षा होती.दोघे मग आनंदाने घरी परतले.थोड्याच दिवसात विक्रम आणि इशा चे लग्न झाले.आठवडा भर दोघे हनिमून ला जावून आले.इशा ने जॉब साठी बऱ्याच ठिकाणी ॲपलाय केला होता. विक्रम ची आई वनिता घरात सगळे काम करत असायच्या.विक्रम ची बहिण लग्न करून सासरी गेली होती.इशा ला स्वय पाक वैगेरे इतका जमत नव्हता.तरी ती वनिता ला जमेल तशी मदत करत होती.एक दिवस इशा ने सिव्हलेस कुर्ता घातला,तसे वनिता म्हणाली,इशा अग आता तू या घरची सून आहेस तेव्हा असे सिव्हलेस कपडे नको वापरू बरे नाही दिसत ते.अहो,आई आजकाल असे ड्रेस कॉमन आहेत.त्यात काय एवढेइशा घरात तुझे सासरे आहेत हे विसरू नकोस.मग इशा नाराजीने रूम मध्ये गेली.विक्रम त्याच आवरत होता.इशा,काय झाले अशी चेहरा पाडून का आलीस.?विक्रम या ड्रेस मध्ये काय वाईट आहे सांग. फक्त सिव्हलेस आहे म्हणून तो घालायचा नाही का?इशू एक माझे जरा तिला बेड वर बसवत तो म्हणाला,आई जरा जुन्या विचार सरणी ची आहे.तिला या गोष्टी बघण्याची सवय नाही,आता तुझ्या मुळे होईल पण थोडे दिवस तिच्या कलाने घे ना प्लीज.विक्रम च्या बोलण्याने इशा ने ड्रेस चेंज केला.
विक्रम अरे आपल्या गावच्या देवी ची यात्रा आहे दर वर्षी ची.आपल्याला जायला हवे..आई त्याला सांगत होती.हो आई जाऊयात आपण सगळे.रात्री इशा त्याला म्हणाली,विक्रम अरे गाव किती लांब आहे आपल कुठे त्या कर्नाटक राज्यात.जायला यायला किती वेळ लागले.कस शक्य आहे हे.इशु ती देवी आमचे कुलदैवत आहे,जायला हवे असे पण आपले लग्न झाले आहे.आशीर्वाद घेवून येवू.विक्रम सगळ तू आई चे ऐकतोस का.त्यांच्या हो ला हो.अरे मला अचानक इंटर व्यूह साठी बोलवणे येईल.या ट्रीप मुळे माझी संधी नको मिस व्हायला.इशु एक नोकरी गेली तर दुसरी मिळेल तू आहेस इतकी हुशार.आता आई ला शब्द दिलाय मी.इशा चरफडत राहिली .तिने आई ला कॉल लावला.इशा अग आताच नवीन लग्न झालय तुमचं.जरा सासर च्या रीतीने वाग काही फरक नाही पडत.तुझी मर्जी नको चालवू. सुरवातीला सगळ्याच जणी या परिस्थती मधून जातात.नंतर मग सगळ मना सारखे होते.जरा धीर धर.इशा नाराज झाली.अरे लग्न झाले म्हणून काय माझे आयुष्य बदलून जाणार का? मला माझ्या मना सारख जगायला वाट पहावी लागणार?इशा विचारात हरवून गेली.दोन दिवसांनी गावाला जायची तयारी केली.विक्रम च्या कार मधून ते गावी गेले.ते एक तर खेडे गाव त्यात यात्रा असल्याने खूप गर्दी होती.धूळ माती आणि उन्ह याने इशा बेजार झाली होती.कधी इथून निघतो अस तिला झाले.त्यात अंगावर साडी..जाम वैतागली होती ती.एका कंपनी कडून तिला इंटर व्यूह साठी बोलवणेआले पण नेमके उद्याची वेळ दिली होती.जे ईशाला शक्य नव्हते.कारण अजून ते गावीच होते.विक्रम ..मी बोलले होते तुला.गेली ना ही संधी.तिने तो मेल त्याला दाखवला होता.इशा परिस्थिती समजून घेत जा.सगळ मना सारख आणि तुझ्या वेळे नुसार होईल अशी अपेक्षा नको करुस.व्हॉट डू यू वॉन्ट टु से विक्रम? विसरलास लग्ना आधी आपल काय बोलणे झाले होते.
क्रमशः..
लग्नाची बेडी. (भाग ३)
इशा परिस्थिती समजून घेत जा.सगळ मना सारख आणि तुझ्या वेळे नुसार होईल अशी अपेक्षा नको करुस.व्हॉट डू यू वॉन्ट टु से विक्रम? विसरलास लग्ना आधी आपल काय बोलणे झाले होते.
इशा आता मला कुठल्याच विषयावर काही बोलायचे नाही ओके.गावा वरून ते सगळे घरी परत आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी इशा ला कसे तरी अन् इझी फिल होत होते. मळ मळ त होते.तिला वाटले गावी राहिलो दोन दिवस तिथले जेवण पाणी बाधले असेल.ती काही न खाता रूम मध्ये बसून होती.विक्रम ऑफिस ला गेला होता.सहज इशाचे कॅलेंडर कडे लक्ष गेले.आणि तिला एकदम झटका बसला अरे गेल्या महिन्यात मला पिरियड आलेच नाहीत.लग्न होऊन चार महिने होत आले होते.लग्ना नंतर एकदा पाळी येवून गेली.इशा पटकन मेडिकल स्टोअर मध्ये गेली आणि प्रेगनन्सी किट घेवून आली. तिने चेक केले तर ती प्रेग्नंट होती.तीच डोकं काम करेनासे झाले.
संध्याकाळी विक्रम घरी आला.दिवसभर इशा ने पेशंस ठेवला होता तो आता संपला.”विक्रम मला तुझ्याशी बोलायचे आहे थोडे.इशु जस्ट आलोय मी.मला चहा तरी दे.बोलू रात्री आपण.
विक्रम इट्स इंपॉर्टन्ट.इशु,काय आहे इतकं.विक्रम आय एम प्रेग्नेंट.
मग काय यात काय बोलण्या सारखे?विक्रम तू प्रिकॉशन्स घेत होतास ना.मग कसे झाले हे आणि मला आताच मुल नको आहे.अजून माझं नोकरी चे कुठे काही होत नाही.
तुला काय महनायचे आहे? मी नेहमी प्रिकॉशन घेतली आहे.कधी कधी ॲक्सिडेनटली अशा गोष्टी घडतात.विक्रम मी ॲबोर्षन करणार आहे.तू उद्या माझ्या सोबत हॉस्पिटल मध्ये येतो आहेस.सकाळी ते दोघे आवरून निघाले तेव्हा घरात सांगणे भाग होते.
आई म्हणाल्या,इशा अग पहिल्यांदा असे गर्भपात केले तर पुढे मुल होण्यात अडचण येवू शकते.बघ विचार कर.नाही
आई मी पूर्ण विचार केला आहे.मला या मुलाच्या बेडीत अडकवून तुम्ही जर मला घरी बसवण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही.
इशा तुला का अडकवून ठेवू आम्ही.असा विचार पण नाही आमच्या मनात.आई म्हणाल्या.
मला नको आहे आता हे मुल.चल विक्रम .
इशा जरा बोलण्यावर संयम ठेव.कोणाशी काय बोलतो याचा विचार करत जा.अँड गिव्ह रिस्पेकट टू माय परेंट्स.
मी ही तेच म्हणतेय विक्रम.लग्न होऊन चार महिने झाले आणि लगेच मी प्रेग्नेंट राहू? माझं करियर माझ्या साठी महत्वाचे आहे.इशा ने ॲबोर्षन केले.
थोड्या दिवसात तिला एका कंपनी कडून जॉब ची ऑफर आली.आता इशा ही ऑफिस ला जावू लागली .कमी पगार होता सुरवातीला पण घरी बसण्या पेक्षा बेटर म्हणून तिने ही नोकरी स्वीकारली.असेच वर्ष होत आले एकदा इशा च्या ऑफिस मध्ये पार्टी होती त्यामुळे ती उशिरा घरी आली.त्यावरून आई तिला बोलल्या.अस घरच्या सुनेने इतका वेळ बाहेर राहणे चांगले नाही म्हणाल्या.यावरून पुन्हा विक्रम आणि इशा मध्ये वाद झाला.
हलली इशा विक्रम च्या जास्त जवळ पण जात नसे.मागच्या अनुभवा वरून तिला पुन्हा प्रेग्नंट होण्याची भीती होती.आणि मुलात तिला अडून पडायचे नव्हते.कंटाळा आला आहे,दमले आहे अशी कारणे ती विक्रम ला देत असे.या वरून तो ही चिडचिड करत असे.
इशा चे काम आणि प्रामाणिक पना बघता तिला ऑफिस मध्ये लगेच इंक्रीमेंट मिळाले.पुढे तिला प्रमोशन चे चांसेस ही होते.त्या डेडीकेशंस ने ती काम करत होती.
विक्रम च्या ऑफिस मधून त्याला त्यांच्या कंपनी च्या सिंगापूर ब्रांच मध्ये प्रमोशन दिले.तो तिथला मेन हेड झाला होता.घरी पेढे घेवून आला तो.आई बाबा ना ही बातमी सांगितली.ते खुश झाले.काही वर्ष मात्र त्याला सिंगापूर ला जावे लागणार होते इशा अजून घरी आली नव्हती.इशा घरी आली तसे विक्रम ने तिला ती बातमी सांगितली.
विक्रम पण तू ही ऑफर का घेतलीस? माझा विचार केलास का?ईशू,कसला विचार करायचा.अग डबबल पगार,राहायला फ्लॅट.गाडी सगळ कंपनी देणार आहे आणि दरवर्षी फॉरेन ट्रीप दोघां साठी. यात मी कुठे आहे विक्रम? अँड व्हाट अबाऊट माय जॉब अँड करियर? इशू अग सिंगापूर मध्ये तुला ही जॉब मिळेल.
कधी? तिथे राहून चार सहा महिने शोधा शोध केल्यावर जॉब मिळेल ना मिळेल तो पर्यंत तुझी बायको बनून राहू फक्त.
अरे तुला नेमका कसला प्रॉब्लेम आहे. नवर्याला प्रमोशन मिळाले याचा तुला आनंद नाही का झाला? आणि सारख तू तुझा जॉब तुझं करियर यावरच बोलत असतेस इशु.
मग चुकीचे बोलते का मी विक्रम.? मी उच्च शिक्षण घरात बसायला नाही घेतले.घरच्या जबाबदारीत मला अडकवून तू माझ्या पायात बेडी अडकवू नाही शकत समजलास मी तुला कशात अडकवले आहे सांग? मुल नको म्हणालीस ते पाडून टाकले आता नोकरी करतेस त्याला ही कोणाची आडकाठी नाही.मग काय प्रोब्लेम आहे तुझा?
विक्रम,तुझा जॉब तुझं प्रमोशन,तुझे करियर महत्वाचे आणि माझा जॉब करियर याला काहीच महत्व नाही का?ते मी नाकारत नाही ईशु बट आय डोन्ट वॉन्ट टु लूज धिसअँपोरच्युनिटी.खूप कमी वेळात मला ही संधी चालून आली आहे.
विक्रम मला विचार करावा लागेल.माझा आता कुठे जम बसत आहे .मला ही प्रमोशनची संधी आहे.मी तुझ्या सोबत यायचे की नाही लेट मि थिंक.विक्रम चा आनंद विरून गेला. इशा असा काही विचार करेल अस त्याला वाटले नव्हते.त्याच तिच्यावर प्रेम ही होते.दोन चार दिवस त्याने विचार केला.
मग आई बाबा आणि इशा समोर म्हणाला,आई बाबा मी माझे प्रमोशन कॅन्सल करत आहे.
का रे विक्रम .अरे आम्ही नीट काळजी घेवू आमची.तू नको आमच्या साठी ही संधी सोडुस.आई म्हणाली.
नाही आई तुमच्या साठी नाही इशा साठी.आई जस माझं करियर महत्वाचे आहे तसे तिचे ही आहे.तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणे एक नवरा म्हणून माझी ती जबाबदारी आहे.कस असते ना आई मुलीचे लग्न झाले की तिचे शिक्षण,करियर याला थोडी खीळ बसते.संसाराच्या जबाबदा ऱ्या ,मग मुल या लग्नाच्या बेडीत ती मुलगी अडकून पडते.मनात किती ही इच्छा असली तरी तिचे पाय या लग्न बंधनात,बेडीत अडकून पडतात.मला इशा ला अडकवून नाही ठेवायचे.तिचे शिक्षण तिची हुशारी मला लग्नाच्या या बेडीत नाही अडकवून ठेवायची.इशा चे डोळे भरून आले इतका समजस नवरा मिळाला याचा तिला अभिमान वाटला .
रात्री त्याच्या कुशीत शिरून रडली ती.विक्रम ,मी तुला खूप वेगळा समजले होते.तू मुद्दाम मला घरच्या जबाबदारीत अडकवतो आहेस अस वाटत होते आय एम सॉरी.इशु अग मी स्व; ता इतका शिकलेला आहे.मला समजते तुझे शिक्षण ही माझ्या इतकेच महत्वाचे आहे . मला तुला कशातच अडकवून तुझं करियर खराब नाही करायचे.लव यू विक्रम म्हणत ईशू अजूनच त्याला घट्ट बिलगली.
(मुलीच्या शिक्षणाचा,हुशारी चा आदर करा.तिला तीच करियर मना सारखे करू द्या.लग्न,परंपरा,रीती रीवाजाच्या बेडीत तिला अडकवून तिची गळचेपी करू नका.तिला मान सन्मान द्या तिच्या कामाचं कौतुक करा.मग त्या बदल्यात ती ही तुम्हाला तितकेच
सूख आणि प्रेम देईल यात शंका नाही)
समाप्त.
