रेडिओ शो, मी आरजे

मी आरजे…. (११/७/२५)

नमस्कार मंडळी, मी आरजे जयश्री, तुमच्या सर्वांचे रेडिओ ९९.८ या चॅनलवर शनिवारच्या संध्याकाळच्या चारच्या भेटीगाठी या कार्यक्रमात स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे. मजेत ना? आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला आपल्या पाहुण्यांना काही प्रश्न विचारायचे असेतील तर आपल्या नेहमीच्या या नंबर वर संपर्क करा. नंबर ×××××××

आज आपल्या स्टुडीओत भेटीगाठी या कार्यक्रमात माझ्यातली मी च्या सर्वेसर्वा मा. सौ. संगीता देवकर मॅडम आल्या आहेत. नमस्कार, मॅडम, तुमचे आमच्या भेटीगाठी कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, जयश्री ताई. मॅडम सर्वात आधी तुमच्या ग्रुपला दोन वर्षे झाली व तुम्ही वेबसाइट सुरू केलीत त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचाली करता हार्दीक शुभेच्छा. धन्यवाद जयश्री ताई.

मॅडम मला सांगा, तुम्हाला असा ग्रुप काढावा असे का वाटले? ताई, मला लहानपणापासून लिखाणाची आवड आहे. मी वेगवेगळ्या ग्रुपवर, वर्तमान पत्रात लिहिते. सर्वांना माझे लेख, कविता व इतर प्रासंगिक लिखाण आवडते व ते लोकं माझे लिखाण द्या म्हणून सांगतात. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्या सारख्यांना असा मंच उपलब्ध करून दिला तर त्यांना पण लाहिता येईल, त्यांच्या या गुणांना वाव देता येईल. या उद्देशाने मी हा ग्रुप सुरु केला. मला लिखाणा बरोबर आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्यायला आवडते. माझ्या बरोबरचे मला त्यांचे लिखाण दाखवतात व त्यात काही सुधारणा हवी का विचारतात. मॅडम, एक फोन येतोय तो आपण घेऊया. नमस्कार, स्मिता ताई, तुम्ही कुठून बोलताय? नमस्कार जयश्री ताई व मॅडमना पण माझा नमस्कार. मी पुण्यातून बोलते. मला मॅडमना सांगायचे आहे की, तुम्ही जे टास्क देता त्यांचा विषय अतिशय चांगला असतो व तुम्ही देता ती सर्टिफिकेट पण खूप छान असतात. मला आपल्या गेट टुगेदरला येता आले नाही तर परत एकदा गेट टुगेदर कराल का? मॅडम म्हणाल्या, धन्यवाद स्मिता ताई. परत नक्की गेट टुगेदर करुयात. स्मिता ताई तुम्ही सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

मॅडम आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. मंडळी कुठेही जाऊ नका थोड्याच वेळात आपल्याला मॅडमचे विचार ऐकायचे आहेत. जाहिरात…… आला पावसाळा तब्येत सांभाळा, रोज एक चमचा च्यवनप्राश घ्या….

मंडळी ब्रेक नंतर तुमचे स्वागत. मॅडम तुमचे पण स्वागत आहे. हॅलो,नमस्कार, बोला रोहिणी ताई.. नमस्कार जयश्री ताई मला संगीता मॅडमना विचारायचे आहे की, तुम्ही सुरू केलेल्या वेबसाइटवर आम्ही टास्क नसताना आमचे लिखाण पाठवू शकतो का? हो, नक्की पाठवा. याच साठी मी वेबसाइट सुरू केली आहे की, तुमचे लिखाण जास्तीत जास्त लोकांना वाचता येईल. धन्यवाद संगीता मॅडम व जयश्री ताई. रोहिणी ताई तुमचेही आभार तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात याचा आनंद झाला.

मॅडम, मगाशी आपला विषय अर्धवट राहिला प्लिज तुम्ही काय सांगत होतात. मला लोकं त्यांचे लिखाण दाखवतात व काही सुधारणा हवी का विचारतात तेव्हा लक्षात आले की अनेक लेखकांना मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून मी ऑनलाईन कार्य शाळा घेते व लिखाण कसे करावे याचे मार्गदर्शन करते. यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो. खरंच खूप चांगली कल्पना आहे. मॅडम एक छोटासा ब्रेक घेऊया. मंडळी कुठेही जाऊ नका लवकरच मॅडमशी खूप गप्पा मारायच्या आहेत.
जाहिरात….. आई, कोणती उदबत्ती लावलीस? वास सुंदर आहे. अगं, आपली नेहमीचीच सायकल ब्रॅड चंदन अगरबत्ती.

मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचे व मॅडम तूमचेही परत एकदा स्वागत. मॅडम, तुम्ही जे टास्क देता त्यांचे काही प्रकार असतात का? चांगला प्रश्न विचारलात. सर्व प्रकारचे लिखाण लिहायला मिळावे म्हणून, चारोळी, कविता, अलक, कथा, शतशब्दकथा, ब्लॉग व प्रासंगिक विषय देते. ग्रुपमधील सर्व लेखक उस्फूर्त पणे लिहितात. मॅडम तुमचा हा ग्रुप फक्त स्त्रियांसाठीच आहे की…. नाही. मला सांगायला आनंद होतो की, आमच्या ग्रुप मध्ये काही पुरुष मेंबर्स पण आहेत व तेही छान लिहितात व इतरांच्या लिखाणाला दाद पण देतात. व्वा मॅडम खरंच हि खूप आनंदाची गोष्ट आहे. मॅडम तुमचे अजून काही उपक्रम आहेत का? हो आम्ही ऑनलाईन एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा पण आयोजित करतो. त्याला प्रतिसाद कसा असतो? खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

मॅडम वेळे अभावी आपल्याला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो आहे . जाता जाता एक विनंती आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी एवढेच सांगिन की, लिहित रहा लिखाणातून तुमचे विचार व्यक्त करा व तुमचे अनुभव सगळ्यांना सांगा. संगीता मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात व तुमच्या कार्याची माहिती दिलीत त्या साठी मनापासून धन्यवाद. परत एकदा तुम्हाला व तुमच्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला बोलावलेत त्या बद्दल तुमचे व तूमच्या सहकार्यांचे आभार.

मंडळी तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात मॅडमना आज एका ठिकाणी मुख्य पाहुण्या म्हणून जायचे होते, त्यामुळे काहींचे फोन घेता आले नाहीत त्यासाठी क्षमस्व. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. परत आपली भेट पुढच्या शनिवारी याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत आपली व आपल्या माणसांची काळजी घ्या.

One comment

  1. खुप सुंदर..मला खरच सेलिब्रिटी असल्याचा फिल आला.मस्त मस्त👌👌👌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!