राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?
राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने?
कवी संदीप खरे .
राधे तुला वेड हे कोणाचे लागले.
ध्यानी मनी तो श्रीरंग,तन मन त्याच्यात भिजले
रूप तुझे खुलून आले,प्रीत नशा ही न्यारी
सावळ्या चा रंग लागला,यमुना ही निळी भासली.
राधे गाल तुझे सांग कशाने आरक्तलेले.
मधुर गोड हास्या मागे काय गुपित दडलेले.
भाव विभोर डोळे वाट कोणाची पाहतात.
सावळ्याच्या बासुरी वर पाय आपोआप थबकतात.
राधे तुला राहिले ना कशाचे आता भान.
इतके तल्लीन एकरूप दोन जीव एक समान.
उधळला रंग त्याने ,प्रीत बावरी राधा राणी.
राधा कृष्ण राधा कृष्ण , प्रीत जगी अमर झाली..