#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (६/९/२५) #समानब्लॉगटास्क #कथालेखन #रमाई_नंदनवन ***** रमाई नंदनवन ***** 🌹🌱🌷🌷🌱🌱🌷🌷🌱🌹 💚 भाग १ .. 💚 ————————– आनंदावर दुःखाची सावली : लेखिका : स्वाती येवले ✨✨✨✨✨✨✨✨✨✨ रमेशच्या मागे त्याची आई हात धुवून लागलेली की काही मुलींचे फोटो आहेत , बघून घे ..आता लग्नाचं वय झालं ना तुझं .. पण रमेश काही दाद देत नव्हता .. कारण त्याने ठरवलेलं, लग्न करेल तर जुई बरोबरच ..जुई रमेश एकाच कॉलेज मध्ये शिकत होते ..तेव्हापासून त्यांच्यात प्रेम झालं.. जुई एकदम बिनधास्त , बडबडी , हुशार ,प्रेमळ आणि गोड मुलगी ..रमेश हुशार, थोडासा लाजाळू ,शांत ,अबोल मुलगा .. पण तरी पूर्ण कॉलेज मध्ये त्यांना मेड फॉर इच अदर म्हणायचे कारण दोघांचं एकमेकांपासून पान ही हलायच नाही ..दोघे सतत बरोबर असायचे ..कॉलेज संपलं, दोघांनाही छान नोकऱ्या मिळाल्या मग लग्नासाठी जुई चे आई वडील तिच्या मागे लागले ..जुई ने रमेश शी ओळख करून दिली आणि लग्न करेल ते ह्याच्याशीच सांगून मोकळी झाली .. जुई च्या आई वडिलांनी होकार दिला कारण जुई ने एकदा ठरवलं ते ठरवलं तिला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांना ही माहित होत .. पण रमेश ने जेव्हा त्याच्या घरात सांगितलं तेव्हा रमेश चे आई वडील तयार नव्हते कारण त्यांना त्यांच्याच जातीची मुलगी हवी होती … एकदा जुई त्यांना डायरेक्ट जाऊन भेटली आणि म्हणाली, “अहो कसली जात पात धरून बसता?तुम्ही परवानगी द्या नाहीतर आम्ही आमचं आमचं लग्न करून घेऊ .. ” जुई च्या ह्याच बिनधास्तपणा वर तर रमेश फिदा होता…शेवटी एकदाचे रमेशचे आई वडील तयार झालेत .. लग्न करून जुई रमेश च्या घरी आली .. रमेश च्या आईला तर भीतीच वाटत होती की ह्या फटाकडी सुनेबरोबर तिचा कसा निभाव लागला .. पण जुई जितकी फटाकडी ,बिनधास्त होती तितकीच ती खूप प्रेमळ होती आणि मुख्य म्हणजे रमेश आई वडिलांचा एकुलता एक मुलगा , अतिशय साधा सरळ प्रामाणिक मुलगा तर तो कधीच तिच्या कुठल्या वागण्याने दुखावला जाणार नाही ह्याची ती कायम काळजी घ्यायची .. त्यामुळे दुधात साखर विरघळते तशी जुई त्यांच्या घरात फारच कमी कालावधीत एकरूप झाली .. रमेश पेक्षा ही जास्त तिची चिवचिव , त्याच्या आई बाबांना ‘आई बाबा ‘ अशी सतत हाक मारून त्यांच्या प्रत्येक कामात सामील होणं त्यामुळे अगदी कमी कालावधीत ती त्यांची लाडकी सून नाही तर मुलगी च झाली .. रमेश खुश होता ,आई वडील जुई हेच तर त्याच विश्व ..आणि इमाने इतबारे नोकरी करणं .. लाईफ कस छान सेट झालेलं उलट आता कुटुंब वाढवूया असा ही विचार त्याच्या मनात आला .. जुई ला त्याने त्याबद्दल सांगितलं .. जुई अर्थातच रमेश च्या शब्दाबाहेर नव्हती .. पण त्यांनंतर एक वर्ष गेलं, दोन वर्ष गेलीत पण जुई ला दिवस जात नव्हते .. जुई ला पाळी आली की जुई पेक्षा जास्त रमेश ला त्याच दुःख व्हायचं .. शेवटी दोघे मेडिकल चेकअप साठी गेले ..पूर्ण तपासण्या केल्या आणि दोष रमेश मधे आहे असं डॉक्टर म्हणाले , रमेश कधीच बाप होणार नाही ,त्यासाठी लागणारे शुक्राणू नाही आहेत .. रमेश खचला .. अगदी निराशेच्या गर्तेत गेला . जुई ने त्याला पुष्कळ समजावून सांगितलं की अरे मेडिकल सायन्स इतकं अँडव्हान्स झालं आहे की आपण आय वी एफ साठी जावू ,ते ही शक्य नाही झालं तर मुल दत्तक घेऊ .. हे कारण नाही निराश होण्याचं .. नवरा बायको नात्यात दोष त्याचा असो किंवा तिचा तो त्या दोघांचा ही असतो कारण नवरा बायको मुळात दोन नसतातच,शरीर जरी दोन असले तरी मनाने ते एकच असतात..त्यामुळे जे त्याच ते तीच ..आणि माझ्यात दोष आला असता तर तू सोडलं असत का मला .. पण रमेश च्या डोक्यात सतत तेच विचार ,परिणामी नोकरी वर परिणाम झाला ,कामात चुका व्हायला लागल्या आणि होत्याचं नव्हतं झालं ..त्याच्या हातून नकळतपणे झालेल्या एका चुकीने त्याला नोकरी तर गमवावी लागली पण शिक्षा म्हणून कंपनी मालकाने दोन लाख रुपये ची मागणी केली ,नाहीतर उगाच पोलिस स्टेशन ,न्यायालयीन लढाई साठी तयार हो सांगितलं .. प्रकरण वाढू नये म्हणून घरच्यांनी दोन लाख देऊन विषय संपवला.. पण खरा विषय तिथेच सुरू झाला ..ह्या प्रकरणामुळे रमेश डिप्रेशन मध्ये गेला .. रमेश च्या आई वडिलांनी , जुई ने त्याला खूप समजावून सांगितले .. रमेश चे आई वडील तर सेवानिवृत शिक्षक. ते त्याला ते सांगायचे की आयुष्य म्हणजे एक युद्धभूमी आहे त्यात लढायचं असतं , रडायचं नसतं .. प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात .. अरे , राम सीता देव असून मनुष्यरुपात जन्माला आलेत तर त्यांना वनवास चुकला नाही .. नोकरी गेली म्हणून काय झालं आपण काहीतरी स्वतःच सुरू करूया ,आम्ही आहोत तुझ्या मदतीला , तुला तुझ्या क्षेत्रात स्वतःच सुरू करायचं नसेल तर आपण एखाद दुकान काढू ..पण त्यात ही त्याला कमीपणा वाटला.. उलट तो अजून चिडला म्हणजे मी शिक्षण त्यासाठी घेतलं का कांदे बटाटे विकायला … बाबांनी त्याला सांगितलं की अरे कुठलाही धंदा कमी नसतो , माझ्या मित्राचा मुलगा आयटी इंजिनियर झाला , काही दिवस जॉब केला पण नंतर कांद्याचा एक्सपोर्ट धंदा सुरू केला .. आई म्हणाली , माझ्या एका मैत्रिणीची सूनने मेस सुरू केली आणि स्वतःच्या हिमतीवर फ्लॅट घेतला .. त्यामुळे तू कुठलाही धंदा सुरू कर आम्ही आहोत मदतीला .. आम्हाला पेन्शन ही मिळत आहे त्यामुळे तू फक्त खुश रहा आणि एखाद्या कामात व्यस्त रहा कारण रिकाम डोक सैतानाच खोक.. जुई ने त्याला कितीतरी सकारात्मक पुस्तक वाचायला आणून दिली पॉवर ऑफ माईंड, द सिक्रेट, पॉझिटिव्ह थिंकिंग..तिने ही त्याला सांगितलं की अरे पुरुषार्थ हा फक्त मुलाला जन्म देण्यात नसतो तर आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्यामध्ये असतो , लाथ मारेल तिथे पाणी काढणारा माझा पूर्वीचा रमेश मला परत दे रे.. तू तुला शोध , तुझ्यातला तू हरवला आहेस त्याला तू शोध .. डॉक्टर म्हणाले की नैराश्य ही खूप मोठी समस्या आहे त्यामुळे त्याला बोलतं ठेवत रहा , त्याच्याशी संवाद साधत राहा , त्याला एकटं सोडू नका .. संवाद साधायला गेल तरी तो प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घ्यायचा , इतक की त्याला हे ही वाटायला लागलं की त्याच्या आई वडिलांचं त्याच्यापेक्षा जास्त जुई वर प्रेम आहे .. आणि शेवटी तो क्षण आला , ज्यामुळे जुई आणि त्याच्या आईवडिलावर आभाळ कोसळलं .. एकदिवस जुई तिच्या ऑफिस मध्ये असताना ,आई किचनमध्ये , बाबा बाहेर हॉल मधे असताना रमेश ने त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि गळफास लावून घेतला फक्त एक वाक्याची चिठ्ठी ठेवून , ” जुई , सॉरी, मी हरलो , माझ्या आई बाबांचा सांभाळ कर .” 💚 भाग २ .. 💚 ————————– आनंदी जीवनाचा मार्ग : लेखिका : मनिषा चंद्रिकापुरे ✨✨✨✨✨✨✨✨✨✨ रणदिवे कुटुंबार दुःखाचा पर्वत कोसळला.. नैराश्याच्या गर्तेत जाऊन रमेशने पराकोटीचा निर्णय घेतला.. स्वतःत असलेल्या दोषामुळे तो पूर्णपणे खचला … Continue reading रमाई – नंदनवन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed