रणरागिणी

inbound2897296973456754780.jpg

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा

**रणरागिणी**

महेश स्वतःवरच चिडला होता .त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन भावाने दिलेल्या कागदपत्रांवर त्याने न वाचता सह्या केल्या .त्याने महेशला घर ,व्यवसायातून हाकलून लावलं

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी
उमाने महेशला तिचे सर्व दागिने विकायला सांगितले .

उमा, तू माझ्याशी घरच्यांशी भांडून लग्न केलेलं आणि माझ्यामुळे तुझ्यावर लंकेची पार्वती होण्याची वेळ आली ..

महेश तू माझा शिव , मी तुझी शक्ती ..शिवशक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण ,शक्ती शिवची ऊर्जा , शिव शक्तीची दिशा .. शिवशक्ती एकत्र म्हणजे अशक्यही शक्य.

दोघांनी मेहनत करून व्यवसाय उभा केला . न्यायालयीन लढाईत महेशला हक्काच मिळालं.

उमा , मी महादेव भक्त म्हणून मला तू माझी पार्वती, रणरागिणी मिळाली.

सौ स्वाती येवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!