माझ्यातली मी
जागतिक योगदिवस
लेखस्पर्धा
@everyone
जागतिक योग दिन विशेष लेख स्पर्धा
दिनांक ..२१ जून२५
योगामुळे घडलेला माझा अनुभव /परिवर्तन
.”21 जून” रोजी दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून.. हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील पाच हजार वर्ष जुनी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक साधना, असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. हे खरे आहे या योग मुळेच माझे आज स्वास्थ्य सतराव्या वर्षी सुद्धा उत्तम आहे. या योगामुळे माझ्या परिवर्तन घडले.म्हणूनच योग माझा श्वास आहे.
तसं पाहिलं तर, माझ्या लहानपणी योग याविषयी एवढा प्रचार नव्हता. भरपूर खेळणे, भरपूर फिरणे, भरपूर पळणे, झाडावर चढणे, चिंचा पाडणे यावरच भर असे. शाळेमध्ये पी. टी.चा तास असायचा पण त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. उलट त्या तासाला गैरहजर राहण्यावरच लक्ष केंद्रित असायचं.
. 18 व्या वर्षी लग्न झालं लग्नानंतर जबाबदारी त्यामुळे योग महत्त्वाचा आहे. याची कधी दखलच घेतली नाही. त्याचबरोबर नोकरी धावपळ यात याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.. पण जेव्हा शाळेत न निवृत्त झाले आणि वर्षभरातच “रिकामं मन सैतानाचे घर” असे म्हणतात. तशी अवस्था माझी झाली. शुगर वाढली मधुमेह आजार जडला.. तेव्हा खाडकन जाग आली.. घराजवळ कुठे.योग सुरू आहे का? याचा शोध घेतला. घराजवळच असलेल्या हास्ययोग क्लब मध्ये मी सहभागी झाले. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याने “यूटर्न” घेतला.
तिथे वीस मिनिटं योग, वीस मिनिटं हास्ययोग, वीस मिनिटं प्राणायाम, असा एक तासाचा उपक्रम दररोज नियमित चालायचा. रविवारी, सणवारी सुद्धा सुट्टी नसायची. माझ्या निरोगी स्वास्थ जीवनाचं “टॉनिक” मला तिथे मिळालं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात समवयस्कर मैत्रिणी मिळाल्या. त्यामुळे संवादाची देवाण-घेवाण होऊ लागली. आणि जीवनामध्ये आनंदाची भरती आली. त्यानंतर मला योग याचे महत्त्व समजले. मग मात्र मी दररोज नियमित योग करू लागले.
यात मला असे लक्षात आले की, “प्राणायाम” हा योगाचा एक अत्यंत मौल्यवान प्रकार आहे. प्राणायामामुळे शारीरिक, मानसिक, शक्ती बळवते, आरोग्य तर निरोगी राहते, पण.. मन सुद्धा निरोगी राहते. याचा मला प्रत्यय आला. माझे शारीरिक मन शुद्ध होऊन, मनाची एकाग्रता वाढली, सकारात्मक विचार मनात येऊ लागले, नकारात्मक विचार बाहेर पडले. भरपूर प्रमाणात सकारात्मकतेचा ऊर्जा मला यात मिळाला..
शरीर, मन, आत्मा, या तिघांचे मिळून आपली शारीरिक यंत्रणा असते. आपल्या शारीरिक अस्वस्थतेचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रगट होतात पण योगामुळे अवयवांना मॉलिश केली जाते. यामुळे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणे मुळे शरीरात साठलेला ताण निघून जातो. रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
आपले मन सतत कुठल्या ना कुठल्या कार्यात गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ, भविष्यकाळ याचे झोके घेत राहते. वर्तमान काळात ते थांबतच नाही. पण योगामुळे आपले मन जागृत किंवा सावध होते. यामुळे इकडे तिकडे पडणाऱ्या मनाला आपण वर्तमान स्थिर करू शकतो.
योग करण्याचे फायदे मला जाणवले. वजनात घट झाली, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत , प्रसन्न मन, उत्तम आरोग्य. याची देणगी मिळाली. हे सर्व शक्य झाले कारण योगामुळे मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन रोखले गेल्याने. जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल झाला. फक्त शारीरिक स्वास्थ नाही. तर मानसिक, भावनिक स्वास्थ सुद्धा लाभले.
नातेसंबंध सुधारले. आणि मला जाणवले की रोज नियमित योगाचा सराव केल्याने शरीरातीला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आम्हाला झाली योग्य आहार घेतल्यामुळे वजन नियंत्रणात राहिले.
. योगासने प्राणायाम ध्यानधारणा ही सर्व नष्ट करण्याची प्रभावी तंत्र आहेत याची जाणीव झाली याच्या साह्याने शरीरातील विषय द्रव्य आणि ताण तणाव बाहेर टाकली जातात याचा अनुभव मी घेतला अंतर्मनाला शांतता लाभली.
म्हणून मला सगळ्यांना एकच सांगावसं वाटते की आपल्या सगळ्यांना एखाद्या शांत प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतु आपल्यात हवी असलेली शांतता आपल्यामध्येच वसलेली आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी या धकधकीच्या जीवनात सुद्धा नियमित योगा करा. ध्यानधारणा करा. अस्वस्थ मनाला काबूत आणण्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही.
योग एक पूर्ण विज्ञान आहे एक पूर्ण जीवनशैली आहे एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्मक विद्या आहे योगाचे लोकप्रियतेचे रहस्य म्हणजे. योगा सगळ्यांना करता येतो कोणत्याही जातीचा कोणत्याही लिंगाचा श्रीमंत गरीब कोणत्याही क्षेत्रातला कोणत्याही भाषेतला कोणीही योगा करू शकतो कोणीही या बंधनात अडकू शकत नाही..
माझ्या अनुभवावरून मी सांगते की प्रत्येकाच्या जीवनातच योगामुळे योग्य ते चांगले परिवर्तन घडवून येते. आपले वार्धक्य जीवन एक आनंद यात्री म्हणून जगता येते..
श्रीमती चंद्रकला जोशी नाशिक
