मेहनत

IMG_9490.jpeg

#माझ्यातली

#ब्लॉगलेखनटास्क (५/१/२६)

#लघुकथाटास्क

#लघुकथा

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.

✍️मेहनत

प्रजेश हा एका प्रथितयश घराण्यात जन्माला आलेला मुलगा घरी सर्व गोष्टींची सुबत्ता कशाला काही कमी नाही नाव काढलं की ती गोष्ट मिळालीच म्हणून समजा .

त्यामुळे तो जरा जास्तच लाडावलेला होता वरवर पाहता कोणाला जाणवायचे नाही पण जसा जसा मोठा होत होता तसं तसं त्याला आई वडील जे बंधन टाकत होते ते त्याला आवडायचे नाहीत!!

तसं पाहिलं तर पूर्वीच्या पिढीत होती तशी बंधन नव्हतीच ती

पण..

वयानुसार त्याला काही बोलायची सुद्धा चोरीच होती जरा काही चांगल सांगायला , बोलावयास गेलं की लगेचच तनफन करायची व राग धरून बसायच !!

आई आणि बाबा यांना फक्त एवढंच वाटायच कि आपल्या अनुभवातून ह्याला काही फायदा झाला तर चांगलच पण कश्याच काय अन् कशाच काय त्याने कधी ऐकल नाही आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला शिक्षणात मागे पडला व बाबांची सर्व संपत्ती हळूहळू करत संपवत गेला .

कधी मेहनत केली नाही त्यामुळे दुसऱ्या्च्या मेहनतीची कदर पण करता आली नाही मग काय करणार !

आता तर जीवापार मेहनत करायच वय सुद्धा राहिले नाही आणि पैसाही !!

उतारवयात सुद्धा त्याचे बाबाच त्यांच्या संपूर्ण संसाराचा सर्व घरखर्च आणि वरखर्च पाहतात !!

आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनात राहून राहून हाच विचार येतो आपण आपल्या मुलाला कधीही मेहनतीचे महत्व पटवून देऊ शकलो नाही म्हणतात ना कि काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरिही आणि नाही मिळाल्या तरिही हेच खरं

✍️ र सि का

©️®️र सि का चवरे

error: Content is protected !!