#अलकलेखन टास्क
मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही
मुके प्रेम
बेभरवशाचा पावसाळा, महाग बियाणे ,शेतमालाला भाव नाही या सर्व परिस्थितीला कंटाळून त्याने शेती विकली…गाव सोडून शहरात एक नौकरी शोधून कुटूंबासोबत राहायला आला .
गाव सोडतांना वडिलांनी आवडीने जोपासलेली बैलजोडी मात्र चुलत भावाला दिली .
तिसऱ्या दिवशी भावाचा ताबडतोब ये म्हणून फोन आला. गावी पोहचताच भाऊ त्याला गोठयात घेवून गेला…पाहतो तर काय गेल्या दोन दिवसापासून उपाशी ती दोन मुकी जनावरे माना खाली टाकून बसली होती अन डोळयात आसवा सोबत केविलवाणे भाव होते.
ते दृश्य बघून त्याचा उर भरुन आला अन त्यांना कवटाळून तो उदगारला..चुकलेच माझे खरच मी तुमच्या बाजूने कधी विचार केलाच नाही.
विनया देशमुख

एक नंबर
धन्यवाद