#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
# दि.११/०७/२५
# रेडिओ जॉकी एफ एम बँड 108 मेलडिक माईंड रेडिओ
# तालतरंग (द वेव्ह ऑफ रिदम)
नमस्कार, राम राम , गुड इव्हिनिंग मंडळी! मी तुमची मैत्रीण ‘अलग म्हणजेच अश्विनी’ …. रेडिओ मेलडीक माइंड एफएम बँड 108 वरून ….. संध्याकाळचे पाच वाजलेत… आणि मी घेऊन आलेली आहे वाफाळलेल्या चहा सोबत काही चटपटीत गोष्टी, रंगीत किस्से, आठवणीतल्या गोष्टी आणि खमंग, लज्जतदार, मनोरंजक माहिती घेऊन तुमच्या आवडीच्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव आहे “तालतरंग”….. द वेव्ह ऑफ रिदम
तर मंडळी आजच्या कार्यक्रमाचा विषय सांगण्याआधी माझा चहा तयार आहे… मी झटकन गेली आणि पटकन चहा घेऊन आली. तोपर्यंत ऐका, हे गीत आणि विचार करा आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे?
ये मोह मोह के धागे तेरी उंगली से जा उलझे……(संपूर्ण गीत)
काय मंडळी? लक्षात येत नाही आहे का आजचा विषय कोणता? आज मी तुमच्यासाठी एकदम खास, एकदम वेगळा, बोले तो हटके विषय घेऊन आली आहे बासरी. आजच्या चहासोबत आपण गप्पा मारणार आहोत बासरी या वाद्याविषयी… जाणून घेणार आहोत बासरी विषयक काही रोमांचक माहिती आणि काही सुरेल गाणी. तेव्हा ऐकत रहा ,आजचा सुरेल कार्यक्रम तालतरंग…. (द वेव्ह ऑफ म्युझिक)
जाहिरात.. सा रे ग म कारवा
रसिक हो! तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात प्राचीन नादयंत्रांपैकी एक नादयंत्र म्हणजे बासरी! जवळजवळ 600 00 वर्षापूर्वी पासून बासरी वापरत असावी असा अंदाज आहे. जगातील सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये बासरीचा वापर केला आहे आढळून येते. भारतीय संगीत आणि बॉलीवूड अशा सुमधुर बासरी पासून वेगळे कसे राहणार? बासरी म्हटलं की डोळ्यासमोर हिंदी चित्रपटातील अनेक मधुर गीतांची आठवण उभी राहते. पण त्यातही वरचढ ठरते ती बासरीची धून.. जी संपूर्ण चित्रपटात गुंजत राहते… मनाचा ठाव घेत राहते.. हिरो या सुपरहिट चित्रपटातील जॅकी श्रॉफ….. त्याच्या हातातील ती बासरी… निसर्गरम्य वातावरणात सुंदर मीनाक्षी शेषाद्री आणि आपण सहज गुणगुणू लागतो..
निंदिया से जागी बहार ऐसा मौसम देखा पहिली बार.……. (संपूर्ण गीत )
रसिकहो बासरीचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या देशात बासरी वेगवेगळ्या नावाने समोर येते. पश्चिमात्य संगीतात आयरिश बासरी प्रामुख्याने वापरली जाते. चिनी पारंपारिक गीतात डीजी या नावाने तर जपानी संगीतात शाकुहाची म्हणून बासरी ओळखली जाते. भारत व नेपाळमध्ये सहा छिद्र्याची एका वेळूची बासरी लोकसंगीतात वापरतात. भारतात बासरीला विविध नावाने ओळखले जाते जसे की बासरी ,पावा…. आणखी?.. भारतात बासरीला आणखीन कोणत्या कोणत्या नावाने ओळखतात?तुम्हाला माहीत असल्यास मला सांगायला विसरू नका. मी तुमची आवडती रेडिओ जॉकी अलग म्हणजेच अश्विनी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे तालतरंग.…(द वेव्ह ऑफ म्युझिक)
तू ही रे, तू ही रे, तेरे बिना मै कैसे जियू
जान रे, जान रे, मेरे सांसो मे बस जा तू…… (संपूर्ण गीत)
श्रोते हो तुम्हाला तर माहीतच आहे, बासरी हे भगवान श्रीकृष्णाचे दिव्य वाद्य आहे. गोकुळात जेव्हा नटखट किसन कन्हैया रासलीला करायचा, आपल्या गाई हाकताना आपली मधुर बासरी वाजवायचा तेव्हा गोकुळातील गोपिका स्वतःची तहानभूक विसरुन , देहभान हरपून, वेडावून जात. कृष्णाची बासरी ऐकत तल्लीन होत त्या कृष्णमय होऊन जात.
वो है अलबेला मदनैनो वाला
जिसकी दीवानी, ब्रिज की हर बाला वो किसना है…… (संपूर्ण गीत)
मंडळी तुम्ही ऐकत आहात एफएम बँड 108 रेडिओ मेलडी माइंड वरून तुमच्या आवडीचा कार्यक्रम ताल तरंग… (द वेव्ह ऑफ रिदम )ज्याचे प्रायोजक आहेत
सारेगामा कारवा…
तर मंडळी गोष्ट चालू होती ,श्रीकृष्णाच्या बासरीची…. पुरण कथेनुसार माता सरस्वतीला ब्रह्माजींनी श्राप दिला की ती एक जड वस्तू बनून पृथ्वीतलावर राहील. माता सरस्वतीने मग हजार वर्षे तप केले व भगवान विष्णूला प्रसन्न केले.. तेव्हा श्रीकृष्णाने तिला वर दिला की ती जड वस्तू म्हणजे बासरी.. जी प्रत्यक्ष देवाच्या हातात राहील…. तर मंडळी, पुरण कथेवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अवघ्या गोकुळाला साद घालणारी भारावून टाकणारी श्रीकृष्णाची, त्या मुरलीधरची, धून कधी राधेला तर कधी मिरेला वेडावत राहिली. चला तर ऐकूया असे एक कर्ण मधून गीत याची सुरुवात बासरीच्या अविट सुरांसोबत होते.
ईश्वर सत्य है.. सत्य ही शिव है.. शिव ही सुंदर है… सत्यम शिवम सुंदरम (संपूर्ण गीत)
दोस्त हो ,पंडित पन्नालाल घोष यांना भारतीय बासरीचा मसीहा असे म्हणून ओळखले जाते. आजच्या नव्या आधुनिक अवतारातील बासरीचे ते जनक आहेत. शास्त्रीय संगीतातील ते एक असे युगपुरुष आहेत ज्यांनी लोकवाद्य असणाऱ्या बासरीला शास्त्रीय रूप दिले. सन 1942 मध्ये आलेला चित्रपट वसंत.. ह्या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत खास ओल्ड इज गोल्ड अशी आवड असणाऱ्या लोकांसाठी ज्यात बासरीचा अत्यंत सुरेख उपयोग केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या
जमान्यातले हे गीत
मेरे छोटे से मन मे, छोटी सी दुनिया रे… (संपूर्ण गीत)
काय म्हणता रसिक मंडळी? तुमच्या संध्याकाळची लज्जतदार अशी चहाची मैफिल बासरीच्या सुरांनी अधिक रंगलेली आहे… होय ना? तेव्हा चहाचा घोट आणखीन चवदार करा, तुमच्या आवडत्या तालतरंग( द वेव्ह ऑफ रिदम) कार्यक्रमात!
वा उस्ताद !नाही, वाह ताज बोलिये! (जाहिरात)
पंडित हरिप्रसाद चौरसिया…. बस नाम ही काफी है! बासरी म्हटलं की पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे नाव येणारच..…हिंदुस्तानी शास्त्रीय परंपरेनुसार बासरी वादन करणाऱ्या हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म इसवी सन 1938 मध्ये प्रयागराज येथे झाला. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात आपल्या बासरीची सुमधुर धून आळवली आहे. डर, सिलसिला, चांदनी, लम्हे यासारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातील गीते त्यांच्या बासरी मुळे सुमधुर झालेली आहेत. तर आता आपण ऐकूया अमिताभ बच्चन यांच्या सुप्रसिद्ध , सुपर डुपर हिट गीता पैकी एक…. ज्या गीतामध्ये हरिप्रसाद यांच्या बासरीने केलेली जादू केवळ शब्दाच्या पलीकडील आहे तर ऐकूया हे एक गीत.
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हो दूर तक निगाह मे है गुल खीले हुए.,(कविता)
रसिक हो, बासरीला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. धनची देवता कुबेर यांच्यासोबत सुद्धा बासरीचे नाव जोडले जाते. असे मानले जाते की, प्रत्यक्ष भगवंताच्या हातात असणारी बासरी जिथे जिथे असेल तिथे तिथे सकारात्मकता, धनसंपदा व शांतता वास करते. केवळ बासरी वादन केल्यामुळे नाही तर ऐकल्यामुळे सुद्धा मनाला ,आत्म्याला विलक्षण शांती मिळते.
निले गगन के तले, धरती का प्यार पले, ऐसे ही जग मे आती है सुबहे, ऐसे ही शाम ढले……( संपूर्ण गीत
)
काय मंडळी आवडत आहे ना आजचा खास विषय… आवडत आहे ना बासरी आणि बासरी विषयीची मनोरंजक माहिती? तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे म्हणजेच तालतरंग म्हणजे द वेव्ह ऑफ रिदमचे प्रायोजक आहेत.
सारेगम कारवा (जाहिरात)
तर रसिक मंडळी, अशी ही बासरी, ऐकल्यामुळे मनशांती मिळते,एक वेगळाच सुकून जीवाला प्राप्त होतो. पण तुम्हाला माहित आहे का.. बासरी वाजवल्यामुळे आणि ऐकल्यामुळे आरोग्य वृद्धी सुद्धा होते. बासरी वाजवणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे. एक असा व्यायाम जो हृदय आणि श्वसन संस्थेला मजबूत करण्यास मदत करतो. मांसपेशी सुदृढ करतो, आपल्या फुफुसाची कार्यक्षमता वाढवतो…. शास्त्रीय संगीतात राग शिवरंजनी हा आरोग्यवर्धक राग मानला जातो. शांतता व सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा राग म्हणून ओळखला जातो. तर आता ऐकूया राग शिवरंजनी वर आधारित हे एक लोकप्रिय गीत ज्यात बासरीचा उपयोग अतिशय कलात्मक रीतीने केला आहे.
मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा.. फिर भी मेरा मन प्यासा (संपूर्ण गीत)
रसिक श्रोते हो, बासरीची धून ऐकता ऐकता चहाचा कप कधी रिकामा झाला कळलेच नाही ना? अहो बघता बघता सहा वाजता आलेत. आता तुमची निरोप घ्यायची वेळ आली आहे. मित्रहो मी आर जे अलग म्हणजेच तुमची अश्विनी आज तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन आली आहे… बासरी. एफएम बँड 108 रेडिओ मेलडीक माईंडवरून ऐकत रहा कार्यक्रम तालतरंग (द वेव्ह ऑफ रिदम) … ज्यात तुम्हाला मिळेल, सुमधुर गीत बरोबरच माहिती, मनोरंजन, आठवणी, किस्से यांचा अनमोल खजाना…रसिक श्रोते हो, जाता जाता माझ्या आवडीचे हे गीत…. हे असे गीत आहे ज्याची बासरी वरील धुन आळवणे अतिशय सोपे समजले जाते. जब वी मेट चित्रपटातील शाहिद कपूर व करीना कपूर यांच्यावर चित्रित केलेले हे गीत…. माझ्या आवडीचे सुरेख गीत खास तुमच्यासाठी …. उद्या परत भेटू एक नवा विषय आणि काही गुणगुणायला वाटणाऱ्या सुरेल गीतांच्या खजिना घेऊन… तोपर्यंत शुभ संध्याकाळ! शब्बा खैर!
आओगे जब तुम ओ साजना
अंगणा फुल खिलेंगे.. बरसेगा सावन झूम झूम के. दो दिल ऐसे मिलेंगे….( संपूर्ण गीत.)
(या लेखातली बरीचशी माहिती गुगल वरून साभार घेतली आहे.)
@ashwini


खूप छान लिहिले आहे.मस्त.