माहेरची सावली

[24/11, 3:16 pm] विनया देशमुख: # माझ्यातली मी
# विकेंड टास्क
# विषय….. नाट्यलेखन

माहेरची सावली

पात्र परिचय…सीमा,मयुरी, सारीका,अनघा आणि राधीकाताई यादव

तिसरी धंटा झाली
पडदा वर गेला

अंक पहिला

एक मध्यमवर्गीय कुटूंबाचे टू बीएचके घर
त्यातील डायनिंग कम लिव्हीग रुम , आवाज बंद करुन टि.व्ही. सुरु आहे .एक सीमा (नाटकातल्या चौघी मैत्रिणी पैकी एक ) सोडली तर इतर सर्व घरचे मेबंर आप आपल्या बेडरुम मध्ये बंद आहेत। सीमा कानात हेडफोन टाकून आपल्या इतर तिन मैत्रिणींना कॉन्फरन्स कॉल वर घेते. मयुरीला कॉल लागला.

सीमा…हॅलो मयुरी,कधी येतात ग त्या दोघी

मयुरी…हो,बाई आटोपतच नाही ग त्यांच लवकर.
आजच रात्री तर वेळ मिळतो ग आपल्याला बोलायला ,उघा मेली उठायची धाई नसते म्हणून, तरी सुद्धा उद्या पवन च क्रिकेट आहेच ग म्हटल त्याला बाहेर च नाश्ता करुन घेशील.

सारीका…आले,आले ग बायांनो बोला आता
अनु नाही आली अजूनपर्यंत
अनघा…….हॅलो। आय कमींग बट व्हेरी व्हेरी सॉरी फार लेट न बोला ग आता.

सारीका….आल्या आल्या ते इंग्रजी नको झाडू
साऱ्या दिवसभर क्लायंट सोबत इंग्रजीत बोलून अन घरी पोरांचा अभ्यास घेवून जीव आबंतो ग आपली मातृभाषा च बरी वाटते कानाला.

मयुरी….खरच आहे ग। आपन मराठी शाळेमध्ये शिकलो पण आता या नौकरी मूळे संभाषणात इंग्रजी चा वापर जास्त करावा लागतो. मराठी सुटत चालले

अनघा…..अग, ऑफीसमध्ये आपण कधी शुद्ध मराठी शब्द बोललो तर आपल्या कडे विचीत्र नजरेने पाहिल्या जाते तेव्हा पर्यायी इंग्रजी शब्द च वापरावे लागतात.

सीमाच बर आहे बाई घरीच असते तर वाचायला, लिहायला वेळ मिळतो.

सीमा… काय पण थट्टा करता ग… होता एक काळ वाचन लिखाण आवडते म्हणून नौकरीच्या मागे नाही लागले. घरीच आहे म्हणून संसाराच्या साऱ्या जबाबदाऱ्या गळ्यात आणि तू घरीच असतेस म्हणून पाहुण्यांना खंड नाही. सारे छंद वाचन , लिखाण टांगले ग खुंटीला.

मयुरी….किती ही थकलो बायांनो तरी जबाबदाऱ्या काही संपत नाही.

सारीका….शिवाय आता माहेर पण नाही उरले
ग आपले चार दिवस आराम करायला.
आई बाबा असेपर्यंत चैन केली .आता भाचरांच्या ओढीने गेल तरी वहिनी च्या कपाळावर आठया पडतात .भाऊ तोंड लपवतो.

सीमा….काढलास सरे..जिव्हाळयाचा विषय
मला तर लग्न झाल्यापासून माहेर नाही ग आई बाबा तर आता अंधुकशेही आठवत नाही. मामा मामीनी लग्न लावून कर्तव्य पूर्ण केल नतंर परतून ही पाहील नाही. सासुबाई प्रेमळ म्हणून जाणवलं नाही.

मयुरी….. नका ग उगाच सेंटी होवू. छान गप्पा करु. छान ताजे तवाने व्हायला येतो ना आपण फोनवर
वेगळे विषय बोला ग…रडगाणे नको
खडूस मॅनेजर बद्दल बोला
नवरोजी चे गाऱ्हाणे करा. इंटरेस्टिंग विषय आहे. सरे तुला कोणी आवाज देत अस वाटत

सारीका….अग कोणी नाही
मृणाल घरी नाही मैत्रिणीकडे गेली…नाईट आऊट का काय आहे म्हणे. बापाचा पाठिंबा असतो आईचे काही चालत नाही.
नवरोबा बसले बेडरुम मध्ये फुटबॉल लावून. तो मेस्सी की रोनाल्डो कोण आहेत। किती गोल करतात …त्यांचे गोल पाहता पाहता वेफर्स खाऊन खाऊन हा पण गोल होत आहे ( चौघींच्या मोठयाने हसण्याचा आवाज)

अनघा….. सख्यांनो झाल का ग सर्वांच बोलून आता मी काय म्हणते ते जरा लक्ष देऊन ऐका. तर बायांनो आपण आता पन्नाशी ओलांडली

मयुरी…. म्हणजे म्हाताऱ्या झालो असे म्हणायचे आहे का?

अनघा…..मये.. मी तसे म्हटले काय आधीच तोंड उघडायच (मयुरी चा घट्ट तोंडावर हात ठेवल्याचा आवाज )
तर मुलींनो आपण स्वतःला प्रोढयौवना म्हणू हव तर कस !

सीमा…..पाल्हाळ नको लावू सांग बाई पटकन
नाहीतर तिकडच्या स्वारी ची डरकाळी यायची आटोपलच नाही का अजून दिवस निघणार आहे की काय फोनवर (नवऱ्याचा आवाज काढून बोलते. पुन्हा चौघींचा हसण्याचा आवाज )

मयुरी…. माझा टूरवर आहे

अनघा….आता माझही ऐका प्रिय पती देव केव्हाच निद्राधीन झालेत. त्यांची तालबद्ध सुरावट ऐका ( घोरणे )

चला येते आता मुद्दयावर आता काहीना काही कारणाने आपल्या चौघीनांही माहेर राहीले नाही आहे.
माहेरी जावेसे तर वाटते यावर खर तर मी खुप दिवसापासून विचार करत होते की आपण आपली चौघीचीच एखादी छोटीसी टूर काढायची काय कुणाच्या घरी वगैरे नको शहरापासून दूर एखादे छानसे राहायचे ठिकाण पाहू या …आज काल होम स्टे पण मिळतात

असा काहीसा विचार करत असतांना काल मला फेसबुक वर एक जाहीरात दिसली.

पडदा पडला
( पहिला अंक समाप्त)
[24/11, 3:17 pm] विनया देशमुख: पडदा वर जातो

अंक दुसरा

(चौघींपैकी एक मैत्रिण अनघा चे घर
त्यातील लिव्हीग रुम इतर तिन मैत्रिणी सोबत फोनवर बोलणारी अनघा )

मयुरी…अग सांग ना काल कोणती जाहीरात पाहिली

सीमा….सांग ना बाई नाही तर मी होते एक्झिट
(तिला मध्ये थांबवत)

अनघा….सापडली ग सेव्ह करुन ठेवली होती आठवत नव्हते बाई लवकर …वय झालय ग आता
( उरलेल्या तिघी एका सुरात…हो ना…)

अनघा…..तर असे आपल्या शहरापासून खुप दूर नाही की जवळ नाही साधारण एकशे विस किमी अंतरावर एक राधीकाताई यादव म्हणून राहतात …. कृष्णाई…हे त्यांच्या बगंल्याच नाव आहे . त्यात त्यांनी …माहेरची सावली …या नावाने एक विश्रांती गृह सुरु केले म्हणजे असाच उल्लेख त्यांच्या जाहीरातीत आहे.

( माहेर म्हणताच तिघी सावरुन बसतात )

मयुरी… पुर्ण वाचून दाखव ना ग
सारीका…..कळू तर दे काय आहे हा सावली प्रकार
सीमा….एक कर आता रात्र बरीच झाली स्क्रीन शॉट पाठव आम्हाला आम्ही वाचतो मग बोलू
अनघा…. हो तसच करते, पण वाचून ठेवून नका देऊ विचार करा आपल्या सारख्या माहैर दुरावलेल्या च्या हिताचे आहे
यावर बोलायला मी सकाळी कॉल घेते तसेही सकाळी कोणी उठत नाही निवांत वेळ मिळेल बोलायला. गुड नाईट
मयुरी…. पाठव ग वाचते गुड नाईट

सीमा….. धन्यवाद ..आली बघ डरकाळी
आता गुड नाईट
सारीका…..बोलु ग उघा गुड नाईट

(अनघा इतर तिघीना जाहीरात पाठवते वाचल्या नतंर तिघी खुष होऊन सकाळ होण्याची वाट पाहत झोपायचा प्रयत्न करतात )
आता सकाळचे पावने सात वाजले
अनघा चे किचन डायनिंग टेबल जवळ चेअर वर बसुन ती तिघी मैत्रिणीना कॉन्फरन्स कॉल वर घेते .समोर चहाचा कप

अनघा….शुभ प्रभात सख्यांनो

सारीका….फोन वरुन ते जाऊ दया ग सकाळ शुमच असते .(अती उत्साहात)
मी वाचल ग काल …मला आवडली त्यांची स्किम पैसे देऊन का होईना तीन दिवस माहेरी जायला मिळणार

सीमा…चालू ठेवा ग फोन मी हयांना चहा देऊन आले…आज कधी नाही ते लवकर उठले

मयुरी… वाह मस्त आयडिया
मला जाम आवडली आयडिया
विशेष म्हणजे त्यांनी लिहलेल
ज्यांना माहेर नाही, ज्यांच् दूर आहे जाऊ शकत नाही, ज्यांना ,ज्यांना माहेरी जायची ईच्छा आहे अशा प्रत्येकीला प्रेमाची उब देणारी माहेरची सावली .

सारीका…आपण फोन करुन बघायचा का ?

मला जाम आवडली ही आयडिया

सीमा….हो ग जाऊ बाई कसही असेना का जरा बदल होईल रोजच्या रहाटगाडग्यातून
सारीका ….करा ग फोन त्या राधीकाबाईंना अन ठरवून टाकू ग लवकर

अनघा…. चला लावतेच फोन
ठरवुन टाकू या माहेरी जायचे कस!
( अनघा राधीकाताईंना फोन करते. त्या फोन उचलतात )

अनघा…. हॅलो मी अनघा देसाई बोलत आहे
माहेरची सावली साठी बोलायच
आहे.
राधीकाताई…… हॅलो स्वागत आहे.
योग्य ठिकाणी फोन लागला मुली तुझा. पुन्हा स्वागत आहे। ( फोन स्पिकर वर होता. अत्यंत मृदु,प्रेमळ आवाज ऐकुन सर्वजणी एकदम खुष )

राधीकाताई …बोल बेटा कधी येणार आहेस माहेरपणाला.
अनघा….हॅलो… तुम्हाला काय म्हणून संबोधू काकू,मावशी समजत नाही.

राधीकाताई…. अग राधामाई म्हण सर्वजणी मला तसाच आवाज देतात.

अनघा….माई खरच यात आपुलकी वाटते आणि तुम्ही कस ओळखलत मी माहेरी येण्यासाठी फोन केला.

राधीकाताई….. अग सर्व मुली मला यासाठी च फोन करतात आणि ऐक सांगू प्रत्येक सासुरवाशिणीचा माहेरी येण्याचा उत्सुक आवाज मला आता ओळखता येतो.

अनघा…. खुप आवडल मला तुमच बोलण माई. मी आणि माझ्या अजून तीन मैत्रिणी मयुरी, सीमा आणि सारीका तुमच्याकडे म्हणजे माहेरच्या सावलीत दोन,तीन दिवस येण्याचे ठरवत आहोत. बरीचशी माहीती तर तुमच्या जाहीरातीत आहे. तरी इतर सर्व सविस्तर माहीती मिळेल काय म्हणजे आम्ही चौघी मिळून सर्व ठरवू ते सोपे होईल.

राधीकाताई….. हो बरोबर आहे मला आवडतात अशा छान सर्व व्यवस्थित ठरवून वागणाऱ्या मुली.
मी तुला सर्व माहिती सविस्तर पाठवते.हे माहेर पेमेंट करून आहे हे तर समजले असेलच. मला पण सर्व चालवायला पैसा लागतो पण ऐवढे सोडले तर तुमची माहेरपणाची सर्व जबाबदारी माझी.
मी एक तुम्हाला चार फार्म पाठवते ते आरामात सविस्तर भरुन मला पाठवा म्हणजे मला तुमची माहिती मिळेल शिवाय सर्व आवडी निवडी कळतील त्यानुसार एक सामाईक मेन्यू रोज ठरवता येईल.
कधी येणार ते लवकर कळवा आणि येतांना आधार कार्ड, ओळखपत्र सोबत असु द्या. शिवाय इतर पण काही सुविधा हव्या असतील तर सांगा शक्य तितके मुलींचे हट्ट पुर्ण करायचा मी प्रयत्न नक्की करते
चला या ग लवकर लवकर माई तुमची वाट पाहत आहे.

पडदा पडला
( अंक दोन समाप्त )
[24/11, 3:19 pm] विनया देशमुख: पडदा वर जातो

(अंक तिसरा)

(शेवटी घरची सर्व सोय लावून, सर्वांना पटवून देऊन चौघी मैत्रिणी माहेरी जाऊन पोहचतात )

स्थळ …सावरगाव स्थित ..राधीकाताई यादव यांचा कृष्णाई बगंला आत मधला प्रशस्त हॉल त्यामध्ये सुदंर अक्षरातले प्रवेशदारावरचे नाव माहेरची सावली

प्रशस्त हॉल मध्ये चौघी मैत्रिणी चे प्रेमळपणे दारात औक्षण करुन राधीकाताई स्वागत करतात.
जिन्स शर्ट मधली मयुरी कुर्ता पॅन्ट घालून आलेल्या सीमा, सारीका अन सलवार कुर्ता मधली सीमा आरामात विराजमान होतात
प्रेमळ स्वागताने त्या सुखावतात.

राधीकाताई… (मदतनीस अंजू व रंजू यांना उद्देशून ) अग मुली आल्यात ग गुळ पाणी आणा लवकर। चहा पण टाका आल घालून प्रवासाचा शीण जाईल.
सोबत खायला पण असु द्या थोड …लवकरच जेवण पण बनवा

सारीका…माई किती सांगीतल हो आमच्यासाठी
सीमा….खऱ्या माहेरी सुद्धा इतके छान स्वागत नाही होत.
राधीकाताई…. हे खरोखरच माहेर समजा मुलींनो
मयुरी अन अनघा …हो माई
(चहा नाष्टा येतो )

छान झाला चहा व नाश्ता चा अभिप्राय देऊन सर्व जणी माई सोबत त्यांच्या विश्रांती च्या ठिकाणी जातात.
मयुरी…एक विचारु माई
माई….अग विचार माहेरी कसला संकोच
मयुरी….. मी इथे शार्ट आणि टि शर्ट घातले तर चालतील काय म्हणजे झोपायला। मला त्यात रिलॅक्स वाटत
माई…..अग हे काय विचारायच असत हव ते घाला आणि एक सांगते इथे माहेरची सावली मध्ये कुणीही पुरुष कर्मचारी नाही आहे सर्व कामे स्त्रियाच करतात
अन इथे येणाऱ्या स्त्रीयांना त्यांची फक्त दहा वर्षाखालील मुले आणायला परवानगी देते
(माई निघून जातात )

मयुरी वर तिघी एकदम ओरडतात …आपली सोय पाहिली आम्हाला नाही दिली आयडिया
मयुरी…. तुम्ही आणले तरी असते काय
सीमा मुळीच तयार झाली नसती
तिघी एकदम चूप

मयुरी…. माझ्या सुंदर मैत्रिणीनो नाराज नका
होऊ …हे पकडा म्हणत त्याच्याकडे एक पार्सल फेकते
मला माहीत होते मला पाहून तुम्ही नाराज होणार म्हणून मी आधीच तुमच्या साठी पण शार्ट आणलेत .घाला आता रडू नका
( आमची स्विटी म्हणत सर्व तिच्या कडे झेपावतात)
माई….चला ग जेवायला
आता रात्रीच हलक म्हणून मुगाची खिचडी,कढी,पापड,साडंगे अन वेलकम म्हणून गुलाबजाम आहेत या लवकर
(चौघी पण पोटभरुन जेवतात माई चे आभार मानत गप्पा गोष्टी करून झोपी जातात तर थेट सकाळी 9 वाजता उठतात.)
सीमा…अग उठा ग किती वाजले पहा तरी
सारीका….बापरे 9 वाजले आयुष्यात पहिल्यांदा झोपले असेल इतके
तेवढयात माईचा आवाज
माई।…आवरुन या ग नाश्ता करायला
गरमा गरम कांदेपोहे व बेसन लाडू चहा असा बेत आहे आवडेल ना
चौघीपण एकासुरात….हो…
( नाश्ता करत असतांना माई बोलतात)
माई….आवडत आहे ना ग माहेरपण .
आज तुम्ही जेवण झाल्यावर आमची बाग पाहून या खुप झाडे आहेत आंबा ,जाभूंळ,वड, पिपंळ छान हिरवीगार सावली आहे थोड पुढे गेल की एक नदी आहे व छोटेसे गणपती चे मंदिर आहे ..सोबत देईलच आवडेल तुम्हाला…या फिरून
( श्रीखंड पुरी चे जेवण करुन चौघी आराम करतात नतंर फिरायला जातात वापस येऊन जेवण करुन कधी झोपी जातात त्यांना कळत पण नाही)
दिवस तिसरा
माई…. काल अजून दोन मुली आल्या
आता येतीलच नाश्ता करायला
आंबोळी अन उकडीचे मोदक आहेत आज
सारीका… आवडतात मला
बाकी तिघी …आम्हाला पण माई
माई…आज तुम्हा सहा जणीसाठी एक पिकनिक ठरवली आहे गाडी माझीच असेल एक चालक अन मदतनीस देते सोबत खूप लांब नाही जवळच सुंदर असा धबधबा काही कोरीव शिल्पे आहेत रस्ता थोडा जगंलचा आहे पण येतांना खुप निरनिराळे पक्षी पाहायला मिळतील अगदी पिसारा फुलवलेले मोर देखील. सोबत लंच देत आहे ..थालीपिठ लोणच,चटनी चालेल ना रस्त्यात खायला थोडी खारी ,गोड शंकरपाळी पण देते.
रात्री काही आवडीचा पाहिजे असेल तर सांगा ,..माई.. इतकी छान सोय करत आहात की आम्हाला काही सुचत नाही तुमच्या सोयीने करा डिनर
(सर्वजणी मौजमस्ती करत फिरुन येतात रात्री छान आलु वांग्याचा रस्सा ,तेलाच्या पोळ्या, गोडाचा शिरा मनभरुन जेवतात )
दिवस चौथा
आज स्टे संपणार चौघी उठतात
माई…या ग लवकर चहा घ्यायला. आज तुम्ही जाणार म्हणून पुरणपोळी चा बेत आहे .तेव्हा जेवायला छान भुक असावी म्हणून चहा बिस्कीट,खारी असच देते
सारीका..माई या माहेरपणाने आमची पोट भरलीत. पुरण पोळी कुठे ठेवायची आता
सीमा ..खरच माई खुप समाधान लाभले

मयुरी.. एक विचारु माई ही माहेरचीआयडिया तुम्हाला कशी सुचली अर्थात तुम्हाला आवडेल तरच सांगा
अनघा…. अस अनोख औट घटकेच का होईना पण समृद्ध माहेरपण मिळाल म्हणून विचारावंस वाटल.

राधीकाताई…. काही हरकत नाही ग तुम्ही माझ्या मुलीच आहात .
माझे आई वडील मी लहान असतांना देवाघरी गेले पण आजीने माझे छान संगोपन केले. यजमान आर्मीत होते लवकर रिटायर्ड झाले आम्ही इथे शेती घेतली अपत्यसुख मात्र आमच्यासाठी नव्हते .माझे यजमान शेतीत रमायचे पण त्यांच्या अचानक जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी तयार झाली कुणीतरी सोबत असावे असे वाटायचे .माझ्या एका मैत्रिणीच्या आधाराने मी ही संकल्पना अमलात आणली.सुरवातीला पेमेंट बद्दल लोकांच्या मनात आकस होता पण आता एकही दिवस मी एकटी नसते .दोन तरी माहेरवाशीणी असतात माझा वेळ छान जातो
त्यांची सुखदुःख ऐकते उरल्या वेळात वाचन लिखाण हे पण चालू असत
चला खुप वेळ झाला जेवायला चला मग तुमची बिदागिरी करते .
तुमचे घरकुल तुमची वाट पाहत असेल
(जेवून झाल्यावर माई चौघी ची खणा नारळाने ओटी भरायला लावतात व सोबत नातवंडासाठी खाऊ पण देतात )
सारीका ,सीमा ,अनघा,मयुरी …नमस्कार करतो माई हे माहेर औट घटकेच वाटल होत पण आम्हाला नेहमीसाठी माहेरची सावली मिळाली
(डोळे,मन भरून येतात)
पुन्हा पुन्हा वळून…येतो आम्ही
माई घरात वळतात…इतर लेकींच माहेरपण करायला.
पडदा पडतो
(तिसरा अंक समाप्त )

समाप्त

689 Comments

  1. Блог обо всём https://drimtim.ru полезные статьи, новости, советы, идеи и обзоры на самые разные темы. Дом и быт, технологии, путешествия, здоровье, финансы и повседневная жизнь. Просто, интересно и по делу — читайте каждый день.

  2. Всё о столярном деле https://derevoblog.ru в видеоформате: обучающие ролики, мастер-классы, обзоры оборудования и проектов из дерева. Понятные инструкции, практические советы и вдохновение для создания мебели и изделий своими руками.

  3. Нужен трафик и лиды? веб студия avigroup в казани SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  4. Нужны грузчики? офисный переезд услуга : переезды, доставка мебели и техники, погрузка и разгрузка. Подберём транспорт под объём груза, обеспечим аккуратную работу и соблюдение сроков. Прозрачные тарифы и удобный заказ.

  5. Планируешь перевозку? грузчик с ежедневной оплатой удобное решение для переездов и доставки. Погрузка, транспортировка и разгрузка в одном сервисе. Работаем аккуратно и оперативно, подбираем машину под объём груза. Почасовая оплата, без переплат.

  6. Ищешь грузчиков? грузчики цена помощь при переезде, доставке и монтаже. Аккуратная работа с мебелью и техникой, подъем на этаж, разборка и сборка. Гибкий график, быстрый выезд и понятная стоимость.

  7. стартовал наш новый https://utgardtv.com IPTV?сервис, созданный специально для зрителей из СНГ и Европы! более 2900+ телеканалов в высоком качестве (HD / UHD / 4K). Пакеты по регионам: Россия, Украина, Беларусь, Кавказ, Европа, Азия. Фильмы, Спорт, Музыка, Дети, Познавательные. Отдельный пакет 18+

  8. Ищешь музыку? скачать музыку 2026 года популярные треки, новые релизы, плейлисты по жанрам и настроению. Удобный плеер, поиск по исполнителям и альбомам, стабильное качество звука. Включайте музыку в любое время.

  9. Нужна фотокнига? печать фотокниг москва печать из ваших фотографий в высоком качестве. Разные форматы и обложки, плотная бумага, современный дизайн. Поможем с макетом, быстрая печать и доставка. Идеально для подарка и семейных архивов

  10. Продажа тяговых https://faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  11. Продажа тяговых https://ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  12. Продажа тяговых https://faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  13. Продажа тяговых https://ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  14. Продажа тяговых ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!