माणूस

8f855091-8d68-4d15-bb37-e50f69b92ca2.jpeg

#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन (४/८/२५)
माणूस
देशमुख सर – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक.
पन्नास वर्षं तत्त्वज्ञान शिकवलं, हजारो विद्यार्थी घडवले.
शेकडो पेपर्स, शेकडो व्याख्यानं, पुस्तकी ज्ञानाचा अफाट साठा त्यांच्या डोक्यात होता.

मात्र स्वतःचं घर? तुटलेलं.
बायको आणि मुलासोबत कित्येक वर्षांपासून अबोला.
एक दिवस तिने फक्त एवढंच सांगितलं होतं –
“तुम्ही आयुष्य समजावता, पण जगत नाही.”
आणि मुलाला घेऊन ती निघून गेली.

तेव्हा देशमुख सर गप्प राहिले होते.
ते सतत विवेक, समत्व, त्याग, वैराग्य यावर बोलायचे.
पण घरातले प्रश्न ते “व्यक्तिनिष्ठ” मानायचे.
त्यांचं वागणं नेहमी तटस्थ.
तडजोड हा त्यांचा अपमान वाटायचा.
म्हणूनच कदाचित संबंध संपले.
कॉलेजमध्ये मात्र ते आदर्श मानले जायचे.
विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं होतं –
“वैराग्य म्हणजे जीवनातून भोग न काढता, त्यावर मात करणं.”
पण आज, , सर स्वतःच भोगात हरवले होते.
एका लेक्चरदरम्यान एका विद्यार्थ्याने थेट विचारलं –
“सर, तुमचं तत्त्वज्ञान खोटं वाटतं.
तुम्ही स्वतः जगलात का ते?
इतकं शिकवलंत, पण स्वतःचं आयुष्य मात्र सावरलं नाही”
प्रश्न रोखठोक होता.
सर काही बोलले नाहीत.
त्त्यांनी फोन उचलला,मनात अस्वस्थता होती
मुलगा बोलेल की नाही त्याला मी आठवत असेल की नाही हीच चिंता होती.
पण कॉल लागला.

“बोला,” कापाऱ्या आवाजात मुलगा म्हणाला
थोडा वेळ शांतता पसरली. मी चुकलो मला माफ करशील का? फक्त एकदाच, माफ कर सर फक्त एवढंच म्हणाले.
पलिकडून काही उत्तर नव्हतं.
पण कॉल कट झालेला नव्हता
आणि सरांना तेवढंच पुरेसं वाटलं.

दुसऱ्या दिवशी सरांनी वही उघडली.
हळुवारपणे लिहिलं
“आयुष्यभर तत्त्वज्ञान शिकवलं.
पण आज ,
आज मी ते प्रथमच जगण्याचा प्रयत्न केला.”
ते लिहिताना सरांना गहिवरून आल त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
एकेक झटका आठवत होता
बायकोचा शांत चेहरा, मुलाचं शेवटचं वाक्य, गरिबीत काढलेले दिवस. त्यातच खरं सुख होत.
त्यांच्या लेक्चरमधलं शेवटचं वाक्य होतं
“फक्त तत्त्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही,त्यासाठी व्यावहारिक आयुष्यातील झटके आणि चटके खावे लागतात
शब्दांमधलं सत्य फक्त चटक्यांनंतरच जाणवते,
विद्यार्थी स्तब्ध झाले.
पहिल्यांदाच त्यांना केवळ शिक्षक नसून देशमुख सर माणूस वाटले

शब्दसंख्या (२८१)

17 Comments

  1. согласование перепланировки нежилого помещения в жилом доме [url=http://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya11.ru/]согласование перепланировки нежилого помещения в жилом доме[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!