–
#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन
दिलेल्या ओळी
सोबत त्यांच्याच फिरायच जे तुमच्या अनुपस्थित देखील तुमची साथ देतात
मनोज गंगा-यमुना अर्बन सोसायटीचा मॅनेजर। होता.
. साधारण तीन शाखापासून सुरु झालेली सोसायटी आज सपुंर्ण महाराष्ट्रात काम करत होती.एक वर्षापूर्वी मधुरा नावाची एक गोड, लाघवी मुलगी असिस्टंट मॅनेजर म्हणून सोसायटीत रुजू झाली होती.मेहनतीपण होती.साध्या स्वभावाचा मनोज अन मधुरा मिळून आपल्या शाखेसाठी उत्तम काम करत होते.तो तिला लहान बहिण समजत होता.
काही विघ्नसंतोषी लोकांना हे सहन झाले नाही. मनोजच्या संसारात मिठाचा खडा टाकायच काम त्यांनी केल.त्याने पत्नीला समजावले पण काही उपयोग झाला नाही.
संकट नेहमी हातात हात घालून येतात.एका वृद्ध गिऱ्हाईकाला अंधारात ठेवून त्याच्या पैशाचा मोठा घोटाळा एका कर्मचाऱ्याने केला. मॅनेजर म्हणून मनोजला जबाबदार धरण्यात आले.हा धक्का सहन न होऊन बँकेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला.मधूराने त्याला दवाखान्यात भरती केले व सर्व कामाची जबाबदारी घेतली त्यानतंर योजनाबद्ध रितीने सर्व प्रकारणाचा छडा लावत मनोजला दोषमुक्त केले वृद्ध गिऱ्हाईकाला त्याचे पैसे परत मिळाले.
सर्व प्रकार जेव्हा मनोजच्या पत्नीला कळला तेव्हा तिने दोघांची माफी मागितली. अन तिला मनोमन पटले की…सोबत त्यांनाच ठेवायच जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू माडंतील.
अन मनोज च्या घरी आनंदात रक्षाबधंनाचत्यांनाचोहळा पार पडला. दुसऱ्या दिवसापासून ते दोघे बहिण भाऊ त्यांच्या अर्बन सोसायटीसाठी डिपॉझिट मिळवण्यासाठी सोबत फिरायला लागले.
शब्द संख्या… 195
विनया देशमुख

🙏🏻👍🏻👍🏼👌🏽