#माझ्यातली मी
#लघु कथालेखन
सौंदर्य सर्वांनाच आवडतं
पण काहींना चेहऱ्याचं
तर काहींना विचारांचं
सारिका आणि समर या दोघांना कशाचीच कमतरता नव्हती , उणीव होती ती फक्त आई बाबा म्हणून हाक ऐकायची . आणि ती उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी अनाथ आश्रमामधून एका छोट्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं …..
निर्णयानुसार ती दोघ अनाथ आश्रम मध्ये पोहोचली.
कायदेशीर सारे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर , तिथल्या कर्मचाऱ्यांनी साऱ्या मुलांना तिथे उपस्थित राहण्यासाठी बोलावू लागले , म्हणजे कोणत्या मुलाला दत्तक घ्यायचं ते ठरवतील .. पण सारिका म्हणाली की , या ठिकाणी बोलावू नका , ती मुलं ज्या ठिकाणी खेळत आहेत तिथेच जाऊन आम्ही एका मुलाला निवडू ….
त्यांना ज्या वयाचा मुलगा हवा होता त्याच वयाची दोन मुलं त्या ठिकाणी एका मांजराच्या पिलाशी खेळत होती . निलेश दिसायला खूप सुंदर आणि महेश दिसायला थोडासा सावळा ..
समरने पाहिल्या पाहिल्या निलेशला निवडलं . पण सारिका ने महेशला निवडलं ….
जेव्हा समरने त्याचं कारण विचारलं तेव्हा सारिका म्हणाली की , निलेश मांजराच्या पिलाला अतिशय क्रूरतेने वागवत होता . आणि महेश त्याच पिलाला अतिशय प्रेमाने कुरवाळत होता . त्यामुळे आपल्याला सौंदर्य नको आहे आपल्याला गरज आहे ती प्रेमाची … त्यामुळे आपण महेशलाच दत्तक घेऊया .. आणि त्या दोघांनी महेशला निवडल …
रूपाली मठपती …
