विवाहाशिवाय सहजीवन
राजाराणीच लग्न लागल आणि सगळी जेवायच्या वेळेपर्यंत गप्पा मारायला लागले. त्यात ते दोघही होते संजू आणि सारीका … काहीना माहित होते काहीना माहित नव्हते.सगळे त्यांच्यकडे बघत होते. खरतर तिच्याकडे बघत होते. का तर त्यांचं लग्न झाल नव्हत आणि ते एकत्र रहात होते.
माणूस हा कुतूहल प्रिय आहे त्यामुळे ह्या दोघांच ह्या वयात कस चालल असेल ?असा प्रश्न बर्याच जणांना पडला होता. त्याचं खरच छान चालल होत. ह्या वयात गरजेचा समतोल, समंजस पणा ,एकमेकांच्या भवनाचा आदर सगळ त्यात होत.
भारतासारख्य विविधता असलेल्या देशात मानवाच्या दैनंदिन आयुष्यात काही मूल्य स्वीकारळीत . जुलाई २०१२त श्री माधव दामलेंनी लिव इन रेलेशांशीप संस्था स्थापन केली. ती फारशी रुजली नाही. उतार वयीन साठी चांगली होती. त्या काळात एकमेकांच्या आधाराची गरज असते.मुल नोकरीसाठी बाहेर गेलेली असतात,कुणाची तर परदेशी असतात.एकमेकांच भा वनीक दुख झेलायला, वेदनांवर फुंकर घालायला जोडीदाराची गरज भासते.अश्या बरयाच काळ एकत्र रहाणाऱ्या जोडप्यांना कायद्याची मान्यता पण असते.
एकट रहावं, मनासारख्या गोष्टी कराव्यात,आपले छंद जपावे,पुनर्विवाह करावा. आत्तापर्यंत जे करता आल नाही त्या गोष्टी कराव्यात. स्त्री ही दुसऱ्या विवाहाच्या विरूद्ध असते.तिला आता कशातच गुंतायचं नसत.आत्ता कुठे मोकळा श्वास घेतोय.जबाबदाऱ्या काही प्रमाणात संपल्यात ,शिवाय समाज आहे च ना बोट दाखवायला.
सारिका नव्या संसारात रमत होती,हळू हळू
सगळ सावरत होती दोघंही आपापल्या परीने एकमेकांच्या साथीने संसाराचा नवा रथ उमेदीने पुढे नेत होते.लोकांच्या वेगवेगळ्या नजरा पण झेलत होते. काहींना हे आवडलं होतं,ह्या वयात सोबतीची ,बोलण्याची गरज असते.त्यांच्या नातेवाईकांच येणं जाण सुरू झालं होतं.
ह्या कथेवर मला अस म्हणावसं वाटलं की
जोडी दारा वर वर्चस्व गाजवू नये. एकत्र असताना दडपण नसावे. अस रहाण अवघड होईल , तेव्हा टी टी एम एम तू तुज्या घरी मी माझ्या घरी.

