#माझ्यातलीमी

# माझ्यातली मी
# कथा लेखन टास्क
# विक ऐंडटास्क
आरशातील जग (आरशातून दुसऱ्या जगाचा प्रवास )
हसरा आरसा
आज शेवटी एक निर्णय घेवूनच विचारातच ती घराबाहेर पडली.तिचे यजमान वन अधिकारी होते .शहरापासून दूर काहीसे जगंलाजवळ त्यांची निवासस्थाने असायची.मुख्य हायवे वरुन आपल्या तंद्रीतच ती चालत होती.चालत चालत कधी जंगलात पोहोचली कळलेच नाही .त्या हिरवाईने विचारांची जागा प्रसन्नतेने घेतली अन दाट झाडाच्या सावलीत बसली असता कधी डोळा लागला कळलेच नाही.कुणाच्या तरी स्पर्शाने जाग आली… साधारण तिच्याच वयाची एक सुंदर तरुणी उभी होती.
ही कोणी वनदेवता असावी ? असा विचार तिच्या मनात आला. निळावंती बद्दल ती ऐकून होती.
छे छे हिचे डोळे,रंग ,केस तर निळे नाही तर आपल्या सारखेच आहे .असेल कुणी समदु:खी .
तेवढयात प्रेमळ आवाज आला कोण तू?कुठून आलीस?
त्या प्रेमळ आवाजाने तिला भडभडून आले अन ती बोलती झाली…
दहा वर्षे झालीत लग्नाला… अपत्य सुख नाही. यजमानांन सोबत जगंला जगंलातून फिरत आहे यजमान वाईट नाहीत ….पण जगंल हेच त्यांच विश्व आहे. माहेर लांब आहे. तक्रार कराव अस काही नाही पण मनस्वास्थ्य नाही.
काही एक न बोलता त्या वनदेवतेने…हो ती तिला वनदेवताच समजत होती ..प्रेमळ पणे तिचा हात पकडून उठवले तिचा हात पकडून जंगलात चालायला लागली. चालता चालत एका निसर्ग रम्य महालासमोर त्या उभ्या राहिल्या. आत प्रवेश करताच एक प्रचंड मोठा आरसा दिसला वनदेवतेचा हात पकडून आश्चर्यचकीत होत तिने त्या आरशातून पुढे प्रवेश केला. थोड पुढे जाताच एका सिहांसना सारख्या मचंकावर एक खूपच प्रेमळ दिसणारी एक प्रौढा बसलेली होती. तिने तिला प्रेमळ पणे जवळ बोलावले .मायेने पाठीवरून हात फिरवता तिला भरुन आले. न सांगता च त्यांना सर्व कळले तिला शांत करत त्या बोलल्या…हे बघ बेटा …इथे तू आजूबाजूला ज्या स्त्रियां बघत आहेस त्या सर्व कमी जास्त प्रमाणात तुझ्या सारख्या च तक्रारी घेवून आल्या आहेत …पण इथे आल्या वर मी त्यांची स्वतःशी च ओळख करुन दिली आपल्याला काय आवडते हे ओळखायला शिकवले .या कामी ही तु जिला वनदेवता म्हटले ती मदत करते …आज बघ प्रत्येक जण आपल्या आवडीची कामे करत छान रमल्या आहेत . … मनापासून आनंदी होऊन काही घरसंसारात। परतल्या पण आहेत.
त्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या जणू ती प्रेमात च पडली. प्रत्येक शब्द ती तन्मयतेने ऐकत होती.
अग, तुझे काही चुकले असे मी म्हणतच नाही पण माझे म्हणणे असे की …आपण स्त्रियां घरसंसार, मुले, पती यामध्ये एवढ हरवून जातो की ..आपण ही एक स्वतंत्र व्यक्ती आहोत हे भानच विसरून जातो.
संसार तर साभांळायचा आहेच पण सोबत आपल्या आनंदासाठी काय करावे,काय आवडते हे स्वतः ओळखता आले पाहिजे
माझ्या कडे कुणी बघत नाही, कुणाचेच लक्ष नाही असा विचार मनात न करता स्वतःला ओळखयला शिकावे ….तेव्हा च आत्मसुखाचा मार्ग गवसेल.हे तिला मनापासून पटले.या सर्व विचारांचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की नैराश्य जाऊन सर्व प्रसन्न दिसायला लागले.
अन अश्या प्रसन्न मनाने तिला जाग आली. क्षणभर काही सुचेना….. जे पाहिले ते सत्य की स्वप्न समजेनासे झाले. विचाराच्या तंद्रीतच ती आरशासमोर उभी राहीली …तर तो तिच्या कडे पाहून हसत आहे असा तिला भास झाला. ….त्याच्यावर एक हसरी नजर टाकून …सर्व आळस झटकून मनात एक निश्चय करीत आजच्या दिवसाची एक सुंदर सुरवात ती करती झाली.

विनया देशमुख

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!