# माझ्यातली मी
# अलक लेखन
स्टेशन येताच टेंन फलाटावर थांबली.
काहीतरी खायला आणावे म्हणून तो लगबगीने खाली उतरला.
गाडी सुरु होताच तो आला नाही म्हणून ती फलाटावर नजर टाकत दरवाज्याकडे सरकत असता तिच्या खांद्यावर हाताचा स्पर्श झाला.
वळून पाहताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात मेघ दाटून आले अन पाऊस धारा वाहायला लागल्या.
तिने….बाबा.. म्हणत मिठी मारताच रुमालाने तिचे डोळे पुसायचे पण तो विसरला.
विनया देशमुख
