#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (२८/७/२५)
काॅलेज सुरू होऊन जवळजवळ एक महिना संपला, पण विद्यालय कॉलेजची फी भरता आली नव्हती. एमबीबीएस खर्चही खूप असतो. विद्या तंद्रीत कॅम्पस मध्ये चालत होती. तेवढ्यात समोर गाडी येऊन थांबली. विद्या दचकली.समोरची व्यक्तीने विचारले,
“काय, मरायला माझीच गाडी सापडली?”
विद्याच्या डोळ्यात पाणी आले.ती म्हणाली,”माफ करा, मी मरण्यासाठी नाही, शिकण्यासाठी इथे आली आहे.”
विनोद हसत म्हणाला,”मी मस्करी करत होतो.तू बींचा विचार करत होतीस, ना?तुझी फी भरली आहे.”
चार पाच वर्षांनी दोघे समोरासमोर आले.
विनोदने विद्याला लग्नाची मागणी घातली.
विद्या अंगठ्याने चप्पल खरडवत होती.विनोदला होकार मिळाला.
#१००शब्द
#सोमवार_२८_०७_२०२५
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.
