#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी
#लघुकथा_लेखन_टास्क(१५/१२/२५)
#किती_जपले_तरी…
दोन वर्षांपूर्वी श्रावणी औरंगाबादहून मुंबईत नोकरीच्या निमित्ताने आली होती. मुंबईसारख्या ठिकाणी तिने २ BHK फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तो तिने आपल्या परीने सजवला होता.
ऑफिसमध्ये जाता-येत शेखरची आणि तिची नजरानजर व्हायची. त्यानंतर त्यांनी एकमेकांना प्रपोज केले. छान, सगळं सुरळीत चालू होतं. एक दिवस शेखरने तिला सांगितलं, “काही काळापूर्वी माझं ब्रेकअप झालं आहे.”
तरीही तिने शेखरला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने स्वतःला सावरत मनाला समजावलं होतं की, काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. तसंच हे आहे – शेखर आपल्या आयुष्यात आला आहे. जेवढं शक्य होईल तेवढं त्याला आपण साथ द्यायची.
शेखरचा भूतकाळ विसरून आपण फक्त त्याचा वर्तमान काळ लक्षात ठेवायचा. जेवढं शक्य आहे तेवढं प्रेम आपण आपल्या कडून त्याला द्यायचं.
हा विचार करत असताना मग शेखर तिथे आला आणि त्याने श्रावणीला सांगितलं की, तो बंगलोरला चालला आहे.
“आता अचानक का? आता तर कुठे आपण एकमेकांना ओळखू लागलो होतो. आणि तू आता असं बंगलोरला का निघालास?”
“जवळजवळ चार ते पाच महिने आपण एकत्र राहतो आहोत. तू तुझ्या ब्रेकअपबद्दल मला सांगितलंस, ते मी मान्य केलं, तुला समजून घेतलं होतं. असं कधी तरी… आणि आता तू बंगलोरला चाललास?”
शेखर म्हणाला, “श्रावणी, ज्या ब्रेकअपबद्दल मी तुला सांगितलं होतं, ते परत जुळतंय म्हणून मी बंगलोरला जातोय.”
श्रावणीने परत एकदा आपल्या मनाला समजावलं की, तो तुझा नव्हताच. आता हेच बघ ना, आज तू या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतेस. एक दिवस तू हा फ्लॅट सोडून जाणार आहेस.
म्हणजे असाच अर्थ झाला ना – काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपली तरी आपली कधीच होत नाही.
#शब्द_संख्या_२५०
#१६_१२_२०२५_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!