#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२१/७/२५)
#डायरी
अंगणात बसून उषाताई रोज डायरी लिहायच्या. त्या शब्दातून
त्यांचं मन , स्वप्न आणि सत्य उमटायचं.पण एका तारखेच पान कोर होतं. जवळजवळ महिनाभरानंतर सदानंद ने ती डायरी पाहिली . त्याला प्रश्न पडला.”उषाताई ने, या पानावर काहीच का लिहिले नाही?” त्यांनी विचारलं
“त्या दिवशी मी इथे नव्हते,”उषाताई हसत म्हणाल्या .
“मग पुढे कसं लिहीलं?”
“त्या दिवशी मला माझ्यातल्या मीचा साक्षात्कार झाला. तो अनुभव शब्दात मांडणं अशक्य होतं, म्हणून पान कोरे ठेवलं “.
सदानंद स्तब्ध झाला.उषाताईंच्या डायरी च्या त्या कोऱ्या पानतच सगळं काही होतं .
#१००शब्द
#सोमवार_२१_०७_२०२५
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.
