यावर्षी विठोबाच्या दर्शनाला जायचं हा ठाम विचार भागाबाई आणि सिताराम केला होता. त्यासाठी तुळशी वृंदावनात छान तुळस उजवले होते सितारामला मुलं वारीला जाऊ नकोस म्हणून सांगत होते.
कारण सितारामला मागच्या वर्षी संधिवाताचे दुखणे सुरू झाले होते डॉक्टर आणि जास्त चालायचे नाही. म्हणून सांगितले होते पण सिताराम आणि भाग्य ऐकून घ्यायला तयार नव्हते. ©️®️ सौ.अपर्णा जयेश कवडे
भागाबाई चे एकच बालपण चालू होते इतक्या वर्षात वारी चुकली नाही आणि आता चुकणार; विठोबा वर्षभर वाट पाहत असतो लेकर कधी भेटायला येतात मग आपण पण आनंदाने गेले पाहिजे.
नाय होय करता मुला बाळाने परवानगी दिली वारीला जायला सितारामने सांगितले की वारीला जाताना वाटेवर काही बरे वाईट झाले. तर मी विठुरायाच्या भेटीला गेलो. परत आलो तर तुमच्यावर आनंदाने पुढल्या वारीची वाट पाहिन.
मुला बाळांचा निरोप घेऊन भागाबाई डोक्यावर तुळस घेऊन आणि सिताराम पण डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन निघाले. आज त्या दोघांना इतका आनंद झाला होता की ते देहभान हरपून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत होते. जणू काही सिताराम ला संधीवाताच्या दुखण्या पासून मुक्तताच मिळाली होती.
अशा जोशात सिताराम आणि भागाबाई नाचत होते.
शब्द संख्या १००
©️®️ #सौ.अपर्णा जयेश कवडे.
