#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (9/1/2026)

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क (९/१/२०२६)
#एकनवीसुरुवात
काय पाटील वहिनी, काल तुमच्या घरातून कोरड्या उलट्याचा आवाज येत होता. काही गोड बातमी आहे का? समृद्धीकडे!
जळ मेल लक्षण! कसली गोड बातमी? रात्री उशिरा अरबट चरबट खायचं आणि सकाळी अपचन झालं म्हणून उलट्या काढायच्या. दुसरं काय जमत तिला? लग्नाला दोन वर्ष झाली. पण काही लक्षणे दिसत नाहीत.
कुठल्या मुहूर्तावर हिला सून म्हणून आणली हेच कळत नाही.
सुवर्णा, तोंडाला काही हाड बिड आहे की नाही! सासूबाई, तुम्ही मलाच बोलताय? हे जरा तीस-35 वर्ष मागे जाऊन बघा, मग कळेल.
सुवर्णा, मी काही विसरले नाही. त्यावेळी तुला सुद्धा मी माझ्या परीने सांभाळून घेतलं आहे. तू विसरलीस? भोपळ्यासारखी पसरली.
मंजू, तुला विचारलं गोड बातमी एका कोरड्या उलट्या होतात म्हणून, त्यावर तू एवढं लेक्चर दिलंस. एखाद्या एवढं टोचून बोलू नये ग बाई!
सर्व इथेच भोगून जावे लागते, कळ का तुला?
आता दोन वर्षच झाली आहेत लग्नाला. तुला तर दहा वर्षांनी प्रगती झाली, त्यानंतर हा विकास झाला. प्रगतीच्या वेळी तुझ्या आईने तर सरळ सांगितलं होतं की नातू झाला तरच तुला आम्ही घरी नेऊ, नाही तर रडत बस. मंजू, तुला पण काय काम नाही का? सकाळ सकाळच काहीही विचारतेस. आधी मर्कट, त्यात हातात कोलीत दिलंस. आता दिवसभर घरात आग धुमसत राहणार.
निलू, तू आज इकडे कशी? किती दिवसांच्या सुट्टीवर आली आहेस?
समृद्धी कुठे आहे? आजी, तू मला सांगितलं होतंस ना, समृद्धीकडे बोल म्हणून. म्हणून दोन दिवस क्लिनिक बंद ठेवून इकडे आले.
समृद्धीकडे बोलण्याआधी तुझ्या आईकडे बोल. सकाळपासूनच तोंडाचा पट्टा चालवला आहे.
काय ग आई! आजी बोलते ते खरं आहे का? का तिच्या पाठीशी लागतेस? आधी तुझ्या मुलाच्या टेस्ट करून घे, मग बोल तिला. घालून पाडून समजलं का!
निलू, तू आमच्या मध्ये पडू नकोस. तुझ्या भावामध्ये काही दोष नाही. हिलाच आपल्या घराला वारसा देणारं बाळ नको आहे.
आई, हे रिपोर्ट बघ. समृद्धीचे पूर्णपणे नॉर्मल आहेत. तिच्यात कुठलाही दोष नाही. पण दादाने कुठल्याही टेस्ट करायला नकार दिला आहे. त्याला विचार, असं तो का करतोय? मग तिला दोष दे.
समृद्धी, काय होतय तुला? सकाळपासून खूप गरगरतय, उलट्या होतायत. पोटात पिळ पडल्या सारखं होतय. पाळी येऊ किती दिवस झाले? बरोबर अठ्ठावीस दिवस झाले. म्हणजे तुझ्या रिपोर्टप्रमाणे ही ती योग्य वेळ आहे. या चार दिवसात ट्रीटमेंट केली तर सक्सेस होऊ शकते. चल माझ्या बरोबर…
असं अग, त्यांना न सांगता एवढा मोठा निर्णय कसा काय घ्यायचा!
दादाने तर सांगितलं की तो टेस्ट करणार नाही. आई तुला दोष देत राहणार. आता हे असं चालणार नाही. मी पण एक स्त्री रोगतज्ञ आहे. मला पण कळतं, तुला किती काय आणि कोणत्या प्रकारचा त्रास होत असेल.
आई विसरली असेल. माझं लग्न म्हणजे प्रेम विवाह झाला आहे. माझा तुझ्यापासून यांनी सर्वांनी लपवून ठेवलं आहे. पण हे आता आती झाल्यावर, मला गप्प बसून चालणार नाही. म्हणून सांगते, तर प्रेम विवाह झाला. दुसऱ्या महिन्यापासून माझ्या सासूबाईचे सुरू झाले. रोजच्या रोज असं करा, तसं करा. म्हणजे सहा महिन्यात गोड बातमी मिळेल. म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला जायला मोकळे. पण आमच्या दोघांच्याही हातात हे नव्हतं. सतीशला पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. तो निघून गेला. दोन वर्ष म्हणता म्हणता तीन वर्षे झाले.
तो चांगलं शिक्षण घेऊन परत आला. तोपर्यंत मला एवढा त्रास झाला होता की मी डिप्रेशनमध्ये गेले. त्यामुळे मुलं होणे राहिले बाजूला. मी वेडी होऊ नये म्हणून सतीशने सर्व काही बाजूला ठेऊन मला वेळ द्यायला सुरुवात केली.
बरोबर सात वर्षांनी आम्हाला जुळी मुलं झाली. सासू-सासऱ्यांचं तोंड बंद. पण माझ्या नवऱ्याने दिलेली साथ लाख मोलाची होती.
तशी साथ माझा भाऊ देत नाही. मग तू एकटीने का सहन करायचं?
माझ्या वेळेला मला माहेरून सपोर्ट होता. पण तुला तुझ्या माहेरून पण सपोर्ट नाही. हे ऐकून तर मला खूप राग आलाय. दोन स्त्रिया एका स्त्रीला समजून घेऊ शकत नाहीत, या सारखं दुर्दैव आजून कोणतं असणार?
म्हणून मी तुझ्या त्या दिवशी सर्व टेस्ट करून घेतल्या आहेत. तू आता हा त्रास सहन करायचा नाही. मी माझ्या हिम्मतीवर तुझं IVF करणार आहे. माझ्या क्लिनिकमध्ये. तू का म्हणून आई होण्यापासून मागे राहायचं? तुझ्या भावनांची कोण कदर करत नसेल तर तू का विचार करतेस!
मागचं सर्व सोडून दे. आजपासून नवीन सुरुवात कर. मी आणि आजी तुझ्या बरोबर आहोत. दादाला पण मी काल क्लिनिकमध्ये बोलावलं होतं. मी आणि सतीश त्याबरोबर जवळजवळ चार तास बोलत होतो. पण तो काहीच सकारात्मक बोलायला तयार नव्हता. मग मी त्याला फायनल विचारलं की तू टेस्ट करणार नाहीस, मग समृद्धीला घटस्फोट देऊन मोकळं कर. तिच्यात काही दोष नसताना तिने का आई-बाबांची बोलणी खायची? त्यावर तो म्हणाला, मला तुम्हाला काय करायचं ते करा. मला मुलांच्या जबाबदारीत आडकायचं नाही. पण मी समृद्धीला घटस्फोट देणार नाही.
हे सर्व ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकते की काय असं झालं. मग मी हा निर्णय घेतला. त्या दिवशी आपण टेस्ट केलेले, त्या वेळेला साधारण माझ्या लक्षात आलं होतं की आता तुझ्या ट्रीटमेंटसाठी योग्य दिवस आहेत. तू शिकलेली आहेस, तू तुझ्या मुलांची जबाबदारी घेऊ शकतेस. माझ्या आईचं आणि बाबांचं तोंड पण बंद होईल. आणि आजपासून तुझ्या एका नवीन आयुष्याची आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. मागचं सगळं झालं गेलं, तू विसरून जा आणि हा नवीन आयुष्याची सुरुवात कर. उद्यापासून तुझ्यावर ट्रीटमेंट सुरू करते.
पण त्याआधी तुला विचारते की हा जो मोठा एकतर्फी निर्णय घेतलाय, तो तुला मान्य आहे का? का तुला दादाला घटस्फोट द्यायचा आहे? त्याचे पण बोलणी करायला मी तयार आहे.
ताई, तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य आहे. घटस्फोट घेऊन तरी मी काय करणार? माहेरी पण मला कोणी स्वीकारणार नाही. त्यापेक्षा नातवंड आल्यावर हे घर तरी आनंदाने एकत्र नांदेल. एकटीने जीवन जगण्यापेक्षा उरलेलं आयुष्य तुम्हा सर्वांबरोबर आनंदात राहून…
#१०_०१_२०२६_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

error: Content is protected !!