#माझ्यातलीमी #विकेंड_टास्क(१९/१२/२५)

#माझ्यातलीमी
#विकेंड_टास्क(१९/१२/२५)
#लग्न_म्हणजे_सोशल_स्टेटस_शो.
लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो
“काय सांगायचं! दुसरं काय सांगणार आहेस? लग्न करायचं योग्य वयातच लग्न झालेलं बरं असतं गं! आराधना तिच्या मागे नको लागून.”
आईच्या या शब्दांनी अनुजाच्या कानात घुमत होते. तिच्या वयाच्या २७व्या वर्षी, आई-वडील लग्नाच्या जोरात तयारीला लागले होते. अनुजा चे बाबा म्हणाले,”आता कुठे तिला हिंजवडीला आयटी कंपनीत नोकरी मिळाली आहे. लगेच काय तिच्या मागे लागतेस?” हे ऐकून आईचा रागाचा पारा अजूनच चढला. अनुजा मात्र हसली. तिला नोकरीची खूशी होती, स्वातंत्र्याची. पण कुटुंबाच्या डोळ्यात लग्न हा एकच विषय होता.
“अनुजा तू फक्त एकदा मुलगा बघून घे; मग पसंत पडलीस तर पुढचा विचार करू. पण चांगलं स्थळ चालून आलंय, ते नाकारू नये एवढीच अपेक्षा आहे.” वडिलांचा हा सल्ला अनुजाने मानला. अनुजाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. ईशान – एक सॉफ्टवेअर इंजिनीअर, शांत आणि स्मार्ट – तिला पटकन आवडला. लगेचच ईशानकडून फोन आला: “अनुजा मला आवडली. लग्नाची बोलणी सुरू करूया का?”
बोलणी सुरू झाल्या. देणे-घेणे, कुठे करायचं लग्न, किती माणसं येतील – या सर्वांचा विचार झाला. बजेट प्रमाणे हॉल कुठे घ्यायचा, देण्याचं सामान कुठून घ्यायचं, खर्च अर्धा-अर्धा करायचा की अनुजाच्या घरच्यांनी सर्व सांभाळायचा? ईशानच्या घरी बोलणी होताना अनुजाला आणि तिच्या कुटुंबाला कळलं की दोघांच्या कुटुंबांमध्ये किती तफावत आहे. ईशान अलिशान बंगल्यात राहणारा, तर अनुजा आणि तिचं कुटुंब २ बीएचके मध्ये. पण अनुजा पसंत होती, पहिल्या स्थळाकडून होकार आला, म्हणून उगाच आडेवेढे घेण्यात अर्थ नव्हता. दोघांनीही तयारी सुरू केली.
सर्व खरेदी-वगैरे झाली. तेवढ्यात ईशानचा फोन आला: “लग्नाच्या आधी आपण सोशल मीडिया इव्हेंट करूया. रील्स, फोटोशूट – सगळ्यांना आवडेल.” अनुजाला हे मान्य नव्हतं. तिचं स्वप्न होतं साधं लग्न. उगाच कशाला जास्तीचा खर्च? “आपण लग्न एन्जॉय करायचं, त्यात सोशल मीडियावर जग जाहीर कशाला?” तिच्या मनात विचार फिरले, पण ती शांत राहिली.
एक नाही झालं तो लगेच इन्स्टाग्राम रील्ससाठी डिझायनर कपडे, मेकअप आर्टिस्ट – सर्व बजेटच्या बाहेर गेलं. अनुजा पुन्हापुन्हा विचारात अडकते: “कशाला हा वायफळ खर्च? या पैशात दुसऱ्या कोणाला तरी मदत होईल.” पण तिचे शब्द ओठांतल्या ओठांतच विरून गेले.
सर्वप्रथम संगीताचा कार्यक्रम ठेवला. अनुजाच्या मैत्रिणी तिची थट्टा करतात: “काय रे, साधं लग्न करणार? कसलाच शो करणार नाहीस?” अनुजाला हे माहीत नव्हतं की हे लग्न चार-पाच दिवस चालणार. शेवटी घरच्यांनी ठरवलं, मग गप बसावंच लागलं. नंतर कळलं की हा फक्त साखरपुड्याचा सोहळा आहे.
ईशान जरी साधेपणाचा आव आणत असला तरी त्याच्या आई-वडिलांना हे लग्न म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’. “पन्नास ते एक लाख रुपयांचा हॉल, १००० च्या वर पाहुणे, वरच्या लहान मुलांना दोन-तीन लाखांचा खर्च – कशाला कमी पडू द्यायचं? म्हणतील लोक? आम्ही काय कमी केलं नाही!” हे सर्व कमीच होतं का म्हणून अनुजाची सिस्टर-इन-लॉ आणि ईशानच्या घरातल्या लग्नाचं ‘हॅशटॅग’ बनवलं: #RoyalWeddingVibes. आता लाइक्स मिळवण्यासाठी विचित्र पोज द्याव्या लागल्या. त्यामुळे अनुजाला खूप मानसिक त्रास झाला. तिला वाटत होतं, हे लग्न नाही, फक्त शो आहे असेच वाटत होते.
अनुजा आणि ईशानच्या कॉमन मैत्रिणी सतत काही ना काही सांगतच होत्या. एका मैत्रिणीने तर कहरच केला. तिच्या लांबच्या नात्यातल्या लग्नाचा दिखाव्यामुळे कसा मोडला, ते सांगितलं. “महागडा हॉल, महागड्या साड्या, पण प्रेम नव्हतं. शेवटी घटस्फोट झाला.” हे ऐकून अनुजाला विचार येतो: “माझं असं होणार का?”
साखरपुडा छान पद्धतीने साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीपासून मेहंदी प्रोग्राम सुरू झाला. दिखावा कुठे करायचा हेच कळत नव्हतं म्हणून हॉल फुलांनी सजवला होता. काही ना काही चुकत होतंच. विघ्न संतोषी लोकांची काही कमी नव्हती. निमित्त असं झालं की कुणाचा तरी धक्का लागला आणि फुलांचा मंडप एकदम पडला. सगळीकडे गोंधळ उडाला. फुले इकडेतिकडे विखुरली, पाहुणे हसले, आणि अनुजाच्या डोळ्यात अश्रू आले. “हे सर्व काय?” ती स्वतःशीच म्हणाली. तिच्या मनावर ताण आला. ती उठली आणि सगळ्यांसमोर म्हणाली, “थांबा! हे लग्न नाही, सर्कस आहे! मला साधं लग्न हवं होत. कमेंटसाठी , लाइक्ससाठी नाही!”
कुटुंब हादरून गेलं. ईशानची आई म्हणाली, “पण लोक काय म्हणतील?” अनुजाने उत्तर दिलं, “लोक म्हणतील ते म्हणू द्या. आमचं लग्न आमचं आहे. बजेट ओव्हर होतंय, तणाव होतोय – हे स्टेटस नव्हे, त्रास आहे.” ईशान पुढे आला: “अनुजा बरोबर आहे. मलाही साधं लग्न हवं आहे. आम्ही दोघे एकत्र राहू, दिखाव्याशिवाय.” मैत्रिणींनीही साथ दिली. त्या रात्री सगळ्यांनी बोलणी केली. शेवटी ठरलं – लग्न छोटं, ५० लोकांचं, घरीच. #RoyalWeddingVibes नव्हे, #SimpleLoveStory!
लग्नाच्या दिवशी अनुजा साडीत, ईशान कुर्त्यात – साधे, पण हृदयस्पर्शी. सोशल मीडियावर एकच पोस्ट: “लग्न म्हणजे प्रेम, नव्हे शो. खरे लाइक्स हृदयात मिळतात.” त्या पोस्टला हजारो लाइक्स मिळाले, पण अनुजाला फक्त ईशानच हवा होता. कुटुंब बदललं, आणि अनुजा समजली – खरा स्टेटस म्हणजे सुख, दिखावा नव्हे.
#२०_१२_२०२५_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

5 Comments

  1. Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.

  2. Продажа тяговых АКБ https://faamru.com для складской техники любого типа: вилочные погрузчики, ричтраки, электрические тележки и штабелеры. Качественные аккумуляторные батареи, долгий срок службы, гарантия и профессиональный подбор.

  3. Трастовый маркетплейс https://buyaccount.digital приветствует маркетологов в своем пространстве цифровых товаров для FB. Если вам нужно купить аккаунт Facebook для рекламы, обычно задача не в «одном логине», а в проходимости чеков: отсутствие вылетов на селфи, зеленые плашки в Ads Manager и прогретые FanPage. Мы оформили короткую карту выбора, чтобы вы без лишних вопросов понимали что подойдет под ваши офферы перед покупкой.Быстрый ориентир: откройте категории Фарм (King), а для масштабирования — переходите напрямую в профильные позиции: Безлимитные БМ. Ключевая идея: покупка — это только вход. Дальше решает схема залива: как вяжется карта, как шерите пиксели без риска банов, как реагируете на полиси и как дублируете кампании. Особенность данной площадки — заключается в наличие масштабной библиотеки арбитражника, в которой выложены свежие рекомендации по проходу ЗРД. Команда поможем, как аккуратно запустить первый адсет, чтобы вы не словили Risk Payment и дольше жили в аукционе . Оформляя здесь, вы получаете не просто аккаунт, но и всестороннюю консультацию, прозрачные правила чека, страховку на момент покупки плюс максимально низкие прайсы среди селлеров. Дисклеймер: действуйте в рамках закона и в соответствии с правилами Facebook.

  4. Мультимедийный интегратор тут интеграция мультимедийных систем под ключ для офисов и объектов. Проектирование, поставка, монтаж и настройка аудио-видео, видеостен, LED, переговорных и конференц-залов. Гарантия и сервис.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!