#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क
#नाट्यलेखन(१९/११/२५)
#शीर्षक__प्रेम चौकटीत दिसत
अंक १: प्रेमाची पहिली सूर
(रंगमंचावर एक वाड्याचा भक्कम दरवाजा. दरवाजा उघडला की समोर छान सागवानी फर्निचर, चारही बाजूला पडव्यां. डाव्या बाजूच्या पडवी तून स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा, समोरच्या पडवी तून दोन पायऱ्या चढून गेल्यावर माजघर, उजव्या बाजूला मोठी खोली. त्यात छान बैठक मांडलेली. खोलीच्या मध्यभागी चौरंगावर पितळी घंगाळे-सदृश मोठे भांड, त्यात कमळाची निळी, गुलाबी, पांढरी फुले. बैठकीत गादीला पांढरी चादर, छोट्या उश्या, लोड सर्व काही पांढरे स्वच्छ. चौरंगा च्या बरोबर वरती छान काचेचे झुंबर. कोपऱ्यात तानपुरा लावून आपल्याच नादात तन्वी बसलेली. तबला-पेटी वाजवायला अजून कोणी बसलेले नाही. वेळ: संध्याकाळची.)
पात्र परिचय:
तन्वी: समाजसेविका, संगीत विद्यालय चालवणारी.
तन्मय: मोठ्या घरातील मुलगा, संगीताची आवड म्हणून विद्यालय शिकण्यासाठी आलेला.
तन्वी चे आई-वडील: आयुर्वेदिक डॉक्टर.
तन्मय चे आई-वडील: गावातील मोठे जमीनदार.
तन्मय च्या घरी: सतत माणसांची ये-जा, भरपूर नोकर-चाकर.
तन्वी च्या घरी: आई-वडील, दोन भाऊ, एक वहिनी, एक बहीण असा परिवार.
तबला वादन: ऋषिकेश. पेटी: सारिका – तन्वी सारखीच समाजसेविका आणि पेटी वादनात मास्टर.
(तन्वी तानपुरा लावून बैठकीवर बसलेली असते. तेवढ्यात तन्मय तिथे येतो. समोर तन्वी छान सिल्क चा गुलाबी रंगावर फिकट पिवळा-हिरवा रंगाची नक्षीकाम केलेली ड्रेस घालून डोळे मिटून शांत तानपुरा लावून बसलेली. जणू काही रती च बसली आहे. तन्मय एकदम प्रेमात पडतो. मंत्रमुग्ध होऊन तो एकटक लावून बघत असतो. तेवढ्यात ऋषिकेश आणि सारिका जवळजवळ भांडतंच तिथे प्रवेश करतात.)
ऋषिकेश आणि सारिका: (समोरचे दृश्य पाहून भारावून, भांडण सोडून तन्वी आणि तन्मय कडे पाहत असतात.)
(तेवढ्यात तन्वी ची आई येते आणि सर्वांना म्हणते.)
तन्वी ची आई: काय रे, आज तुम्ही दोघे जण आणि एकच शिष्य? बाकी कुठे गेले?
सारिका: ते सर्व नाटकाच्या तालमी साठी येतात. पण त्याच काय आहे ना काकू? आम्हाला आमच्या नाटकासाठी दोन लीड पात्र मिळत नव्हती. पण आता ती दोन पात्र पण सापडली!
तन्वी ची आई: काय? आता कशी सापडली? एवढे नाटक तरी कुठले करतात?
ऋषिकेश: ती “फुलराणी”.
तन्वी ची आई आणि सारिका: (एकदम बोलतात) काय!
सारिका: हे नाटकाचे नाव केव्हा ठरले?
ऋषिकेश: हे पण आता च ठरले. (थोडे हसत पुढे जाऊन तन्मय ला ढोसळतो, कसला जवळजवळ पाडतोंच.)
तन्मय: मला वाटले की… अहो, तुम्ही मला का ढकलून दिले! पडलो… होतो… हो… समोरच्या रती च्या प्रेमात…
सारिका: काय म्हणालात… मिस्टर तुम्ही?
तन्वी ची आई: तुम्ही कोण! पहिल्यांदाच पाहते मी तुम्हाला.
तन्मय: काकू म्हणले तर चालेल का तुम्हाला? का मामी म्हणू?
तन्वी ची आई: काकू च म्हण. मामी म्हणा, माझ्या मुली बरोबर लग्न कुठे झाले तुझे? तर असू दे, काकू बोल. ऐ सारिका बाळ, माझा चष्मा पाहिलास का तू? (चष्मा तन्वी च्या आईच्या डोक्यावर असतो.)
सारिका: नाही ना काकू. तुम्ही बहुतेक तुमच्या रस शाळेत विसरून आलात वाटते. (खरंतर सारिका ने डोक्यावरचा चष्मा बघितलेला असतो. पण तन्मय ला तिने पाहू नये म्हणून सारिका ही युक्ती करते.)
ऋषिकेश: (तन्वी कडे जवळ जाऊन हळूच तिच्या हातावर हात ठेवून) व्हा व्हा, काय बात आहे! छान छेडली तू. ताल इकडे, विकेट उडाली बघ रे. “उघड उघड लोचने तन्वी, एकजण तुझ्या प्रेमात आकंठ बुडाला!”
तन्वी: (एकदम डोळे उघडते) समोर तन्मय, तुम्ही… कोण… आणि… तुम्ही मला स्पर्श का केला? कळत नाही का तुम्हाला? मी चांगल्या घरची मुलगी, त्यातून एक समाजसेविका. संगीत विद्यालय चालवते. मी म्हणजे संगीताचे शिक्षण देते. आणि तुमची एवढी हिम्मत कशी झाली हो!
ऋषिकेश: चिलं यार, कसली सुपरफास्ट एक्स्प्रेस? एकदा सुटली की पार नॉनस्टॉप सुरू…
सारिका: ऋषी, जरा थांब. तन्वी, तुला यांनी नाही हात लावला. हे तर तुझ्यावर फिदा झालेत… विकेट उडाली त्यांची… या ऋषीने त्याला पण पाडले आणि तुला हात लावला. तो बघ, मागे उभा आहे.
तन्वी ची आई: ये बाळांनो, हे काय? तुमच्या नाटकातील संवाद आहेत का?
तन्वी: आई तू… सारिका, हे नाटकात काय?
सारिका: अगं काय झाले? त्याच काकू, अचानक आल्या. त्यात हे मिस्टर आधीच इथे तुझ्या समोर तुझ्याकडे एकटक लावून बसले होते. आम्ही दोघे आलो आणि काकू आल्या, मग काय…
तन्वी ची आई: बरं बाळांनो, मी माझा चष्मा रस शाळेत विसरून आले बहुतेक. तो घेऊन येते. आणि तुम्हाला काहीतरी चाऊमाव तोंडात टाकायला घेऊन येते. पाणी आहे बघ, त्या पितळी सूरईत…
(आई जाते. पडदा पडतो. पहिला अंक संपतो.)
(अंक १ संपतो. शब्द: ६२५)
अंक २: चौकटीतील संघर्ष
(दुसरा अंक सुरू होतो. तन्वी च्या घरातील बैठक. तन्वी, तन्मय, सारिका, ऋषिकेश.)
तन्मय: आपली ओळख करून देतो. मी तन्मय. मला गाणं शिकायचं. माझा व्यवसाय आहे आणि या गावातील मोठे जमीनदार – ते माझे पालक. त्यांच्या कृपेने मी या जगात आलो. गाणं तर शिकायचं आहे, पण मला तुझ्याबरोबर पुढचा प्रवास करायला आवडेल.
सारिका आणि ऋषिकेश: ऐ बाबा, तू हे काय बोलतोस? काय, तुझ्या घरी कळले तर देतील का परवानगी?
तन्वी: नाही… नाही, एक मिनिट. मला कशाशी संबंध नाही? मी म्हणजे माझ्या लक्षात येत नाही तुम्हाला काय म्हणायचे मिस्टर त… तन्मय?
सारिका: अगं, ते तुला चक्क लग्नाची मागणी घालतांयत!
तन्वी: ओ मिस्टर, काय? ओळख नाही, पाळख आणि सरळ मागणी? आधी घरी विचारून या!
ऋषिकेश: आपले नाटक फायनल झाले. त्यात तू आणि मिस्टर तन्मय लीड रोल करतात. ओके? नो एक्स क्यूज, समजलं?
(दुसऱ्या दिवशी सकाळी. तन्वी च्या घरी तन्मय येतो. समोर तन्वी चे आई-वडील.)
तन्वी चे आई-वडील: ये तन्मय. तन्वी आताच नाटकाच्या तालमी साठी पाठीमागच्या बंगल्यात गेली. तू नाही गेलास?
तन्मय: मला तुमच्याशी बोलायचं होतं!
तन्वी चे आई-वडील: काय बोलायचं होतं?
तन्मय: (एक मोठा श्वास घेऊन) मला तुमच्या तन्वी सोबत लग्न करायचं आहे.
तन्वी चे आई-वडील: काय! हे कसं शक्य आहे? तुम्ही कुठे, आम्ही कुठे? आम्हाला हे मान्य नाही. तुझ्या घरच्यांनी परवानगी दिली का तुला?
तन्मय: नाही! आधी तुमची परवानगी मिळवावी आणि मग माझ्या घरी सांगावं, असा मानस आहे माझा!
तन्वी चे आई-वडील: तू काय विचार करतोस, ते कळतंय का तुला? अरे, अशामुळे तू आमची बेइज्जत करतोस. जर तुझ्या आई-वडिलांना हे कळले तर ते आम्हाला हिणवंतील. मोठ्या घरचा मासा गळाला अडकवला, असं म्हणतील. आधी तू तुझ्या घरच्यांशी बोल, मग बघू. तोपर्यंत तन्वी च्या संपर्कात राहू नकोस, समजलं?
(दोन दिवसांनी. तन्वी च्या घरात तन्वी, सारिका, ऋषिकेश, तनिष्का.)
तन्वी: सारिका, मिस्टर तन्मय आले नाहीत दोन दिवसांत.
ऋषिकेश: कसे येतील? त्यांना प्रेम चौकटीत असते हे दाखवायचं. तुझ्या घरच्यांशी बोलून गेले. तेव्हा तर काका-काकूने त्यांना इकडे फिरायचे नाही असं सांगितले आहे. तुझ्या वहिनीने सांगितले मला.
तन्वी: काय? एवढं सगळं घडलं आणि आई-बाबा, दादा, वहिनीने मला न सांगता तुम्हाला सांगितलं? हे काही बरोबर नाही केलं त्यांनी!
तनिष्का (तन्वी ची बहीण): तनू, बाहेर कोणी तरी आलंय. ज्येष्ठ नागरिक आहेत, ते तुझी चौकशी करतायत.
तन्वी: आत घेऊन ये त्यांना. काही तरी प्रॉब्लेम असेल. बघून बोलून काही मार्ग निघतो का?
तनिष्का: ये हे बघ तनू.
ज्येष्ठ नागरिक: ओ तू का ती तन्वी? तू आमच्या लेकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे!
तन्वी: एक… एक… मिनिट… तुम्ही काय बोलता, ते तुम्हाला तरी कळतंय का?
ज्येष्ठ नागरिक: स्वतःला समाजसेविका समजतेस आणि हे असले धंदे करतेस?
(तन्वी बोलायच्या आधी ऋषिकेश आणि सारिका.)
ऋषिकेश आणि सारिका: आजी-आजोबा, तुम्ही तुमचा परिचय दिला नाही. दुसरी गोष्ट, तिला समाजसेविका समजून घेण्याची गरज नाही. ती मुळातच ते काम श्रद्धेने, आपलेपणाने जीव ओतून करते. त्यामुळे तुम्ही तिच्यावर जे आरोप करतात, ते फार चुकीचे आहेत, समजलं?
ज्येष्ठ नागरिक: ओ, परिचय द्यायचा राहून गेला नाही का? मग कान उघडे ठेवा. आम्ही तन्मय चे आई-वडील.
तन्वी, तनिष्का, सारिका आणि ऋषिकेश: काय? तुम्ही तन्मय चे आई-वडील? पण मग… तुम्ही तन्मय ला का घेऊन आला नाहीत?
ज्येष्ठ नागरिक: तो आला असता तर तुमची ही खेळ आम्हाला बघायला मिळाले नसते ना… म्हणून त्याला बरोबर आणला नाही.
तन्वी चे आई-वडील: एक मिनिट! तुम्ही आमच्या मुलांसोबत असं बोलू शकत नाही!
ज्येष्ठ नागरिक: तुमचा परिचय काय?
तन्वी चे आई-वडील: तुम्ही जी लाट बोलता त्या जाळ्यात अडकवलेल्या तिचे आई-वडील आहोत आम्ही!
ज्येष्ठ नागरिक: ओ… बर झालं, तुम्हाला कुणीतरी इथे बोलावून आणलं.
तनिष्का: कुणीतरी नाही, मी बोलावून आणले आमच्या आई-वडिलांना. मी तनू ची बहीण आहे.
तन्वी चे आई-वडील: (एकदम साधेपणाने नमस्कार) बरं झालं, आपली भेट झाली. इथे उभ्याने बोलण्यापेक्षा बसून शांतपणे बोलू या.
ज्येष्ठ नागरिक: आम्ही बोलायला नाही आलो, आम्ही सांगायला आलो आहोत की आमच्या मुलांचा नाद सोडा.
सारिका: तन्वी, तुमच्या मुलाच्या पाठी नाही लागली. तुमच्या मुलाने तिला मागणी घातली आहे.
ज्येष्ठ नागरिक: हे शक्य नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी आमच्या तोलामोलाची मुलगी पाहू. ही कशी समाजसेविका आणि गाणं शिकवणारी साधी फडतूस मुलगी?
तन्वी चे आई-वडील: तुम्ही तोंड सांभाळून बोला! कशी आहे ती? आमची मुलगी आहे. तुमचा मुलगा आधी आमची परवानगी घ्यायला आला होता. आम्हीच त्याला तुमची परवानगी घेऊन ये म्हणून सांगितले. तर तुम्ही इथे येऊन आमचाच अपमान करता? निघून जा इथून…
(पडदा पडतो. दुसरा अंक संपतो.)
(अंक २ संपतो. शब्द: ६७२)
अंक ३: प्रेम चौकटीत असतं
(तन्मय चे घर. मोठे गेट, सिक्युरिटी गार्ड. समोर बंगला, पोर्च मध्ये दोन गाड्या उभ्या. त्याच्या बाजूला दोन ड्रायव्हर. पोर्चमधून आत गेल्यावर मोठा व्हरांडा, त्यात दोन जर्मन शेफर्ड साखळीने बांधलेले. बंगल्यात जातात. समोर हॉल, निळ्या रंगाची छटा असलेली सजावट. सोफे, मोठ्या खुर्च्या, टेबल – जुन्या पद्धतीची पण आता काळातही छान वाटणारी. मोठ्या भिंतीवर घड्याळ, नेमके बरोबर दुपारचे बारा वाजले आहेत. “स्वागत आहे आपले” असं दर एक तासांनी सांगणारा घड्याळांतील पक्षी. छान अगरबत्ती आणि सुग्रास भोजनाचा सुगंध दरवळत असतो.)
तन्मय चे आई-वडील: (तन्वी च्या कुटुंबाला) या… या. काही गोष्टी आपण आता सोडून देऊ या. अगं, आधी त्यांना बसू तर दे. मग आपण निवांत बोलू.
(नोकर पाण्याचे ग्लास ट्रेमध्ये घेऊन येतो. वाटीत गुळाचे खडे. तन्वी चे सगळे कुटुंब पाणी आणि गुळ घेते.)
तन्मय ची आई: तन्वी, आई, वहिनी आणि तनिष्का, या आत ये. आपण आत बसून म्हणजे आपल्याला नीट बोलता येईल.
तन्मय चे वडील: या व्याही, बसा. बस रे काय? तुझे नाव राजेश? मोठा मुलगा. हा धाकटा महेश. बरं बरं, बसा निवांत. तन्मय, यांना आपला बंगला दाखव.
(तन्मय आतून येतो. सर्वजण बसतात. हलका तणाव, पण समजूतदारपणा.)
तन्मय: (तन्वी च्या आई-वडिलांना) काकू-काका, मी जे केले, ते चुकीचे नव्हते. मी तन्वी वर प्रेम करतो. तिची संगीताची आवड, समाजसेवा – ते मला खूप आवडले. मी आधीच तुम्हाला भेटलो, पण माझ्या घरी सांगितले नाही. आता सांगतो.
तन्वी ची आई: (गंभीरपणे) बाळा, आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर. आमचे जीवन साधे, सेवा-धर्मावर चालते. तन्वी सारखीच. तुमचे घर मोठे, जमीनदार. आम्हाला भीती वाटते – आमची मुलगी तिथे बसेल का?
तन्मय ची आई: (सॉफ्ट ली) हे बघा काकू, आम्हीही गावातील. पण आमचा मुलगा तन्वी ला पाहून बदलला. तो आता संगीत शिकतो, समाजसेवेत मदत करतो. आम्ही दुसऱ्या दिवशीच आलो होतो, पण रागात बोललो. आता समजतो. प्रेम हे फुलराणी सारखे – साधे, पण सुंदर.
तन्वी: (तन्मय कडे पाहून) तन्मय, मीही… मीही तुझ्यावर प्रेम करते. पण चौकटी? आई-बाबा, तुम्ही काय म्हणता?
तन्वी चा बाप: (विचारात) आम्ही तुझी स्वप्ने कधीच तोडली नाहीत. पण हे लग्न… सामाजिक चौकट ओलांडून होईल का?
तन्मय चे वडील: होईल काका. आम्ही दोन्ही कुटुंबे एक होऊ. तन्वी चे संगीत विद्यालय आम्ही पाठिंबा देऊ. नाटक “फुलराणी” सारखे – प्रेम फुलते, चौकट फुलवते.
(सर्व विचारात पडतात. सारिका आणि ऋषिकेश आत येतात, नाटकाच्या रिहर्सल साठी.)
सारिका: (हसत) काय चाललंय इथे? नाटकाची तालमी किंवा खरं नाटक?
ऋषिकेश: (तबला वाजवत) प्रेमाची सूर लावू या! तन्वी-तन्मय, तुम्ही लीड.
तनिष्का: (हसून) बहिणां, हे सगळे ऐकून मला वाटतं – होऊ शकते.
(सर्वजण हसतात. तन्मय तन्वी ला हात घेते.)
तन्मय: तन्वी, तुझ्या तानपुर्यां च्या सूरात मी हरवलो. आता एकत्र सूर लावू या.
तन्वी: हो, तन्मय. प्रेम चौकटीत दिसतं, पण तो चौकट फुलवतो.
तन्मय ची आई: ठीक आहे. लग्न ठरेल. पण संगीत, सेवा – सगळे सोबत.
सर्व: (टाळ्या आणि हसू) हो!
(स्टेजवर संगीत सुरू होते. तानपुरा, तबला, पेटी. सर्वजण एकत्र गातात – “फुलराणी फुलली, प्रेमाची सूर लागले ते प्रेम चौकटीत फुलले”. लाईट्स ब्राइट. पडदा पडतो.)
(नाटक संपते. शब्द: ७१५)
#२२_११_२०२५_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

मस्तच जमलंय
Lucky6868, let’s see if luck if on my side and yours! Website has a cool layout. You have to see it for yourself! Check it out here: lucky6868
Nếu bạn đang tìm kiếm một sân chơi giải trí trực tuyến ổn định, hiện đại và đa dạng trò chơi, 888slot chính là lựa chọn đáng để trải nghiệm. Với hệ thống trò chơi phong phú như: Bắn Cá Đổi Thưởng, Mini Game Đá Gà, Xổ Số Ba Miền, Thể Thao Điện Tử,… Tại đây mang đến không gian giải trí sống động, phù hợp với nhiều đối tượng người dùng. TONY01-12