#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क (३०/१/२०२६)
#गोष्ट_दुसऱ्या_लग्नाची
#शीर्षक_”दुसऱ्या लग्नाची पुर्व संध्या”
वहिनी, अजून किती दिवस अशी दादांच्या आठवणी ताज्या करत एकटी राहणार आहेस? चल, जर आपण दोघी चार दिवसांसाठी कुठे तरी बाहेर जाऊ या.
“नाही गं, नको. सुरभीचं कॉलेज बुडवून नाही चालणार!”
“सुरभीला नाताळची सुट्टी आहे आणि तिचा प्लॅन तयार आहे. ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी चार ग्रुप पंधरा दिवसांच्या युरोप टूरला जाणार आहेत.”
“चेतना, तुझाही प्लॅन होता ना शिमला, ऊटी किंवा काश्मीरला जाण्याचा?”
“हो, पण सर्व मित्र-मैत्रिणींना तू आमच्या ग्रुपबरोबर टूरला यावंस वाटतं. दादा असताना कशी तू आमच्या ग्रुपबरोबर टूरला यायचीस, मग आता का नाही? सुमितला तर तू टूरला यावंस असे मनापासून वाटतं.”
“आई, जा ना गं. तेवढाच तुला चेंज मिळेल. पप्पा असताना तू कशी छान तयार होऊन ऑफिसला जात होतीस. मग आता असं काय झालं की तू हे टाळतेस?”
“सुरभी, तुला आता नाही कळणार. तुझा पप्पा माझ्यासाठी काय होता. तुझं लग्न झाल्याशिवाय खरंच तुला नाही कळणार.”
“ते सोडून दे आई. मी जर आनंदाने युरोप टूरला जावं असं वाटत असेल, तर तू चेतना आत्या बरोबर टूरला जाशील. बघ आता तुला काय करायचं ते कर.”
“आई, सुमित अंकलचा मुलगा संकेतचा काल फोन आला होता. तो विचारत होता की तुझी आई टूरला जाणार आहे का? मी म्हटलं मला काही कल्पना नाही, पण मी विचारून सांगते असं सांगितलं आहे. तू जावंस असं मला वाटतं, कारण चेतना आत्या म्हणते तसं तुला थोडा चेंज मिळेल आणि परत एकदा बाहेरच्या जगाशी तुझी नव्याने ओळख होईल.”
“ठीक आहे, मी जायला तयार आहे. सांग तुझ्या आत्याला मी यायला तयार आहे.”
“आई, किती दिवस नाही गं, किती वर्षांनी तू बाहेर जातेस. तर हे पांढरे कपडे घालून नाही जायचं. हा ड्रेस घालून बघ, म्हणजे अजून ऑनलाइन ड्रेस मागवते. चला एकदाची तयारी झाली. चेतना आत्या, आईची बॅग पॅक झाली.”
“वहिनी, मला किती आनंद झाला म्हणून सांगू. दादाला जाऊन एक तप उलटून गेलं, आता पुन्हा असं कोषात नाही जायचं. मला तुझ्यासोबत काही बोलायचं पण आहे, पण इथे नाही. बाहेर गेल्यावर सर्व काही सांगते.”
“सुरभी, तुझं फ्लाइट केव्हा आहे? आज रात्रीचं आहे. ठीक आहे, आमची उद्याची आहे. त्याआधी सुमित अंकलला फोन करून सांग की तुझी आई टूरला जायला तयार झाली आहे.”
“हो, सांगते आत्या!”
“चेतना, आपण कुठे जाणार आहोत? काश्मीरला!”
“हो का? ठीक आहे. पण मी काय म्हणत होते की सुमितजी कशाला येतात?”
“अगं, अनुजा आंटी गेल्यानंतर अंकल पण तुझ्यासारखेच एकटे पडले होते. मग संकेतने त्यांना तयार केलं, पण त्यांनी एक अट घातली: प्रितमची फॅमिली असेल तरच मी टूरला जाईन. मग चेतना आत्या ने तुला येण्याची विनंती केली.”
काश्मीरला सुरभी आधी पोहोचली. तिने छान हॉटेल बुक केलं. दुसऱ्या दिवशी चेतना आत्या आणि आई आल्या. संकेत सुमित अंकलला घेऊन आला, ज्या हॉटेलमध्ये सुरभीने रूम बुक केल्या होत्या. थोड्या वेळात सर्व फ्रेश झाले आणि सर्व जण सनसेट पॉइंटवर आले.
समोर सुमितला बघून प्रज्ञा थोडी बावरली, पण चेतना आली आणि म्हणाली, “प्रज्ञा वहिनी, याला ओळखलंस का? हा दादाचा मित्र सुमित.”
तेवढ्यात किशोर कुमारचं गाणं लागलं: “ओ शाम मस्तानी, मदहोश किये जाते… मुझे डोर कोई खींचे, तेरी ओर लिए जाते…”
हे तर प्रितम आणि सुमितचं आवडतं गाणं! आपण जेव्हा कधी असे बाहेर फिरायला जायचो, तेव्हा एकदा तरी दोघांपैकी एक जण हे गाणं हमखास म्हणायचा. किशोर कुमार तिघांचाही फेवरेट सिंगर होता.
सुरभीने टाळ्या वाजवून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि म्हणाली, “आता आपल्याला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर मला असं म्हणायचं की आई, आज मी तुझ्यासाठी तुझ्या नवीन जोडीदाराची निवड केली आहे. मला माहिती आहे की हा तुझ्यासाठी मोठा धक्का आहे, पण इतके दिवस झाले. आता माझं शिक्षण पण पूर्ण होत आलं, आज ना उद्या मी माझ्या संसारात गुंतून जाईन. चेतना आत्या तिच्या संसारात, मग तू एकटी पडशील. म्हणून त्याआधी तुला चांगल्या व्यक्तीच्या हातात सोपवावं असं मला वाटलं. म्हणून मी हा टूरचा प्लॅन तयार केला.”
“प्रज्ञा वहिनी, थांब. आमचं ऐकून तर घे, मग तुला काय हवं ते कर!”
प्रज्ञा वहिनी खोलीचं दार बंद करण्यात आली. चेतना पटकन खोलीत घुसली. तिने प्रज्ञा वहिनीला समजावून सांगितलं. नाही होत करता करता प्रज्ञा वहिनी लग्नाला तयार झाली.
तेवढ्यात सुमित, सुरभी, संकेत खोलीत आले. त्यांना आलेलं पाहून प्रज्ञा सुरभीवर रागावली, पण लगेच शांत झाली. “तुम्ही सर्वांनी मिळून मला आणि सुमितला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यात तुम्हाला यश मिळेल हे छान आहे. तुम्हाला वाटतं ना की मी आनंदी राहावं, मग मी तयार आहे लग्नाला…”
“सुमित अंकल, आता पप्पांच्या आवडीचं तुम्हाला दोघांना आवडणारं किशोर कुमारचं एक गाणं होऊन जाऊ दे.”
“#ओ_मेरे_दिल_के_चैन_चैन_आए_मेरे_दिल_को_दुआ_ कीजिए…”
#३१_०१_२०२६_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे
