#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क(१२/१२/२५)
#म्यूझिक_शो_लेखन
#सुप्रसिद्ध_गायक_महमंद_रफी
महमंद रफी हे भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वात लोकप्रिय प्लेबॅक गायक होते. त्यांचा आवाज हा सर्वांनाच आहे!
त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला सुलतान सिंग या अमृतसरजवळील गावात झाला, जे पंजाब प्रांतात येते.
रफी साहेबांच्या कुटुंबात वडील हाजी अली मोहम्मद, आई अल्लाह राखी आणि रफी यांच्यासह एकूण सात जण होते – स्वतः रफी आणि पाच भावंडे. रफीं चे लहानपणीचे नाव ‘फीको’ होते .
रफींना लहानपणीपासूनच संगीताची आणि गाण्याची आवड होती. ते गावात येणाऱ्या फकीरांची गाणी ऐकत असत आणि हुबेहूब तशीच गाणी गात असत. हे त्यांच्या मोठ्या भावाच्या मित्र अब्दुल हमीद यांनी हेरले होते आणि त्यामुळे रफींनी त्यांच्या मदतीने संगीताचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
त्यांचे शिक्षक किंवा गुरू छोटे गुलाम अली खान (हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार) यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर फिरोज निझामी (संगीतकार) यांच्याकडून शिक्षण आणि मार्गदर्शन घेतले. आई-वडील आणि परिवारासह ते १९३५ मध्ये लाहोर येथे राहायला गेले. त्यांचे वडील केस कापण्याचा व्यवसाय करत होते.
रफींनी वयाच्या चौदाव्या वर्षी वर्षी, म्हणजे १९३७ साली, के. एल. सैगल यांच्यासोबत पहिले गाणे गायले. त्या वेळी संगीतकार श्याम सुंदर उपस्थित होते आणि त्यांना रफींच्या आवाजाने जणू मोहित केले.
त्यांच्या करिअरची सुरुवात १९४४ मध्ये झाली. त्यावेळचे शायर तनवीर नकवी यांच्या ओळखीवर ते मुंबईत आले. त्यानंतर त्यांना अब्दुर रशीद कार्दार, महबूब खान यांसारख्या दिग्गजांनी संधी मिळवून दिली.
रफींनी पहिले गाणे पंजाबी चित्रपटासाठी गायले – त्याचे नाव गुल बलोच (१९४४).
रफींनी ४० वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास २५,००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी हिंदी भाषेत गाणी गायली, त्याचबरोबर भोजपुरी, मराठी, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली.
गाव की गोरी (१९४५), जुगनू (१९४७) या चित्रपटांपासून हिंदी गाणी गायला सुरुवात केली. त्यांना नौशाद यांच्याशी सहकार्याने सुरुवात झाली. तर त्यांच्या यशस्वी किंवा ब्रेकथ्रू गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर…
🎵🎶 अनमोल गडी (१९४६) मधील “तेरा खिलोना टूटा बालक” हे त्यांचे पहिले एकट्याने गायलेलं गाणे. दिल्लगी (१९४९) मधील “इस दुनिया में ऐ दिलवालो” हे गाणं त्यांच्या करिअरचं माइलस्टोन ठरलं.
आता त्यांनी गायलेली मराठी गाणी इतकी सहज गायली आहेत…
🎶🎵 शोधीशी मानवा राउळी मंदिरी नांदतो देवा…
🎶🎵 अग पोरी सांभाळ दर्याला तुफान आयलं लय भारी…
🎶🎵 हा रुसवा सोड सखे पुरे हा बाहाणा सोडना अबोला…
🎶🎵 हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर…
🎶🎵 नको आरती ती नको पुष्प माला प्रभू भोवतीशी असे…
🎶🎵 विसर गीत कसे झाली मनाची शकले मी दिशाहीन…
🎶🎵 हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे…
🎶🎵 रे मना आज कोणी बघ तुला साद झाली रे मना…
🎶🎵 खेळ तुझा न्यारा प्रभुरे खेळ तुझा न्यारा…
🎶🎵 माझ्या विराण हृदय पाहू नकात कोणी आहे अजून…
🎶🎵 नको भव्य वाडा नको गाडी घोडा आनाडी असे मी…
🎶🎵 प्रभू तू दयाळू कृपावंत दाता दया मागतो रे तुझी मी…
तुम्हाला माहिती आहे का? रफींना अभिनेत्याच्या व्यक्तिरूपानुसार ते आवाजाची ऍडजस्टमेंट करत असत. ते सर्व प्रकारची गाणी गायचे – म्हणजे रोमँटिक, दुःखद, भक्तीगीत. त्यांची सर्वाधिक द्वंद्वगीते ही आशा भोसले यांच्याबरोबर गायलेली आहेत.
त्यांनी नौशाद, ओ. पी. नैयर, शंकर-जयकिशन, मदन मोहन, एस. डी. बर्मन यांच्याबरोबर हिट गाणी गायली आहेत.
आता त्यांची दुःखद गाणी किंवा सॅड सॉंग्स…
🥲
🎶🎵 अगर बेवफा तुझ को…
🎶🎵 तुम मुझे यू भुला न पाओगे…
🎶🎵 तुझको पुकारे मेरा प्यार…
🎶🎵 आज की रात मेरे दिल…
🎶🎵 दोनो ने किया था प्यार…
🎶🎵 तेरी गलियो मे ना रखेंगे…
🎶🎵 मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती…
ही काही #दर्द_भरी_गाणी आहेत, पण त्यांची #रोमँटिक गाणी पण आपण गुणगुणतोच, नव्हे तर ती जगतो इतकी ती आपल्या तोंडात बसली आहेत की कितीही वेळा ऐकली तरी परत ऐकण्याचा मोह होतोच नाही का!
😍🥰
🎶🎵 मुझे इश्क है तुझी से…
🎶🎵 तू कहा है बता इस नशीब…
🎶🎵 जो बात तुझे मे है तेरी तस्वीर…
🎶🎵 ये झुके झुके नैना…
🎶🎵 नजर बचाके चले ग…
🎶🎵 छेडा मेरे दिल ने…
🎶🎵 ए गुलबदन ए गुलबदन…
🎶🎵 कोई सोने के दिलवाला…
🎶🎵 मोहब्बत इसको कहते है…
🎶🎵 ओ चले झटक के दामन…
आता या महान गायकाला #फिल्म_फेअर_अवॉर्ड किती मिळाले तर एकूण सहा अवॉर्ड मिळाले.
🎼 १९६०: “चौदावी का चांद” 🎼
🎼 १९६१: “तेरी प्यारी प्यारी सुरत को” (ससुराल) 🎼
🎼 १९६४: “चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे” (दोस्ती) 🎼
🎼 १९६६: “बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूबा” 🎼
🎼 १९६८: “दिल के झरोखे में तुझको बिठाकर” (ब्रह्मचारी) 🎼
🎼 १९७७: “क्या हुआ तेरा वादा ओ क्षण” (हम किसी से कम नहीं) 🎼
या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांना १९७७ मध्ये आज का महान सपूत साठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री पुरस्कार १९६७ मध्ये भारत सरकारकडून, तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.
आता त्यांनी #सुमन_कल्याणपूर यांच्याबरोबर गायलेली काही द्वंद्वगीते…
🎼🎶 मुझे इश्क है तुझी से
🎼🎶 तू कहा है बता इस नशीली रात मैं
🎼🎶 जो बात तुझमे है
🎼🎶 ये झुके झुके नैना
🎼🎶 छेडा मेरे दिल ने
🎼🎶 नजर बचाके चले गये वो
🎼🎶 ऐ गुलबदन ए गुलबदन
🎼🎶 कोई सोने के दिलवाला
🎼🎶 मोहब्बत इसको कहते हैं
🎼🎶 वो चले झटक के दामन
🎼🎶 ना तुम हमे जानो
🎼🎶 सैया संग जीना सैया संग मरना
🎼🎶 तुम्ही मेरे मीत हो
🎼🎶दिलं एक मंदिर हैं
🎼🎶 गरजत बरसत सावन आयो रे
🎼🎶 ना जाने कहाॅं तुम ते
🎼🎶 तारो ही गोरी चाॅंद ही गुडिया
🎼🎶 उनको हम से बडी शिकायत हैं
🎼🎶 अपने पिया की मैं बनी रे जोगनिया
🎼🎶 ये किसने गीत छेडा
#रफीं_जी_नी_लता_दीदी बरोबर पण खूप गाणी गायली आहेत.
🎼🎶 ऐ दिल तूम बिन
🎼🎶झिल मिल सितारों का
🎼🎶 आदमी मुसाफिर है
🎼🎶 जो वादा किया वो
🎼🎶 हम तुम्हारे लिए
🎼🎶 मेरा मितवा मेरे मित्र
🎼🎶 वादा करले साजना
🎼🎶 आया सावन झुमके
🎼🎶 रिमझिम के गीत
🎼🎶 युही तुम मुझसे बात करती हो
🎼🎶 छुप गये सारे नजारे
🎼🎶 रमया वतावया
🎼🎶 साथिया नही जाना..
🎼🎶 आजा तेरी याद आई..
🎼🎶 मुझे तेरी मोहब्बत का सहारा…
महान गायक महमद रफींना १९७० मध्ये हृदयविकाराच्या समस्या सुरू झाल्या होत्या, तरीही ते आपली कला सादर करतच होते. पण तो दुःखद दिवस उजाडला – ३१ जुलै १९८० रोजी मुंबईत त्यांचे हृदयविकाराने निधन झाले, वयाच्या ५५व्या वर्षी.
#१५_१२_२०२५_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

Cassinovip… If you wanna feel fancy while gambling, give it a try. cassinovip